प्रस्तावना:
बरेच दिवस या विषयावर लेख लिहायचा विचार होता. पण आळसामुळे जमत न्हवते. शेवटी आज ठरवले की याबद्दल लिहूयाच. आपल्या सर्वांना सतत जाहिरातींचा भडिमार कळत-नकळत सहन करावा लागतो. कधी कधी त्याचा खूप त्रास पण होतो, पण शेवटी पर्याय काय म्हणून आपण गप्प बसतो आणि तो त्रास मुकाट्याने सहन करतो.
श्री गणरायाला वंदन करुन सादर करत आहोत खास सोशल मिडीया सॅव्ही मंडळीसाठी आमचे एक खास प्रॉडक्ट.
स दा पडीक ऑन सोशल मीडिया सर्व्हिस एजेंसी चे "द ग्रेट वॉल ऑफ पोस्ट्स "फेसबुक स्टेट्स पॅकेज!! एकदा अनुभव घ्या आणि कायमचे गिर्हाईक व्हा !
आमची खास पॅकेजेस पुढीलप्रमाणे
आणि हे
सकाळ झाली. भैरु उठला. भैरुने 'हवा मे उडता जाये' असा दावा करणार्या रबरी सपाता पायात सरकावल्या आणि तो दंतधावन करण्यासाठी न्हाणीघरात गेला.
'दातों के कानेकोपरेतक पोहचणारी' एक विचारपूर्वक वेड्यावाकड्या बनवलेल्या दात्यांची दंतघासणी त्याने उचलली. त्यावर 'आत्मविश्वास' जागवणार्या दंतरसायनाचे नळकांडे दाबले आणि दात घासायला सुरुवात केली. दात घासून झाल्यावर जाहिरातसंतांनी सांगितल्याप्रमाणे दातावर बोट घासून 'च्युक' आवाज येतो का त्याची तपासणी केली. अरेच्च्या! आवाज नीट नाही आला. भैरुने परत थोडे दंतरसायन घासणीवर घेतले आणि परत दात घासले. यावेळी दातावर बोट घासल्यावर हवा तसा 'च्युक' आवाज आला. हुश्श!!
काही जाहिराती मनाच्या किती जवळच्या वाटतात. काहींची गाणी आपलीशी वाटतात. काहीतल्या थीम तर काही केरेक्टर..काही काही जाहिराती पाहतांना तर हमखास आपल्या काही जवळच्या माणसांची आठवण येते. काही जाहिरातीतले वातावरण जुने दिवस आठवण करवून देतात काही स्वप्नील भविष्यात घेऊन जातात….
SBI Life च्या त्या जुन्या गाण्यावर आधारित जाहिरात मला नेहेमीच attract करायची
'हम जब होंगे साठ साल के …या गाण्याच्या चालीवर स्पेशली जेव्हा तो म्हणतो ….
लंबी सी एक गाडी मे फिर तुमको लेकर जाऊंगा
तुम अंदर से देखना बाहर और मै आईस्क्रीम खाउंगा
काही जाहिराती बघताना, चित्रपट-नाटक बघताना प्रेक्षकाच्या मनात काही पंच लाईन्स उमटतात. त्या इथे लिहूयात.
सध्या जाहिरातीत तर इतक्या गमती जमती असतात की रोज काही ना काही घरात गमतीशीर संवाद होतातच.
ते इथे लिहू, वाचू, थोडे हसू
यावर्षीच्या तिन्ही दवंड्या आणि जाहिराती आवडल्या, कल्पक वाटल्या असे बर्याच मायबोलीकरांनी आम्हाला सांगितले. या सगळ्याच जाहिराती इथे एकत्रीत स्वरूपात देत आहोत.
१) दवंडी पहिली
प्रस्तुत आहेत, काही जुन्या प्रसिद्ध जाहिराती ....
माझ्या ("व्यंगचित्रकाराच्या") मिस्कील तिरकस नजरेतून...
वाचतांना मूऴ जाहिराती आठवल्यास वाचनाचा आनंद आणखी वाढेल यात शंका नाही....
अशा प्रकारचा माझा हा पहिलाच प्रयोग....मूळ जाहिराती मुद्दाम येथे सांगत नाही... तो तुमच्यासाठी होमवर्क समजा! जागोजागी हिन्ट दिल्या आहेतच.
(१)
'रोहते' या गावी एक 'वीर' खेळाडू , 'उसने' अवसान चेहेऱ्यावर आणून ऊस खाणाऱ्या एका 'पायल' वाजवत असलेल्या अभिनेत्रीला म्हणतो :
"काय गं, तुझ्या मजबूत दातांचे रहस्य मला सांगतेस का?"
वर्षाविहार(२४ जुलै २०११)- फार्मलाईफ इथे वविकरांसमोर व्यक्त केलेलं मनोगत
***
नमस्कार मित्रांनो.