एखादी घनदाट भावना जेव्हा मनाची पकड घेते तेव्हा शब्दांची फुलपाखरं मनपटलावर फेर धरतात आणि आपण त्यापैकी काही शब्दांना पकडून ती भावना कैद करू पाहतो. आपल्याला फक्त शब्दकल्लोळ ऐकू येतो. जोपर्यंत ही भावना शब्दांना गवसत नाही तो पर्यंत मन था-यावर नसतं. अशीच एक जूनी भावना मनात दाटून आलीय आणि तिला पकडायला शब्द धडपडताहेत. माझ्या मनचक्षूसमोर एक बाजार भरलाय…मी पाहिलेला आठवडी बाजार…
एक सुंदर गजल आज प्रकर्षाने आठवली….
ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो
भले छीन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन
शब्दांच्या दुनियेत शब्दांचा बाजार ,शब्दांचे मनोरे शब्दांचेच मिनार
शब्दांनी केले शब्दांना साकार ,शब्दांनीच दिला शब्दांना आकार
शब्दांची घरटी शब्दांचा संसार ,शब्दांनीच केला शब्दांचा संहार
शब्दांनी घातला शब्द शब्दांच्या पोटी ,शब्दांची ओहटी कधी शब्दांची कोटी
शब्दांचा आभास निश्वास शब्दांचा ,शब्दांचेच प्रेम दुस्वास शब्दांचा
शब्दांनीच घातल्या टोप्या शब्दांना , शब्दांचीच मात्र लागू पडे शब्दांना
शब्दांनीच केले आहेत शब्द व्यक्त ,शब्दांचेच मिंदे आहेत शब्द अव्यक्त
भ्रम शब्दांचा शब्दांची माया , शब्दांनीच पालटते शब्दांची काया
माझा मित्र, सुधीर, परक्या ठिकाणी गेला कि सवड असेल तर आवर्जून तेथल्या लोकल मार्केटमध्ये एक चक्कर मारतो, मग ते भारतातले एखादे खेडे असो, कि परदेशातला शहर! मी एकदा त्याला कारण विचारले.
"अरे, नगरला आल्यावर लोक किल्ला, नाहीतर चांदबिबीचा महाल पहायला जातात अन तू आधी बाजारात जाऊ म्हणतोय?"
"तेच काय, कि बाजारात चक्कर मारली कि, स्थानिक लोकांची, त्यांच्या आवडीनिवडींची, राहणीमानाची, अशी खूप माहिती मिळते! "
मला त्याचा हा फंडा आवडला. मी बाजार पालथे घालायचो पण हा दृष्टिकोन माझ्या आकलनात आला नव्हता. याचा फायदा मला अमेरिकेत झाला. ऑस्टिनच्या वास्तव्यात मी मॉल आणि दुकान पहिली.
काल अचानक बयोचा फोन आला “काका, मी बस स्टॉपवर आहे, न्यायला ये” आणि मला आनंदाचा धक्का बसला. तिचे हे नेहमीचेच आहे. कधी अगोदर फोन करुन येणार नाही. ही बयो म्हणजे माझ्या थोरल्या भावाची मुलगी. तिला या नावाने फक्त मी आणि बाबा हाक मारतो. माझ्या आज्जीला आम्ही सगळे बयो म्हणायचो. आज्जीचं दिसनं, सवयी, काही आवडी आणि चक्क काही लकबी सुध्दा हिच्यात आहेत. त्यामुळे मी तिला बयो नावानेच हाक मारतो. या नावाने हाक मारण्यामागे कुठेतरी आज्जीची हळवी आठवणही असतेच. या नावाने तिला हाक मारली की भावाच्या, वहिनीच्या कपाळावर आठ्या पडतात पण मला आणि बयोलाही हे नाव आवडत असल्याने आम्ही कुणाचा फारसा विचार करत नाही.
भेळ
वांगी, मेथी भरुन पाटीत
माझा दादा बाजारा जातो
धोतराचा पकडत सोगा
सायकलीवर टांग मारतो
गांजलेली जुनीच सायकल
दादा हवा नवीन भरतो
चाळण झालेल्या ट्यूबला
ठिगळ नवे रोज लावतो
अडचणींच्या फुफाट्यात, दादा
प्रयत्नांचे पायडल मारतो
घामाचे मोती सांडत वाटेत
फाटका संसार रेटत नेतो
विरोधातच वारा त्याच्या
सायकल तरी सावरतो
कोरड पडल्या ओठावर
आशाळभूत ओल पेरतो
बाजारात पोहचताच
सावलीला उन्हाच्याच
दुकान लागले भाजीचे
जीवाच्या आकांताने, तो
ओरडतो " भाजी घे "
बाजार
धनदांडग्यांच्या हातातला
हा बाजार निरामय नाही
कधी काचही हिरा होई
कधी हिऱ्याची काच होई
हा बाजार निरामय नाही
कुणी लाविले सर्वस्व पणाला
गिळून कढ आतले घेई
हा बाजार निरामय नाही
व्यापारी हे असे माजोरी
शिरजोरी त्यांची होई
हा बाजार निरामय नाही
विक्रेय जे कधीच नव्हते
तेही विकले जाई
हा बाजार निरामय नाही
भोगाची ही रीत निराळी
मुल्यांची निज होळी होई
हा बाजार निरामय नाही
दत्तात्रय साळुंके
'चांदोबा' मासिकातील चित्रे फारच भन्नाट असायची. एक अदभूत जग होतं ते. वेगळ्याच प्रकारचे पेहराव, दागिने, चेहर्याची ठेवण असलेली पात्रं त्या चित्रांतून दिसत. त्याचबरोबर देवादिकांनी घातलेले मोठ्ठे आणि विविध प्रकारचे फुलांचे हार असत. चित्रातल्या बायका भरपूर गजरे माळलेल्या दिसत. चांदोबातील या चित्रांवर दाक्षिणात्य ठसा होता.
तेच ते 'चांदोबा'तले हार माटुंग्याच्या बाजारात बघायला मिळतात. अतिशय आकर्षक आणि नक्षीदार रचना केलेले हे हार बघून त्या कलाकारांचं कौतुकच वाटतं. काही हार तर खास दाक्षिणात्य स्टाईलचे - हे भलेमोठ्ठे. माणसापेक्षाही जास्त उंचीचे.
मार्च महीण्यातले रणरणते उनं..गावातला आठवडी बाजार गच्च फुललेला होता..लग्नसराईचे दिवस असल्यानं सगळ्याच दुकानवजा पालावर आजुबाजुच्या खेड्यावरील बाया,माणसे,मुला-मुलींची गर्दी मावत नव्हती..ज्या मुलींची लग्न ठरलेली होती त्या मैत्रिणीसोबत कटलरी-स्टेशनरी च्या दुकानावर 'नकपालीस',मेंदीकोण,पावडर,लाली,चमकी,बिंदी,'भारी'चे सेंट,हातरुमाल,छोटे आरसे घेतांना मध्येमध्येच वेड लागल्यागत खुदकन हसत होत्या..या सगळ्यामध्ये बिचार्या दुकानदाराची त्रेधातिरपिट उडत होती..
तुझ्या मुग्धतेवरच मी भाळले
शब्दांचे गजरे गुंफित गेले
माझे बोल तुला स्मरत राहिले
मला काहीच आठवेना झाले....
तेव्हा त्या गजर्यालाच साक्षी केलंस!
प्रत्येक फुल पायदळी तुडवलंस
खर्या खोट्याचा बाजार मांडून
माझ्या प्रेमालाच ’वेश्या’ केलंस!