वर्षाविहार २०११
ढिंक चिका ..... ढिंक चिका ..... ऐ SSSSSSSSSSS ऐ......... (मायबोली ववि २०११ झलक)
मायबोलीसाठी तुम्ही काय करू शकता?
वर्षाविहार(२४ जुलै २०११)- फार्मलाईफ इथे वविकरांसमोर व्यक्त केलेलं मनोगत
***
नमस्कार मित्रांनो.
वर्षा विहार २०११
कॉलेजचं कँटीन...., नेहमीप्रमाणेच गच्च भरलेलं !
"छोड यार, वो नही आनेवाली आज ! साल्ला, त्या खत्रुड सबनीसचा लेक्चर आहे बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा. तिच्या पुण्याचा प्रोफेसर तो. त्याचं लेक्चर सोडून काय येते तुझी छावी? तू आपला सुम्मडीमध्ये चाय पी आन जा लेक्चरला. क्युं रे चवन्नी, ठिक बोला ना?"
"गप्प बसा यार, ती येते म्हणालीय.. येणार म्हणजे येणारच! मला खात्री आहे, आपण आज तिला विचारणारच. मग साला जमीन - आसमान एक क्युं न हो जाये. आज आर या प्यार होवूनच जावदे."
टि-शर्ट आणि कॅप (ववि २०११) !!!
कालचा आपला टी-शर्ट वाटपाचा कार्यक्रम अती पावसामुळे गैरसोय झाल्याने नाईलाजाने पुढे ढकलावा लागला आहे....गैरसोयीबद्दल संयोजक दिलगीर आहेत.
ज्यांना कोणास यायचे जमत नाही त्यांनी राम किंवा मल्लिनाथशी संपर्क साधुन टि-शर्ट घ्यावे.
आत्तापर्यंत तुम्हा सर्वानी आम्हाला खुप सहकार्य केले आहे आणी यापुढे सुद्धा असेच सहकार्य मिळावे ही नम्र विनंती..
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: २३ जुलै २०११, स. १०.३० ते १२.३०
(जर पाउस किंवा जागेची काही अडचण झाली तर तिथेच शेजारी बालगंधर्व हॉटेल मध्ये जमावे.)
धन्यवाद !
"आले आले..."
वर्षाविहार २०११ - फार्म लाईफ !!!
नावनोंदणीची अंतिम तारीख वाढवुन १६ जुलै २०११ केली आहे.
मायबोली घेउन येत आहे आमच्या अनेक उपक्रमांपैकी एक ज्याची समस्त मायबोलीकर अत्यंत अतुरतेने वाट पाहतात असा नाविन्यपूर्ण, लज्जतदार, खुमासदार, हवाहवासा वाटणारा तो 'वर्षा विहार'.
अर्थात आपल्या सर्व आवड्त्या नावड्त्या... पाहीलेल्या...न पाहीलेल्या...ख-या आणि अर्थातच कदाचित ड्यु आयडी मायबोलीकरांना प्रत्यक्ष याची देही याची डोळा भेटण्याची पर्वणीच!!!! यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे २४ जुलै २०११ या दिवशी कर्जत-चौक फाट्यापासुन साधारण ३०-३२ कि.मी. अंतरावर असलेल्या "फार्म लाईफ होलिडेज" इथे.
वर्षाविहार २०११ : दवंडी !!
"ढिंक चिका..ढिंक चिका...ढिंक चिका ढिंक......"
आधी तर कळेच ना, भर हापिसात एवढ्या जोरात कुठला रेडा, रेडीला आळवतोय ते. समोरच्या क्युबिकलमधली बकरी (हो बकरीच, रेडी म्हणावी इतकी वाढलेली नाहीये अजुन) डोळे विस्फारून माझ्याकडे बघायला लागली. मी चाट पडलो, पटकन पेपर स्टँडला लटकवलेला गॉगल हातात घेतला आणि माझा चेहरा बघीतला. व्यवस्थित होता. (अजून तरी पिताश्रींनी जा तोंड काळे करा असा हुकूम या आज्ञाधारक बालकाला दिलेला नाहीये). मी तिला डोळ्यांनीच खुणा करत विचारलं..
"काय्ये?"