जाहीरातीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे उल्लेखलेल्या सुपर्रस्टार कलाकारांबद्दल मनात प्रचंड आदर आणि प्रेम आहे, त्यांची माफी मागूनच प्रकाशित करत आहे
____________________________________
"काय हो स्वप्निलची आई, कश्या आहात?"
"मी बरी आहे हो सईची आई, पण आमच्या स्वप्निलची ऊंची काही वाढतच नाही. तुमची सई आणि मुक्ता आहे म्हणून ठिक आहे. पण बाकीच्या मैत्रीणी त्याला खेळायला घेतच नाहीत"
"तुम्ही त्याची ऊंची वाढायला काय करता?"
"अहो रोज बाटलीने दूध पाजते"
"अश्याने बाटलीतले अल्कोहोल त्याला मिळत असेल. पण दूधातले कॅल्शिअम त्याला मिळतेय का?"
"हो तर, मी त्यात "शशशशश् शाहरलिक्स" पावडर सुद्धा टाकते. त्यात कककककॅल्शिअम खूप असते. आमचा पोरगा शाखाहारी आहे ना"
"हो पण ते कॅल्शिअम त्याला योग्य दिशेत मिळतेय का?"
"आई ग्ग, आता हे आणखी काय नवीन?"
"ते तुम्हाला आमची सई सांगेल"
"अय्या, सई डॉक्टर झाली? कपड्यांवरून वाटत नाही"
"हो ती जरा दुनियादारी करायला लागल्यापासून ...."
"
(टिंगटाँग टाईमप्लीज - अवांतर गप्पांनी जाहीरात मोठी होतेय आणि खर्च जास्त होतोय. पण करणार काय. तीन बायका, गपचूप आईका. कोण रोखणार त्यांच्या अवांतर गप्पा)
"
"तर काकू मी तुम्हाला सांगते. कॅल्शिअम योग्य दिशेत न मिळाल्याने तुमचा स्वप्निल उभा न वाढता आडवा तिडवा वाढलाय. पण तरीही मला तो आवडतो. इश्यss..
पण तुम्हाला सांगते या शाहरलिक्स आणि सल्लूरिक्सने काही होत नाही. त्यापेक्षा तुम्ही त्याला 'तमिताभ' चालू करा.
नाहीतर तुमचा स्वप्निल कककक् करन अर्जुन बनून राहील. त्याला 'आज का अर्जुन' बनवायचे असेल तर तमिताभला पर्याय नाही.
........... हसताय काय? स्वप्निलच्या आईला समजले. तुम्हाला कधी समजणार?? तुम्हाला आपल्या पोरांना 'डॉन' बनवायचे आहे की 'डॉन' 'डुप्लिकेट' हे आजच ठरवा.
तरुण तुर्क असाल किंवा म्हातारे अर्क असाल, फक्त एक गोळी तुम्हाला बनवू शकते 'बादशाह' पासून 'लाल बादशाह'.
ऊंची सोबत आपल्या मैत्रीणींची कक्षा देखील वाढवा.
केवळ जया वर समाधान मानू नका. सोबत जयाप्रदा देखील मिळवा.
बिंदू'पासून रेखा'पर्यंतचा प्रवास, फक्त नव्याण्णव रुपयात.
रोज फक्त एक चमचा पावडर, एक बाटली दूधात!
सर्वप्रथम बूकींग करणारया शंभर ग्राहकांना एका तमिताभ पावडर डब्यासोबत एक निप्पल बाटली फ्री! फ्री! फ्री!
बंटी, बबली आणि पिंट्यासाठी तीन आकर्षक फ्लेवरमध्ये उपलब्ध -
वॅनिला, स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट.
यम्मी टम्मी आय लव्ह यू मम्मी
चिंकी, पिंकी आणि मोनासाठी तीन आकर्षक कलरमध्ये उपलब्ध -
पीकॉक ग्रीन, बेबी पिंक आणि लॅवेंडर.
