फोटोफीचर

फुलांनी बहरलेली बुचार्ट गार्डन : फोटोफीचर

Submitted by rar on 2 November, 2017 - 13:12

कॅनडातली बुचार्ट गार्डन ही जागा. वेगवेगळ्या ऋतूत वेगळा अनुभव देणारी. मागच्या वर्षी बुचार्ट गार्डन ला भेट दिली त्या दिवशी भरपूर पाऊस होता. त्यामुळे बागेचे, फुलांचे फोटो काढण्यापेक्षाही मला माणसं आणि त्यांच्या हातातल्या छत्र्या ही स्टोरी कॅपचर करावीशी वाटली होती. ते फोटोज मी शेयर देखील केले होते.
यावर्षी परत एकदा बुचार्ट गार्डनला जायचा योग आला. यावेळी मस्त सूर्यप्रकाश आणि त्या प्रकाशात आपले रंग मुक्तपणे उधळणारी फुलं यांनी माझं लक्ष वेधून घेतलं.

एक अकेली छत्री मे : फोटोफीचर बुचार्ट गार्डन्स, कॅनडा

Submitted by rar on 3 October, 2016 - 12:12

कॅनडामधली व्हँकुव्हर ही माझी आवडती जागा. शांतता हवी असेल भटकायला तर मस्त निसर्ग. गर्दी, दुकानं, गजबज आणि मुख्य म्हणजे विविध वंशाची, विविध भाषा बोलणारी लोकं, खाद्यप्रकार एकूणच एथनिक डायव्हरसीटी अनुभवायची असेल तर मस्त व्हायब्रन्सी असलेली सीटी. व्हँकुव्हर पासून साधारण दीडतासाचा बोटीचा किंवा इथल्या भाषेत फेरीचा प्रवास करून गेलं की येतं व्हँकुव्हर आयलंड. हा प्रवास देखील एकदम भारी. आपल्या गाड्या ड्राईव्ह करत फेरीमधे चढवून पार्क करायच्या आणि मग फेरीच्या वरच्या मजल्यांवर किंवा बाहेर डेकवर बसून प्रवास. ह्या व्हॅकुव्हर आयलंड वरच्या व्हीक्टोरीया शहराजवळचं 'बुचार्ट गार्डन' ही अशीच एक भन्नाट जगा.

मायक्रोफोटोग्राफीचे अद्भुत विश्व - आंबोली - लेखक : कांदापोहे

Submitted by संयोजक on 10 September, 2016 - 14:11

मायबोलीकर विविध क्षेत्रांत पारंगत आहेत, हे आता आपण सगळे व्यवस्थित जाणतोच. आपल्या सर्वांनाच त्यांच्या क्षेत्रांबद्दल वाचायला, त्यांचे अनुभव ऐकायला आवडते. कांदापोहे हे मायबोलीकर नुकतेच 'मायक्रोफोटोग्राफी' करायला आंबोली या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन आले. त्यांनी काढलेल्या फोटोंपैकी निवडक फोटोंचे हे फोटोफीचर आहे. संयोजकांच्या खास विनंतीला मान देऊन त्यांनी हे गणेशोत्सवानिमित्त आमच्याकडे सोपवले आहे. त्यांच्याच शब्दांत त्यांचा अनुभव आणि त्यांनी काढलेल्या सुंदर फोटोंचा आस्वाद, अशी दुहेरी मेजवानी मायबोलीकरांसाठी सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.

अप्रसिद्ध मंदिरे : गणपती मंदीर, नाणेली, ता. कुडाळ - एक फोटोफीचर - नीधप

Submitted by संयोजक on 3 September, 2011 - 04:13

पावसाळा संपतानाचं वातावरण. जिकडे तिकडे हिरवं गार. आम्ही मस्तपैकी तळकोकणातल्या वाड्यावस्त्यांमधून फिरतोय. कामासाठीच पण आजूबाजूचा निसर्ग इतका सुंदर की कामाचा ताण तसा वाटतच नाही.

विषय: 
Subscribe to RSS - फोटोफीचर