'देवळाशिवाय गाव' ही कल्पना कुणाला सहन होणार नाही, इतकं महाराष्ट्रातलं ग्रामीण भावजीवन देवळाभोवती गुंफलं गेलं आहे. रोज नवीन फार काही घडत नसलेल्या कुठच्याही खेड्यात 'देऊळ', त्याभोवतीचा 'पार' ही सर्वात महत्वाची गोष्ट. लग्नकार्य असो, सुखदु:ख असो, सणसमारंभ असोत, वायफळ गप्पा असोत की गावातले महत्वाचे निर्णय असोत- श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या डोलार्यावर उभ्या राहिलेल्या या विश्वाचे किती रंग, किती ढंग!
तुमच्या कॅमेर्यातलं देऊळ काय दाखवतंय?
गाव म्हटलं कि डोळ्यांसमोर उभे राहते ते आपले बालपण, आणि त्यावेळच्या आपल्या गोड आठवणि..
अशाच काहि आठवणि मी कॅमेर्यात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे.
[NOTE: हे सर्व फोटो मी माझ्या मोबाईलच्या ३ MP कॅमेर्यातून घेतलेले असुन ते कोठेहि एडिट केलेले नाहित, याची क्रुपया नोंद घ्यावी.]
ठिकाणः- 'मांडवे' ता. जि. सातारा.
घराजवळील भोपळ्याचा वेल
घरामागील शेवगा
गेल्या दोन दिवसांपासून सूर्य मावळतीला गेल्यावर आकाशात असे रंग पहायला मिळतायत.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
कुणाला कशाचे तर कुणाला कशाचे. मला खाद्यपदार्थांचे, तेही खास करुन स्वतः केलेल्या पदार्थांचे फोटो काढायची हौस आहे.
नेहमीच्या या कामाला मी छंदाचे रुप दिलेय. प्रत्येक पदार्थ दिसायला कसा सुंदर दिसेल. त्याची रंगसंगती कशी आकर्षक दिसेल, असा विचार करत असतो. माझ्यासाठी ती नवनिर्मितीच असते.
पुर्वी मायबोलीवर लिंक देणे मला जमत नसे. त्यामुळे यातले काही फोटो पुर्वी टाकले असतील, तरी ते छोट्या आकारात होते. आता सावलीने शिकवल्यानंतर मला लिंक देणे जमू लागले आहे.
गेली २ वर्षे मी मायबोलीवर वाचनमात्र आहे. सद्ध्या थोडा मोकळा वेळ मिळत असल्यामुळे लेखन करायची इच्छा आता पूर्ण करुन घ्यावी म्हणतोय
आता आपल्याला ज्या विषयात गती आहे त्यातच सुरुवात करावी. फोटोग्राफी हा तसा जिव्हाळ्याचा विषय आणि काही मेंदूला ताण देऊन शब्दांचा पिट्ट्या पाडायची पण गरज नाही
अशीच काही चित्रे डकवतोय; पहिलाच लेखनाचा प्रयत्न असल्याने सांभाळून घ्यावे