माझ्या UAE मधल्या १०-१२ वर्षांच्या प्रवासात मी अनेक लोकांना भेटलो आणि त्यांच्याशी अनेक विषयांवर बोललो.काही अनुभव अतिशय वाईट होते , पण 'जे जे उत्तम उदात्त उज्ज्वल ' ते ते घेऊन अनुभवाची शिदोरी अधिकाधिक समृद्ध करणं या एकाच ध्येयाने मी आजवर पुढे जात आलो आहे.
इथेही मला छान छान गोष्टी सांगणारे आजोबा भेटले , वेगवेगळ्या लोककथा रंगवून रंगवून सांगणारे गोष्टीवेल्हाळ भेटले आणि कधी कधी लहान असताना स्वतःच्या आज्जी-आजोबांकडून ऐकलेल्या गोष्टी मला सांगणारे समवयस्क मित्रही भेटले. जगाच्या पाठीवर कुठेही जा , आज्जी-आजोबांकडून ऐकलेल्या गोष्टी आणि स्थानिक लोककथा या दोन गोष्टींचा खजिना सापडतोच सापडतो. अनेक लोकांनी यातल्या लोकप्रिय गोष्टी - उदाहरणार्थ ARABIAN NIGHTS - लहानपणी नक्कीच ऐकल्या किंवा वाचल्या आहेत. इसापनीतीमध्ये सुद्धा अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांचं अरबस्तानाशी घट्ट नातं आहे. या सगळ्या गोष्टींपलीकडच्या अरबी लोकांमध्ये प्रचलित असलेल्या शेकडों स्थानिक लोककथा आणि गूढकथा यांची ओळख करून द्यायचा हा एक प्रयत्न. या कथा मी ज्या लोकांकडून ऐकल्या त्यांनी मला त्याबद्दल इतकंच सांगितलं की या पुस्तकरूपाने किंवा इतर तत्सम माध्यमातून प्रकाशित झालेल्या नाहीत कारण त्या घरी गप्पांच्या मैफिलीत सांगितल्या गेलेल्या ' गुजगोष्टींसारख्या' आहेत. त्यामुळे या कथांचं मूळ शोधायच्या फंदात ना पडता मी फक्त त्यांचं मराठीत रूपांतरण करण्याचा प्रयत्न केला आहे.
या कथांचा संबंध अरबस्तानाशी असल्यामुळे त्यांचे अनेक स्थानिक तसेच सांस्कृतिक संदर्भ या कथांमध्ये डोकावताना दिसतील. Stanislavskee या प्रख्यात नाट्यगुरुंनी सांगितल्याप्रमाणे ' if I was there ' या पद्धतीला अनुसरून या कथांमध्ये नायक, खलनायक, गूढ शक्ती, स्त्रीपुरुष या सगळ्यांबद्दल लिहिताना स्वतः तिथे आहोत अशी कल्पना करून या कथा भाषांतरित केलेल्या असल्यामुळे त्यात काही प्रमाणात नाट्यमयता आलेली असू शकते. तरीही प्रस्तुत लेखकाचा हा लेखनप्रयास आणि लेखनप्रवास गोड मानून घ्यावा अशी कळकळीची विनंती.
वाचण्यास उत्सुक आहे
वाचण्यास उत्सुक आहे
उत्सुक आहे वाचायला... येऊ
उत्सुक आहे वाचायला... येऊ द्या...
सध्या एकूण पाच गोष्टी पोस्ट
धन्यवाद ! सध्या एकूण पाच गोष्टी पोस्ट केल्या आहेत. सवडीने जितकं लिहीत जाईन तितकं येथे पोस्ट करेनच.
माझ्या ब्लॉग्सना भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. शक्य असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना ब्लॉग वाचण्याची माझ्यातर्फे विनंती करा.
https://humansinthecrowd.blogspot.com/
https://demonsinthecrowd.blogspot.com/
वाचतो...मा. बो. वर स्वागत...
