एक अकेली छत्री मे : फोटोफीचर बुचार्ट गार्डन्स, कॅनडा
Submitted by rar on 3 October, 2016 - 12:12
कॅनडामधली व्हँकुव्हर ही माझी आवडती जागा. शांतता हवी असेल भटकायला तर मस्त निसर्ग. गर्दी, दुकानं, गजबज आणि मुख्य म्हणजे विविध वंशाची, विविध भाषा बोलणारी लोकं, खाद्यप्रकार एकूणच एथनिक डायव्हरसीटी अनुभवायची असेल तर मस्त व्हायब्रन्सी असलेली सीटी. व्हँकुव्हर पासून साधारण दीडतासाचा बोटीचा किंवा इथल्या भाषेत फेरीचा प्रवास करून गेलं की येतं व्हँकुव्हर आयलंड. हा प्रवास देखील एकदम भारी. आपल्या गाड्या ड्राईव्ह करत फेरीमधे चढवून पार्क करायच्या आणि मग फेरीच्या वरच्या मजल्यांवर किंवा बाहेर डेकवर बसून प्रवास. ह्या व्हॅकुव्हर आयलंड वरच्या व्हीक्टोरीया शहराजवळचं 'बुचार्ट गार्डन' ही अशीच एक भन्नाट जगा.
विषय: