गणेशोत्सवातच नव्हे तर मायबोलीवरही पाककृती लिहायची ही पहिलीच वेळ आहे . त्यामुळे अस्मादिकास सांभाळून घ्यावे ही नम्र विनंती.
तर आधीचे दोन प्रयोग फसल्यावर जाऊ दे आता म्हणून आधीच शस्त्र टाकून झाली होती.पण डोक्यातला किडा काही स्वस्थ बसवू देईना. त्यामुळे डोकं शिणवत असताना ही रेसिपी आठवली . आधीचे प्रयोग फसल्यावर (पक्षी -किचन मध्ये सांडलवंड केल्यावर ) आता मातेकडून हे शेवटचं असा अल्टिमेटम मिळाला होता .पण god help to them, those help themselves . तर आता बघूयात रेसिपी .
साहित्य
सनी लायनचे वीतभर कपडे - नाही फक्त प्रौढांसाठी,
तर लायन द सिंहासारखे काळीज असणारया सर्वांसाठी..
फक्त वीतभर कपडे अंगावर नेसून घराबाहेर पडण्याचे धाडस कधी केले आहे का?
कधी तशी ईच्छा झाली आहे का?
जर पहिल्या प्रश्नाचे ऊत्तर "नाही" आणि दुसरयाचे "हो" असेल, तर आता तुमची प्रतिक्षा संपली आहे.
डाल डाल पे बेबी डॉल आता घेऊन येत आहेत फक्त एका काडेपेटीत मावणारे अंगभर कपडे.
दचकलात!
पण हे खरे आहे. काडेपेटी उघडून अंतर्वस्त्रासमान भासणारया त्या कपड्यांकडे पाहून दचकू नका.
हे घालून आपण चारचौघात गेलो तर आपली लाज नाही का जाणार या विचारांनी गचकू नका.
कविकल्पना - ५ - तर मी आज असा नसतो
![vastram 3.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10863/vastram%203.jpg)
वस्त्रम आयुर्वेद कपड्यांच्या यशस्वी उद्योगानंतर ग्राहकांच्या आग्रहाखातर घेऊन आले आहे वस्त्रमचे आयुर्वेदिक बि२ तेल
या तेलाच्या वापराने तना मनावरची अतिरिक्त चरबी विरघळन जाते.
स्वयंपाकात याचा नियमित वापर केल्यास स्वास्थ मिळते
डोक्याला लावल्यास सोशल नेटवर्किंगवरचे ताणही दूर पळतात
*सध्या याची कॉम्प्लिमेन्टरी ऑफर चालू आहे. वस्त्रमच्या इतर उत्पादनांसोबत हे तेल सॅम्पल म्हणून देत आहोतच. आणि रु.५०००/- च्या इतर खरेदीवर १ लिटर तेल मोफत आहे.
* अटी लागू
रेवतीची गेल्या वर्षीच्या गणपतीपासुनच वेगवेगळ्या आकाराचे उकडीचे मोदक करायाला सुरुवात झाली होती. यावर्षी बाप्पाला चिरणे वापरुन केलेले स्टार फिश, सर्कल, आयत असे नवीन आकारातले मोदक खायला मिळाले.
आज तर सकाळपासुन "मी तुला मदत करणार" असा घोशा सुरु होता, इतके कि आन्घोळ झाल्याशिवाय मदतीला घेणार नाही सांगितल्यावर रोजची अर्ध्या तासाची आंघोळ आज १० मिनिटात आवरली. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कविकल्पना - ४ - तुझे ते खळखळून हसणे
कविकल्पना - ३ - मृगजळ
तर यंदाच्या गणेशोत्सवात बुद्धीच्या देवाला नमन करून मनातल्या ह्या कविला बाहेर पडू द्या.
संकल्पना अतिशय सोपी आहे. हा खेळ आहे, स्पर्धा नाही. बंधने काहीच नाहीत.
आम्ही आपल्याला कवितांसाठी काही शीर्षके देत आहोत. तुम्ही त्यावर आधारित कविता करायच्या आहेत. कवितेला फॉर्मचे बंधन नाही - मुक्त छंदापासून गझलेपर्यंत काहीही चालेल. एका आयडीने एका किंवा अनेक शीर्षकांवर किती कविता करायच्या ह्याला कसलेही बंधन नाही. शीर्षक कवितेमधे आलेच पाहिजे असा आग्रह नाही. शीर्षक रुढार्थानेच वापरायला हवे असे बंधन नाही.
थोडक्यात काय तर 'होऊ दे खर्च'
जाहीरातीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे उल्लेखलेल्या सुपर्रस्टार कलाकारांबद्दल मनात प्रचंड आदर आणि प्रेम आहे, त्यांची माफी मागूनच प्रकाशित करत आहे ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
____________________________________
"काय हो स्वप्निलची आई, कश्या आहात?"
"मी बरी आहे हो सईची आई, पण आमच्या स्वप्निलची ऊंची काही वाढतच नाही. तुमची सई आणि मुक्ता आहे म्हणून ठिक आहे. पण बाकीच्या मैत्रीणी त्याला खेळायला घेतच नाहीत"
"तुम्ही त्याची ऊंची वाढायला काय करता?"
"अहो रोज बाटलीने दूध पाजते"
रेडियो कमर्शियल
आई गं! वैतागले मी या कपड्यांना!
अगं असं झालं तरी काय?
आता काय सांगू? 10,000 steps a day केलं, आय एफ डाएट केलं, तरी हे कपडे दिवसेंदिवस घट्टच होतात !
अगं, पण तू पलाशचे डिझायनर आयुर्वेदिक 'मेदोहर' कपडे का वापरत नाहीस? त्यामुळे जठराग्नी प्रदीप्त होऊन चयापचय क्रिया वेगाने झाल्याने मेदोहरण तर होतेच , शिवाय रक्ताभिसरण सुधारून त्वचाही कांतिमान होते.
श्री गणरायाला वंदन करुन सादर करत आहोत खास सोशल मिडीया सॅव्ही मंडळीसाठी आमचे एक खास प्रॉडक्ट.
स दा पडीक ऑन सोशल मीडिया सर्व्हिस एजेंसी चे "द ग्रेट वॉल ऑफ पोस्ट्स "फेसबुक स्टेट्स पॅकेज!! एकदा अनुभव घ्या आणि कायमचे गिर्हाईक व्हा !
![FB screen -1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u35788/FB%20screen%20-1.jpg)
आमची खास पॅकेजेस पुढीलप्रमाणे
![FB SCREEN 2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u35788/FB%20SCREEN%202.jpg)
आणि हे