कॅमेर्यातून पाहताना
Submitted by अरिष्टनेमि on 6 April, 2020 - 07:33
नाकासमोर पाहून मी आपल्या सरळ वाटेनं जात होतो. जाता जाता एका कोरड्या ठक्क नाल्यातून पाखरं उडाली. अरेच्या, इथं पाणी आहे? मी थांबून नाल्यात उतरलो. रस्त्यावरून दिसणार्या पहिल्या वळणाशी आलो. पुढं नाला वळून डावीकडं गेला होता. इथं वीसेक फूट अंतरावर पाणी पाझरून पात्रात छोटं डबकं झालं होतं. वर मोवईनं सावली धरली होती. हिवाळा सरत आला की मोवई फुलावर येते. चैत्राच्या आजू-बाजूला तिची फळं पिकू लागतात. पानझडीमुळं द्राक्षांचे घोस लोंबावेत असे लिंबोळीसारख्या फळांचे फांदी-फांदीला घोस लगडलेले दिसतात. मग बहू पाखरांची इथं चंगळ होते.
विषय:
शब्दखुणा: