बाई उडाली चंद्रापाशी - (चिनी लोककथेचा स्वैर अनुवाद)
Submitted by रमणी on 26 August, 2019 - 05:32
फार फार वर्षांपूर्वी आकाशात दहा सूर्य राहायचे. बापरे! ही कल्पनाच किती भयानक आहे. बिचाऱ्या पृथ्वीची जमीन म्हणजे नुसता तापलेला तवा असायची त्याकाळी. त्याकाळातली लोकं नेहमी उन्हाच्या तापाने कावलेली असायची. कधी म्हणून थंडी नाही, जरा म्हणून रात्र नाही, आकाशात गुलाबी रंगाची जराही निशाणी नाही. अगदी तप्त आयुष्य.
विषय: