कालचा आपला टी-शर्ट वाटपाचा कार्यक्रम अती पावसामुळे गैरसोय झाल्याने नाईलाजाने पुढे ढकलावा लागला आहे....गैरसोयीबद्दल संयोजक दिलगीर आहेत.
ज्यांना कोणास यायचे जमत नाही त्यांनी राम किंवा मल्लिनाथशी संपर्क साधुन टि-शर्ट घ्यावे.
आत्तापर्यंत तुम्हा सर्वानी आम्हाला खुप सहकार्य केले आहे आणी यापुढे सुद्धा असेच सहकार्य मिळावे ही नम्र विनंती..
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: २३ जुलै २०११, स. १०.३० ते १२.३०
(जर पाउस किंवा जागेची काही अडचण झाली तर तिथेच शेजारी बालगंधर्व हॉटेल मध्ये जमावे.)
धन्यवाद !
"आले आले..."
"अहो, आले आले काय ? आलो आलो म्हणा !"
"अगं मी नाही गं, 'मायबोली' टीशर्ट आले!"
"ते होय....."
"हॅ.... काय झालं ?"
"आहो, यंदा ना किनै थोडं बजेट वाढ्वुया का?"
"का ..... " (हि ना....., असं लाडे लाडे बोलुनच माझ्या बनियनची भोकं वाढलीयत. लाडात आली की झालं बोटाने कुरतडायला.)
"य़ंदा मायबोलीच्या टोप्याही आल्यात म्हणे......."
"म्हणजे तु मला टोपी घालणार.. :अओ:"
"अहो तसं नाही... हो"
"मग कसं.. ?"
"तुम्ही ना..... जा तिकडे..."
"हँ..... "
तर मंडळी, सालाबादप्रमाणे याही वर्षी मायबोलीकरांना 'मायबोली टीशर्ट' तसच टोप्या ही उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
यावर्षी आपली आवडती 'मायबोली' ही अक्षरं 'सुलेखन' करून घेण्यात आली आहेत प्राजक्ता थरथरे (पारीजातक)आणि पल्लवी देशपांडे(पल्ली) यांच्याकडुन .
टीशर्ट एकाच रंगात उपलब्ध आहेत- गड्द हिरवा (डार्क ऑलिव्ह ग्रिन). यामध्ये सुलेखन पुढे आणि मायबोलीचा लोगो आणि लिंक डाव्या बाहीवर येईल. टीशर्ट असा दिसेल-
वर चित्रात दर्शवल्याप्रमाणे यंदाचे टीशर्टस् राऊण्ड नेक परंतू लेडिज आणि युनिसेक्स अश्या दोन प्रकारात पुढील साईजेसमध्ये उपलब्ध आहेतः-
लहान मुलांचे टि शर्ट १४५ + २५** = १७०रु./-
२२"
२४"
२६"
२८"
३०"
३२"
मोठ्यांचे टि शर्ट १७५ + ५०**= २२५रु/-
टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-
३६"==XS
३८"==S
४०"==M
४२"==L
४४"==XL
४६"==XXL
आणि अशी दिसेल बेस बॉल कॅप
क्याप ६० + २५** = ८५रु/-
** महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टि-शर्ट आणि कॅपच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.
यंदा टीशर्ट विक्रीतून उभी राहणारी रक्कम काश्मीरातल्या अनाथ मुलींसाठी काम करणार्या श्री. अधिक कदम व त्यांच्या ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.
या संस्थेची माहिती http://www.bwfindia.org.in/index.php इथे उपलब्ध आहे.
टि-शर्टांची नोंदणी आणि पैसे ३ जुलै २०११ पर्यंत द्यायचे आहेत. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, ईमेलमध्ये तसे लिहा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.
पुणे आणि मुंबई इथे ३ जुलै २०११ या एकाच दिवशी टिशर्टचे पैसे जमा केले जातील आणि १७ जुलै २०११ या दिवशी टिशर्ट आणि कॅप वितरण केले जातील.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
ऑर्डर कशी नोंदवाल? - tshirt@maayboli.com इथे ईमेल पाठवून.
ईमेल च्या सब्जेक्ट मध्ये 'टि-शर्ट/कॅप नोंदणी' असे नमुद करण्यास विसर नका.
ईमेलमध्ये काय लिहाल?
१. आपला मायबोली आयडी
२. आपले (खरे संपूर्ण) नाव
३. आपला चालू असलेला ईमेल पत्ता
४. संपर्क क्रमांक (शक्यतो मोबाईल नंबर)
५. टिशर्ट कुठून घेणार- मुंबई/ पुणे/ इतरत्र
६. पैसे कसे देणार? - प्रत्यक्ष/ ऑनलाईन
७. टिशर्ट कसा घेणार- प्रत्यक्ष/ मित्र/ नातेवाईकांमार्फत (त्यांना संपर्काचे डेटेल्स)
८. किती टिशर्ट? लहान मुलांचे-मोठ्यांचे
९. लेडीज-युनिसेक्स कोणत्या प्रकारचे?
१०. साईझ- यांपैकी कोणता-
११ क्याप हवी का? असल्यास किती-
चला तर मग ववि साठी आपले आपल्या कुटुंबियांचे मित्रांचे टि शर्ट आणि कॅप त्वरीत नोंदवा.
अधिक माहीतीसाठी संपर्क :-
पुणे -
मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६
राम चिंचलीकर(राम) फोन : ९८५०८८५४२५
मुंबई -
आनंद चव्हाण (आनंदमैत्री) फोन : ९७६९४५४४२९
* भारता बाहेर किंवा मुंबई-पुणे बाहेर टि-शर्ट पार्सल करण्याची सुवीधा सध्यातरी नाहीय. पण तुम्ही कोणी नातेवाईक-मित्र परिवार किंवा स्वतः कधी मुंबई-पुणे आल्यास कलेक्ट करु शकत असल्यास नोंदणी आवश्य करावी.