वाचतो...मा. बो. वर स्वागत...
चांगलं लिहितांय. तुर्तास,
चांगलं लिहितांय. तुर्तास, माबो कुटुंबात एक वेलकम अॅडिशन एव्हढं नक्कि म्हणेन...
धन्यवाद!
धन्यवाद!
सुंदर लिहिले आहे, आवडलं
सुंदर लिहिले आहे, आवडलं लिहिलेलं
मा बो वर स्वागत !!
नमस्कार
नमस्कार
आजच्या सोमवारच्या कामातूनही तुकड्या तुकड्यातून जवळपास सगळा ब्लॉग वाचून काढलाय.
अव्वल आणि अस्सल लिखाण आहे हे. मला हे सर्व लिखाण एकत्रित पुस्तक स्वरुपात वाचायला आवडेल.
मला ह्याचे पुस्तक पाहिजे म्हणजे पाहिजेच.
आपल्या प्रतिक्रिया वाचून
आपल्या प्रतिक्रिया वाचून अतिशय आनंद झाला. माझ्या बाजूने १००% प्रयत्न असेल हे नक्की.
वाह! मस्त सुरुवात.
वाह! मस्त सुरुवात.
https://humansinthecrowd
https://humansinthecrowd.blogspot.com तसच https://demonsinthecrowd.blogspot.com हा माझा वैयक्तिक ब्लॉग आहे. कृपया ब्लॉग वर लेख वाचून प्रतिक्रिया नोंदवावी, हि विनंती.
मायबोलीवर स्वागत. एक दोन लेख
मायबोलीवर स्वागत. एक दोन लेख चाळले. इण्टरेस्टिंग दिसत आहेत. नक्कीच वाचणार आहे.
जुना जाणता वगैरे नाही पण इथे बरीच वर्षे असलेला सदस्य म्हणून काही सल्ले:
१. सगळे किंवा अनेक लेख एकदम इथे टाकू नका. रोज एक दोन लेख आले तर ते वाचले जातील. एकाच लेखकाचे इतके लेख एकाच दिवशी वाचले जात नाहीत. मग ते हळुहळू तिसर्या चौथ्या पानाच्या पुढे - म्हणजे ब्लॅक होल मधे- जातील, आणि कोणी आवर्जून वर आणल्याशिवाय पुन्हा ते इतरांसमोर येणार नाहीत. गूगल सर्च सारखेच लोक पहिली एक दोन पाने वाचतात.
२. दुसरे म्हणजे आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेची ताबडतोब दखल घेण्याची गरज नाही. तो इथला पॅटर्न नाही. शक्यतो लोकांना एक दोन दिवस देउन मग एकत्रित दखल घेण्याची इथली पद्धत आहे. पण तो काही नियम नाही तेव्हा पाळायलाच पाहिजे असे नाही. फक्त एक सल्ला.
३. ट्रोलिंग इथे भरपूर होईल. किंवा ट्रोलिंग नसणार्या पण एकदम निगेटिव्ह किंवा अवांतर प्रतिक्रियाही येतील. त्यांना पुढे पोस्ट बाय पोस्ट किती एंगेज करायचे हे तुमच्यावर आहे. एक लेखक म्हणून जेव्हा आपण ५० प्रतिक्रिया पाहतो आणि वाचल्यावर जर त्यातील ४० प्रतिक्रिया अवांतर असतील तर लिहीणार्याचा विरस होतो आणि इतर वाचकांनाही कंटाळा येतो. हे तुम्हाला किती चालेल ते तुम्ही ठरवा पण इतर अनुभवांवरून सांगितले.
४. हे तुम्ही केले आहे की नाही कल्पना नाही, पण इथे कोणाला सर वगैरे म्हणू नका
Saw this now. Please
Saw this now. Please disregard my comment on सफर.
Keep writing. Thanks.