खा, प्या, अंगाला चोळा..
रुक्मिणी, यशोदा आणि सखूबाईंसाठी तीन आकर्षक सुवासांमध्ये उपलब्ध - बकुळा, मोगरा आणि सदाफुली.
सुवास भरा जीवनात आणि जा दोन फूट गगनात.
सर्वच वयोगटातल्या पुरुषांसाठी खास घेऊन येत आहोत टॉल एण्ड हॅन्डसम 'वोडका तमिताभ'
फुल्ल टाईट, वाढू दे हाईट!
दूध प्यायचा कंटाळा करणारया पोरांसाठी खास 'तमिताभ बाकरवड्या'
एकच बाईट, वाढली ना हाईट !
आणि लवकरच घेऊन येत आहोत आपल्या मराठमोळ्या लोकांसाठी खास 'मिसो तमिताभ!'
बघतोस काय, पगडी सांभाळ.
हाईट वाढवलीय वाघाने !
तर आजच संपर्क करा.
दक्षिण मुंबई, प्रेमगली, खोली नंबर चारसो बीस
....
...
..
.
ऑफर ! ऑफर ! ऑफर !
आता तमिताभ ऊंचे लोग उंची पसंदच्या तीन पावडरी ऑर्डर करा. आणि सोबत मिळवा तीन टनाटण साबू हातरुमाल फ्री फ्री फ्री !!!
ईथे पहा - https://www.maayboli.com/node/63763
मस्त पैकी शाखा स्वजोचे फोटो
मस्त पैकी शाखा स्वजोचे फोटो टाकून जाहीरात सजवायची प्रबळ ईच्छा होती. पण तांत्रिक कारणाने सध्या फोटो टाकू शकत नाही. तरी धागा काढून मायबोली गणेशोत्सवात भाग घेता आला यासाठीच बाप्पांचे आभार __/\__
बाबो
बाबो
मोठी जाहिरात आणि वाईड प्रोडक्ट रेंज☺️☺️
रून्म्या , आवडली रे ...
रून्म्या , आवडली रे ...
मस्त!
मस्त!
मी अनू, जब मिल बैठेंगे तीन
मी अनू, जब मिल बैठेंगे तीन सुपर्रस्टार... स्वजो, शाखा और अमिताभ.. एवढा मोठा कॅनवास तर त्यांना लागणारच. यांचा पिच्चर साडेतीन तासांच्या आत कसा संपवायचा
अबे एवढी पसरलेली असते का ad .
अबे एवढी पसरलेली असते का ad .
चांगला प्रयत्न .
Evdhi moththi ad????
Evdhi moththi ad????
Pn mastay..
जिंकलास शाहरुख..
जिंकलास शाहरुख..
मतदान फिक्स..
ऋन्मेष नाही बरं.. स्वप्नील
ऋन्मेष नाही बरं.. स्वप्नील सारखीच पसरट झालीये ऍड
वृत्तपत्र जाहीरात नियम
वृत्तपत्र जाहीरात नियम क्रमांक 1
जाहीरात जेवढी मोठी आणि पानभर तेवढे त्या ब्राण्डबद्दल लोकांना "हे काहीतरी भारी दिसतेय" ही फिलींग जास्त
भारी
भारी
संयोजकांना नियम दाखविण्याचं
संयोजकांना नियम दाखविण्याचं सिंहासारखं धाडस!!
ऋ, आता B2 न् कपड्याचं मनावर घ्या!
ऋ, मस्त जमलीय .
ऋ, मस्त जमलीय .
मी खर तर वाटच बघत होते तुझ्या जाहिरातीची .
संयोजकांना नियम दाखविण्याचं
संयोजकांना नियम दाखविण्याचं सिंहासारखं धाडस!!