* जर पर्सल खर्च तुम्ही करु शकत असल्यास संयोजक पार्सलची सोय करता येईल का ते नक्कीच कळवतील.
(No subject)
सुपर्ब. आणखी एखाद्या कलरचा
सुपर्ब. आणखी एखाद्या कलरचा ऑप्शन हवा होता. डिझाईन सुंदर. पल्लीताई,ह्यावर्षी नविन सुलेखनाची नविन कंसेप्ट काय?
(No subject)
सुंदर आहेत शर्ट अन टोप्या.
सुंदर आहेत शर्ट अन टोप्या.
ऑर्डर पाठवली आहे
टिशर्टची मापं मागच्या
टिशर्टची मापं मागच्या वर्षीप्रमाणेच आहेत का सेम?
त्याप्रमाणे ठरवायला बरं..
रंग चांगला निवडलाय या वेळी..
मी घेणार
टिशर्ट आणि कॅपचे पैसे कोणत्या
टिशर्ट आणि कॅपचे पैसे कोणत्या दिवशी द्यायचे ते समजले, वेळ लिहायची राहून गेलिये का? नविन लोक कन्फ्यूज होतील.
मस्त डिजाईन आणि मस्त
मस्त डिजाईन आणि मस्त रंग.
संयोजक, टिशर्टांची रुंदी, उंची इत्यादी मापं लिहू शकाल का इथे? त्याप्रमाणे ऑर्डर द्यायला सोपं जाईल.
तसंच देणगी कोणत्या संस्थेला देणार हेही आधी कळलं तर बरं होईल.
ई मेल कुटून पाटवायचा
ई मेल कुटून पाटवायचा
जेडी १११, तुम्ही तुमच्या गुगल
जेडी १११, तुम्ही तुमच्या गुगल / याहू इ. इमेल अकाउंटवरून tshirt@maayboli.com वर मेल करू शकता.
(डार्क ऑलिव्ह ग्रिन). म्या
(डार्क ऑलिव्ह ग्रिन). म्या घेनार
मस्त टि शर्ट. आवडता रंग
मस्त टि शर्ट. आवडता रंग नक्कीच घेणार (टि शर्ट+क्याप)
कॉलरवाले टि-शर्ट का नाहीत?
जिप्स्या, तुला रंगांचा बॉक्स
जिप्स्या, तुला रंगांचा बॉक्स भेट द्यायला सांगतो त्यांना. म्हंजे हवं तेव्हा हवा तो कलर मध्ये बुचकाळुन टिशर्ट कलर कर्ता येतील तुला.
अरे त्याला कॉलर हव्ये! ती
अरे त्याला कॉलर हव्ये! ती कुठे शिऊन मिळते ते सांग
टि-शर्ट शिवुन उरलेले कापड
टि-शर्ट शिवुन उरलेले कापड द्या म्हणावं संयोजकांना... वेग वेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये शिवुन घेईल. नाही तर असं कर, बोमन इरानी सारखं ते कापड कॉलर म्हणुन वरुन नुसतंच लाव, सोप्पं पडेल.
अरे त्याला कॉलर हव्ये! ती
अरे त्याला कॉलर हव्ये! ती कुठे शिऊन मिळते ते सांग >>>>>:फिदी:
मस्त... आत्ता नोंदणी करतो...
मस्त... आत्ता नोंदणी करतो... माझा आवडता रंग आहे...
हिरवा टीशर्ट... निळी
हिरवा टीशर्ट... निळी कॅप......
आता पँट भगवी घालावी म्हणतो........ कसं एकदम "राज्"बिंडं वाटेल...... मनसे रे......
टी-शर्ट चा रंग मस्त आहे
टी-शर्ट चा रंग मस्त आहे
कॅप्सच्या साईझ दिलेल्या नाहीत.
कॅप मध्ये साईझ नाहीत का?
कॅप मध्ये साईझ नाहीत का?
मस्त रंग आणि डिझाईन. लवकरच
मस्त रंग आणि डिझाईन.
लवकरच ऑर्डर देते.
रंग आणि डिझाईन मस्त
रंग आणि डिझाईन मस्त आहे...
ऑर्डर देऊ लवकरच..
छान
छान
कॉलरवाले टि-शर्ट का नाहीत? >>
कॉलरवाले टि-शर्ट का नाहीत? >> ते आपण बनवायचे असतात.. फॉर उदाहरण
कॅप ऑल टाईम फेवरीट.. नि सुलेखन पण मस्तच !
यो
यो
मंजुडी, मापं मागच्या
मंजुडी, मापं मागच्या वर्षीप्रमाणेच आहेत. तसंच संस्थेचं नावही लवकरच जाहीर केलं जाईल.
दक्षीणा, आपल्या माहीतीसाठी -
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
कॅप्सच्या साईझ दिलेल्या
कॅप्सच्या साईझ दिलेल्या नाहीत. >> आशु
माबोकरांच्या डोक्याचा साईज एकच आहे. (मेंदू नसल्याने :फिदी:)
(गरजूंसाठी फक्त)
ववि संयोजक धन्यवाद.
ववि संयोजक धन्यवाद.
कॉलर पाहिजे.. यो साठी स्पेशल
कॉलर पाहिजे..
यो साठी स्पेशल विदाऊट कॉलर बनवा...
मागणी नोंदवली आहे. धन्यवाद
मागणी नोंदवली आहे. धन्यवाद
मागणी नोंदवली आहे.
मागणी नोंदवली आहे.
Pages