रामन राघव टू ट्रॅप्डः व्हाया फियर स्टेशन्स
स्वतःमध्ये कायमस्वरूपी वस्ती करून असलेली भिती आणि दहशत संपवायची असेल तर एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे ती भिती आणि दहशत कुठचाही मुलाहिजा न ठेवता दुसर्यांना दाखवणे- हे 'रामन राघव' मधल्या 'रामन'ने मांडून दाखवलं, तेव्हा अंगावर काटा आला. नंतर विचार केल्यावर लक्षात आलं- हे असंच असतं हे आपल्याला आधीच माहिती आहे. फारतर त्याच्या अनेक व्यत्यासांच्या आणि उपप्रमेयांच्या स्वरूपात माहिती होतं.