लोककथा
हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - ४ : साक्ष चमकणार्या पाण्याची!
हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - ३: ओहिया आणि लेहुआची प्रेमकहाणी
हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - २: कालो आणि हालोआची कथा
हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - १ :पार्श्वभूमी
दगडाचे सुप , अजुन एक लोककथा !
उरल डोंगररांगा रशिया देशाच्या पश्चिमेला आहेत व पार उत्तर दक्षिण पसरलेल्या आहेत, ह्या पर्वतराजीतल्या उत्तरेकडच्या टोकाला भयानक थंडी असते, तिकडच्याच एका गावात घडलेली ही गोष्ट. नादिया नावाची एक म्हातारी स्त्री गावाबाहेर आपल्या रानातल्या प्लम व चेरींच्या टुमदार बगिच्यात लहानशी बंगली बांधुन राहात असे, दुर्दैवाने तिचा मुलगा तुर्कांसोबतच्या युद्धात दुर दक्षिणेला कॉकेशस पर्वतांमधे झालेल्या एका युद्धात झार मालकांसाठी मरण पावला होता, व तिचा नवरा एकदा उरल मधेच तावदा नदीत मासे पकडायला गेला असताना मरण पावला होता "ग्रेगोरी गेला" हे ऐकुनच तिला धक्का बसला होता.
लक्ष्मी अन अवदसा
राधा
"कोण आहे गं तिकडे ? दिवसाचे ३ प्रहर उलटून गेले, तरी या महाली आगमन झाले नाही अजून.
विसरली कि काय स्वारी ? आम्हाला कळत का नाही ? या महाली येऊन म्हणायचे, रुक्मीणी, तू आमची पट्टराणी. तूझा मान मोठा, आणि त्या महाली जाऊन म्हणायचे, तू सत्य माझी भामा, सत्यभामा." रुक्मीणीचा नूसता संताप झाला होता. आज स्वारी या महाली येणार होती म्हणून तिने सर्व सिद्धता करुन ठेवली होती.
घृतपूर, मोदक, क्षिरी भोजनासाठी, संगीतजलसे मनोरंजनासाठी, पुष्पशय्या सर्व काही होते. स्वारी आता त्या महाली, जायचेच विसरायला हवी, अशी मनिषा होती तिला.
चिरंजीव भव !
"वहिनी आटपली की नाही पूजा, अजून बराच पल्ला गाठायचा आहे. अयोध्यानगरी अजून बरीच योजने
दूर आहे." लक्ष्मणाने अधीरतेने विचारले.
सीतेने काही उत्तर द्यायच्या आधीच श्रीराम म्हणाले, " चौदा वर्षांपूर्वी याच मंडळींनी साश्रु नयनांनी, आपल्याला याच नदीतीरावरुन निरोप दिला होता. त्या काळापासून आपल्या प्रतिक्षेत आहेत हि मंडळी. मला वाटतं, आज आपण, इथेच थांबूया. उद्या प्रात:काळीच प्रस्थान करु."