गुढ
इयत्ता सातवीचा निकाल लागला होता. अजिंक्य वर्गाबाहेर थांबलेल्या मुलींच्या घोळक्याकडे पाहात उभा होता. तेवढ्यात त्याच्या कानावर काहीतरी ऐकु आले आणि तो थेट पळाला ते शिवमच्या घरी.....
"शिवम....ए शिवम...लवकर बाहेर ये..." तो ओरडला.
" व्वा,मित्रा आलास तु!! आणला का माझा निकाल?लवकर दे.आई यायच्या आत,लपवुन ठेवतो."
" शुभम,तु फक्त माझ्यासोबत चल." अजिंक्य अजुनही धापा टाकत होता.
"अरे पण कुठे ते तरी सांगशील?आणि निकाल कुठे आहे माझा?" शिवम.
लिओ ऑप्टसची दंतकथा - २
===========================================================
भाग १
आम्ही स्मिथच्या दारात उभे होतो. बेल वाजवूनही कुणी दरवाजा उघडत नव्हते. पुन्हा एकदा बेल वाजवली. माझे कान तीक्ष्ण झाले. जोसेफला मागे सारून मी दरवाज्याच्या बाजूला पाठ लाऊन उभा राहिलो. दरवाजा उघडला गेला आणि दरवाज्यातून एक पिस्तुलधारी हात बाहेर आला. त्या हाताला काखेत पकडला आणि उलटा करून कोपऱ्यावर जोरात वार केला. तशी पिस्तुल त्या व्यक्तीच्या हातातून गळून खाली पडली.
ती पडलेली पिस्तुल जोसेफला घ्यायला सांगितली आणि आम्ही तिघे आत गेलो.
सकाळचे सात वाजले होते. डिसेंबरच्या त्या बोचऱ्या थंडीत उठावेसे वाटत नसताना नाईलाजाने उठलो. रविवार असला तरीही नऊ वाजेपर्यंत आवरून तयार व्हायचे होते. कारण नऊ वाजता मि. स्मिथ भेटायला येणार होते. त्यांचे काहीतरी अत्यंत महत्वाचे काम होते हे मी त्यांच्या काळ रात्री आलेल्या फोनवरून ताडले होते. फोनवर बोलताना ते एकही वाक्य एकसंधपणे बोलले नव्हते. त्यांच्या आवाजातील धास्तावलेपणा स्पष्टपणे कळत होता. ते असे बोलत होते जसे कि त्यांच्या कानशिलावर रिव्हॉल्वर धरून त्यांना हे बोलायला भाग पाडले आहे.