>>>>>
अरे ए कोण आहे यातले संयोजक.. सॉरी सॉरी.. मला नव्हतं माहीत.. मी तर आपलं ते गंमत करत होतो.. मला सवय आहे ना.. त्याने प्रतिसाद वाढतात.. एकवेळ माफ करा मला.. जाहीरात छोटीच हवी.. मी उगाच आपले काहीतरी लिखाणाची हौस भागवत बसलो.. पुढची जाहीरात छोटीच काढतो.. छोट्यात छोटी काढतो.. अरे देवा मी तांत्रिक लफड्यात अडकलो नसतो तर .. माझा मोबाईलवरून फोटो अपलोड होत नाहीये.. नाहीतर एका फोटोतच बसवली असती
राहुल,
राहुल,
वैयक्तिक id ने लिहिलेली मते id ची वैयक्तिक मते असतात, , संयोजकांची नाहीत,
राहुल,
राहुल,
वैयक्तिक id ने लिहिलेली मते id ची वैयक्तिक मते असतात, , संयोजकांची नाहीत,
हो. सॉरी.
पण मी, ते गंमतीनं बोललेलो! स्मायली म्हणूनच टाकलेली.
भारी जमलीये..
भारी जमलीये..
हो, सिम्बा राहुल नक्कीच. मी
हो, सिम्बा राहुल नक्कीच. मी देखील ते मस्करीतच घेतले होते. ती नियमाची पोस्टही टाईमपासच होती.
चला आता गैरसमज दूर झाले असतील तर आपण तीन यार संध्याकाळी प्यायला बसूया..... मी घरना पावडर घेऊन येतो. उंचे लोग ऊंची पसंद.. तमिताभ
"अश्याने बाटलीतले अल्कोहोल
"अश्याने बाटलीतले अल्कोहोल त्याला मिळत असेल. पण दूधातले कॅल्शिअम त्याला मिळतेय का?">>>
तर काकू मी तुम्हाला सांगते. कॅल्शिअम योग्य दिशेत न मिळाल्याने तुमचा स्वप्निल उभा न वाढता आडवा तिडवा वाढलाय. पण तरीही मला तो आवडतो. >>>>
पेपरातिल फ्रंट पेजवरची
पेपरातिल फ्रंट पेजवरची जाहिरात वाटते
पंचेस् पण लईभारी जमलेत
आमचा पोरगा शाखाहारी आहे ना" >>>
(No subject)
हा हा.. मस्त आहे.. लिंक देतो
हा हा.. मस्त आहे.. लिंक देतो स्वप्नील ला मी.
च्रप्स, कुठल्या स्वप्निलला?
च्रप्स, कुठल्या स्वप्निलला? जोशीकाकूंच्या का?
मागे एकाने माझा सईचा लेख तिला ट्विटरवर दिलेला. सईनेही रिट्वीट केलेला. मग ईथे जे प्रतिसाद आले ते पाहता ते ट्वीट गायबच झाले. मला मेल्याहून मेल्यासारखे झालेले. तेव्हापासून आतापर्यण्त सईपासून तोंड लपवत फिरतोय.. आणि ती बिचारी एकटीच गातेय.. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो ..
मस्त
मस्त
छान आहे अॅड.
छान आहे अॅड.
>>आमचा पोरगा शाखाहारी आहे ना
>>आमचा पोरगा शाखाहारी आहे ना

संमिश्र प्रतिसाद आले.
संमिश्र प्रतिसाद आले.
सर्वांचेच आभार
वॉल स्ट्रीट जर्नल मधल्या पान
वॉल स्ट्रीट जर्नल मधल्या पान भर अॅड ला पुरेल एवढं मटेरियल आहे एकाच झायरातीत
तरी थोडी जागा ठेवायला सांगा
तरी थोडी जागा ठेवायला सांगा त्या ईंग्लिश संपादकांना. आमच्या स्वप्निलचा अजून फोटो यायचाय जाहीरातीत.
मस्तच
मस्तच
Pages