" हे घे, माझ्या शरीरातून बाहेर पडणारं उष्ण रक्त तुझी तहान भागवायला पुरेसं असेल, तर हे घे..." हाशिम आपल्या हातावर धारदार सुरीच्या पात्याने जखमा करत ओरडला. त्या भयाण स्मशानात आजूबाजूला काहीही दिसत नसलं, तरी अदृश्य रूपात का होईना, ते रक्तसंमंध आहे आणि त्याची तहान मनुष्याच्या रक्ताशिवाय कशानेच भागात नाही हे त्याला माहित होत. प्रत्येक अमावास्येच्या रात्री तो असाच गावाबाहेरच्या त्या कब्रिस्तानात यायचा. इथे लोक दिवसासुद्धा पाऊल ठेवायला घाबरायचे. कोणी गावात गेलं तरच गावातली इतर मंडळी इथे यायची. लहान मुलं, स्त्रिया आणि जनावरांना तर इथे आणायला सक्त मनाई होती.
अब्दुल झपझप पावलं टाकत वाळू तुडवत आपल्या गावाकडे चालला होता. गाव बरच लांब होतं. ज्या रस्त्याने आपण गावाकडे चाललोय, त्या रस्त्यावर गाव यायच्या आधी कब्रिस्तान आहे आणि त्या कब्रिस्तानाच्या बाजूने जाणाऱ्या कोणत्याही जिवंत माणसाला सूर्यास्तानंतर कब्रिस्तानातले सैतान पकडतात आणि आपली रक्ताची तहान भागवून कब्रिस्तानबाहेर फेकून देतात अशी त्याच्या गावात अनेक वर्षांपासून लोकांना ऐकिवात असलेली दंतकथा त्याच्या मनात रेंगाळत होती. गावापासून चाळीस मैलांवर असलेल्या बाजारात तो आपला माल विकायला पहाटेच गेला होता.
सुरा हे वाळवंटातल्या गोड्या पाण्याच्या झऱ्याकाठी ऐसपैस पहुडलेलं एक सुखवस्तू गाव होतं. गावात मोजकेच लोक असले, तरी ते सगळे गुण्यागोविंदाने राहात होते. गावात कोणीही एकमेकांशी भांडण करणं, मारामार्या करणं असले प्रकार करत नसत. दार आठवड्याला शुक्रवारी जिरगा ( पंचायत ) जमवून सगळ्या तक्रारींचा निवाडा व्हायचा आणि दोन्ही बाजू ऐकून मौलवी, पंच आणि गावातले ज्येष्ठ हे सगळं कामकाज चालवायचे.
अब्दुल्ला आणि त्याची बायको एका छोट्याशा पडक्या घरात कसेबसे दिवस कंठत होते। घरात दोन वेळच्या खायची पंचाईत होती। दिवसभर गावात राब राब राबून ते शेवटी जे मिळेल ते एकत्र करून कसंबसं पोट भरायचे। मुलं नसल्यामुळे अक्खा गाव ' वांझोटी' म्हणत असलं, तरी अब्दुल्लाचं त्याच्या बायकोवर प्रचंड प्रेम होतं। गावात श्रीमंत लोक भरपूर होते आणि त्यांच्याकडे कामं करायला त्यांनी लांबवरून कोणाकोणाला गुलाम म्हणून विकत आणलं होतं। अब्दुल्ला अशाच एका गुलामांच्या तांड्यासोबत गावात आलेला होता आणि त्याला इतर गुलामांबरोबर गावाच्या वेशीबाहेर खास त्यांच्यासाठी तयार केलेल्या तोडक्यामोडक्या घरांपैकी एका घरात जागा मिळाली होती। त्
पहाटे पहाटे करीम बाजल्यावरून उठला। घराच्या आत झोपण्यापेक्षा त्याला घरच्या गच्चीवर मोकळ्या हवेत झोपायला आवडायचं. सूर्याच्या पहिल्या किरणांनी वाळूवर रेघा मारायला सुरुवात केली कि त्याला आपसूक जाग यायची. त्यानंतर तो थोडा वेळ गच्चीवरच हात-पाय पसरून शरीराचे स्नायू मोकळे करून घ्यायचा. गच्चीवरून खाली उतरून त्याने हात-तोंड धुतलं आणि चबुतऱ्यावर बैठक मारली. सवयीप्रमाणे त्याने डोक्याला मुंडासं बांधलं आणि अंगावर बंडी चढवली. कमरेची लुंगी त्याने बदलली आणि शेवटी अंगावर गुढघ्याच्या जरा खाली जाणारा अंगरखा घातला.
माझ्या UAE मधल्या १०-१२ वर्षांच्या प्रवासात मी अनेक लोकांना भेटलो आणि त्यांच्याशी अनेक विषयांवर बोललो.काही अनुभव अतिशय वाईट होते , पण 'जे जे उत्तम उदात्त उज्ज्वल ' ते ते घेऊन अनुभवाची शिदोरी अधिकाधिक समृद्ध करणं या एकाच ध्येयाने मी आजवर पुढे जात आलो आहे.
"कुssईं.... चला पिलांनो, इकडं या!", चंपकारण्य जंगलातल्या कोल्ह्यांच्या कळपातली एक आज्जी कोल्ही उन्हाळ्यातल्या एका गरम दुपारी कळपातल्या सगळ्या छोटुल्या कोल्ह्यांना हाक मारत होती. उंच कपॉक वृक्षाच्या ढमाल्ल्या खोडाच्या पायथ्याशी गारेगार हिरव्या सावलीत ती बसली होती. नुकतीच पाणी पिऊन आलेली पिल्लं उन्हात पळू नयेत, म्हणून आज्जीने आज एक गोष्ट सांगण्याचा घाट घातला होता.
फार फार वर्षांपूर्वी आकाशात दहा सूर्य राहायचे. बापरे! ही कल्पनाच किती भयानक आहे. बिचाऱ्या पृथ्वीची जमीन म्हणजे नुसता तापलेला तवा असायची त्याकाळी. त्याकाळातली लोकं नेहमी उन्हाच्या तापाने कावलेली असायची. कधी म्हणून थंडी नाही, जरा म्हणून रात्र नाही, आकाशात गुलाबी रंगाची जराही निशाणी नाही. अगदी तप्त आयुष्य.