Submitted by दत्तात्रय साळुंके on 13 October, 2017 - 23:36
बाजार
धनदांडग्यांच्या हातातला
हा बाजार निरामय नाही
कधी काचही हिरा होई
कधी हिऱ्याची काच होई
हा बाजार निरामय नाही
कुणी लाविले सर्वस्व पणाला
गिळून कढ आतले घेई
हा बाजार निरामय नाही
व्यापारी हे असे माजोरी
शिरजोरी त्यांची होई
हा बाजार निरामय नाही
विक्रेय जे कधीच नव्हते
तेही विकले जाई
हा बाजार निरामय नाही
भोगाची ही रीत निराळी
मुल्यांची निज होळी होई
हा बाजार निरामय नाही
दत्तात्रय साळुंके
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अर्रे व्वा! खुप सुंदर..
अर्रे व्वा! खुप सुंदर..
कितीतरी वेगवेगळ्या एंगलनं कविता उलगडतेय.. शेतकरी, आध्यात्म, समाज, राजकारण....
ग्रेट!!
मस्त!!!
मस्त!!!
मस्त!!!
मस्त!!!
मस्त!!!
Double post..
अप्रतिम!!
अप्रतिम!!
खुप छान
खुप छान
राहुल खूप , खूप आभार माझ्या
राहुल खूप , खूप आभार माझ्या अल्प प्रयत्नांच्या सुंदर प्रशंसेसाठी ........
अंबज्ञ , मेघाजी , अक्षयजी आपले देखिल खूप धन्यवाद सुंदर प्रतिसादासाठी.
छान
छान
VB धन्यवाद !
VB धन्यवाद !