माझा मित्र, सुधीर, परक्या ठिकाणी गेला कि सवड असेल तर आवर्जून तेथल्या लोकल मार्केटमध्ये एक चक्कर मारतो, मग ते भारतातले एखादे खेडे असो, कि परदेशातला शहर! मी एकदा त्याला कारण विचारले.
"अरे, नगरला आल्यावर लोक किल्ला, नाहीतर चांदबिबीचा महाल पहायला जातात अन तू आधी बाजारात जाऊ म्हणतोय?"
"तेच काय, कि बाजारात चक्कर मारली कि, स्थानिक लोकांची, त्यांच्या आवडीनिवडींची, राहणीमानाची, अशी खूप माहिती मिळते! "
मला त्याचा हा फंडा आवडला. मी बाजार पालथे घालायचो पण हा दृष्टिकोन माझ्या आकलनात आला नव्हता. याचा फायदा मला अमेरिकेत झाला. ऑस्टिनच्या वास्तव्यात मी मॉल आणि दुकान पहिली.
एव्हाना मी बऱ्यापैकी येथे (म्हणजे ऑस्टिनच्या घरात) रुळलो आहे. मुलाचे घर ज्या कॉलनीत आहे (येथे याला कम्युनिटी म्हणताना ऐकलंय) तो परिसर देखणा आहे. एका बिल्डिंग मध्ये तीन घरे मध्ये पॅसेज लगेच त्याला लागून तीन घरांचा रो, अशे तीन माजले, म्हणजे एकंदर आठरा अपार्टमेंट्स. अश्या बऱ्याचश्या बिल्डिंगा आहेत. तीस -चाळीस तरी असतील. कोठेही लिफ्ट नाही. या सर्व इमारतींना एक कंपाउंड घातले आहे, चौकोनी लोखंडी बारचे. सर्व इमारतींना जोडणारा एक चांगला प्रशस्त टाररोड आहे. कार, ट्रक इत्यादी वाहनांसाठी. हा भाग सोडला तर बाकी जमीन हिरवळीने झाकली गेलेली आहे. मॅपल आणि इतरही खूप झाडे आहेत.
दिवस दिवाळीच्या आसपासचे. आमचे मेव्हणे, त्यांच्या नाताला बेंगलोर दाखवायला घेऊन आले होते. तो असेल दहा बारा वर्षाचा. परतीच्या मांसूनच शेपूट वळवळत होत. त्यारात्री, त्यानं बेंगलोरला, चांगलंच झोडपून काढायचं ठरवलं असावं. संध्याकाळपासूनच पावसानं फेर धरला होता.
अश्या वातावरणात, जे व्हायचं तेच झालं. पावसाच्या पहिल्या सरीला विद्युतमंडळाने लाईट घालवून टाकले. बाहेर दिवसभर वणवण उन्हात भटकून, जिभेचे चोचले पुरवत फिरलेली मंडळी, तापली. श्री मेव्हणा आणि सौ. मेव्हणा यांच्या, तापीबरोबर संडासच्या फेऱ्या सुरू झाल्या. त्यांचा नातूहि, त्यांना सामील होता! मोठी पंचाईत होती. घरातले दोनचार लिंब वापरून झाली!