कॉलेजचं कँटीन...., नेहमीप्रमाणेच गच्च भरलेलं !
"छोड यार, वो नही आनेवाली आज ! साल्ला, त्या खत्रुड सबनीसचा लेक्चर आहे बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा. तिच्या पुण्याचा प्रोफेसर तो. त्याचं लेक्चर सोडून काय येते तुझी छावी? तू आपला सुम्मडीमध्ये चाय पी आन जा लेक्चरला. क्युं रे चवन्नी, ठिक बोला ना?"
"गप्प बसा यार, ती येते म्हणालीय.. येणार म्हणजे येणारच! मला खात्री आहे, आपण आज तिला विचारणारच. मग साला जमीन - आसमान एक क्युं न हो जाये. आज आर या प्यार होवूनच जावदे."
"हाय रे मेरे मजनु, ये बोला ना तू बंबईवाली बात ! साल्या छटाक, पण मेरेको तो थोडा मुश्किलही लग रहा है यार ! मेरेको नै लगता ती हो म्हणेल म्हणून्..!"
"अबे चुप बैठनेका क्या लेगा? त्या डेथमिसचा लेक्चर संपायला आलाय, तो संपला की ती येइलच."
"साला ये अपने हिरो का दिमागभी एकदम खल्लास चलता है हा...., देठ मॅडमको डेथ मिस बना डाला एकदम."
"काय करू यार कशी म्हणते बघ ना.. प्लीज डोंट कॉल मी मॅडम, कॉल मी 'मिस देठ'. देठ कसली यार, बाभळीचं खोड आहे. दोन फुटावरून गेली तरी काटे टोचतात. मिस देठ कसली? डेथमिसच आहे ती !"
"ए मध्या, आली रे तूझी छावी, ती बघ कँटीनच्या दारात. साला बरोबर अपना डाव पण आहे. आज मै भी चान्स मारके देखु क्यां?"
"सायबा, हात जोडतो तुझ्यापुढे, आजचा दिवस काही राडा करू नको. आज मला तिला विचारायचंच आहे. मागच्या वेळी तुम्ही लोकांनी गोंधळ घातला होता तो पुरेसा आहे."
"ठिक है भिडू, अब दोस्तोसें छोकरी ज्यादा होने लगी. लेकीन मै अबभी बोलता है....वो नई मानेगी साला तू पक्का बंबैय्या आणि ती कट्टर पुणेकरीण!"
"गप्प बसा बे, ती जवळ येतेय...!"
.
.
.
"हाय , संपला लेक्चर?"
"लेक्चर संपलं का? अस्सं विचारायचं असतं. "संपला लेक्चर" काय? किती गावठी वाटतं ते. हो किनई गं?"
"हो ना..., मराठवाड्यातल्या कुठल्यातरी कोपर्यातल्या मागासलेल्या खेड्यातून आल्यासारखं वाटतं."
"ओ मॅडम्..आमच्या मराठवाड्याला नावं....."
"ए गप्प बस ना थोडा वेळ, मला बोलू दे ना."
"ठिक है यार..., घे आमी चुप होवून रायलो. तू बोलूनशान टाकच आता."
"ए... आय मिन.. म्हणजे मला असा म्हणायचा होता... म्हणजे मी विचार करत होता..म्हणजे...
"तुझं म्हणजे म्हणजे नक्की काय ते ठरलं की सांग मग आपण बोलू. ओक्के, तोवर आम्ही कॉफी घेतो."
"येस्..कॉफी..कॉफी, बरोबर हेच म्हणायचं होतं मला. आपण कॉफी घेवुया का? "
"चालेल पण तू पाजणार असशील तर, तुमचं मुंबईकरांचं ते टी टी एम एम करायचं असेल तर तुझ्या मित्रांबरोबर कर!"
"ह्या असं कस्सं बरं, आपण पाजणार ना कॉफी ! बिल पण आपणच देणार......! पण तू थोडी तिकडे येती का ? त्या टेबलावर? मला तुझ्याशी एकटीशीच कायतरी बोलायचा आहे?"
ती हळूच आपल्या मैत्रीणीकडे एक कटाक्ष टाकते, मैत्रीणीच्या डोळ्यातलं मिस्कील हसु पाहून खुसखसते....
"ठिक आहे चल आणि तू तूझी भाषा सुधार रे. कित्ती अशुद्ध बोलतोस. आमच्या पुण्यात बघ....! सदाशिवपेठ म्हणु नको, नारायण पेठ म्हणु नको, रवीवार पेठ म्हणु नको केवढं छान बोलतात नाहीतर ही तुमची मूबैय्या भाषा?" (फक्त 'ईइइइ करायचंच तेवढं बाकी, पण चेहर्यावरचे भाव पाहता त्याचीही गरज नसावी)
"ए तंबी..दो कॉफी उधर टेबल नं. पाच पें विथ सम समोसा और चार चाय इधर हमारे टेबलपें, मिस तुम्ही काय घेणार? बिल वो पाच नंबरवाला हिरोके खातेपें लिख देना रे."
"खाते पें कशाला मी रोख पेमेंट करेन. तुमच्यासारखा कडका नाहीये मी."
(फुकटभाऊंच्या फुकटेगिरीचा बदला घेण्याची संधी त्यानेही सोडली नाही)
************************************************************************************************************
"छान आहे ना इकडची कॉफी? बघ ना रंग केवढा छान, ब्राऊन कलरचा आलाय."
"हॅलो मी आज पीत नाहीये इथली कॉफी. कॉफीचा कलर ब्राऊनीशच असतो आणि छान वगैरे काही नाही..एक नंबरची रद्दड असते आपल्या कँटीनची कॉफी. आमच्या पुण्यातल्या बालगंधर्वला ये एकदा, नाहीतर रुपालीला मग कळेल कॉफी कशाला म्हणतात ते? आणि तू मला कॉफीचा रंग कसा आहे ते दाखवायला आणलेयस का या टेबलावर?"
"नाही..अगं खरेतर आपल्याला तुला काही तरी विचारायचे होते?"
"मग बोल ना? किती पाल्हाळ लावशील. तुम्ही मुंबईकर असेच हा... पॉइंटला येतच नाही लवकर...! नाहीतर आमच्या पुण्या....
"अगं म्हणजे.. म्हणजे तूला राग तर नाय येणार ना? असा बघ, आपल्याला तुला एवढंच विचारायचा होता....
"काय होता... विचारायचा?"
"अगं बोलतोयना आपण, जरा दम तरी खाशील का नाय? "
"नाही, मी ऑलरेडी सामोसा खातेय सॉसमध्ये बुडवून."
"ए मस्करी नाय पायजे यार, आपण एकदम सिरियस आहे. म्हणजे बघ.. जर आपण तूला विचारलं तर रागवायचा नाय. भलेपण तुझा जवाब कायपण असु देल आपली दोस्तीत फरक नाय पडायला पायजे. प्लीज्..कळतय ना आपण काय म्हणतोय ते! हे बघ आपल्याला तुला....
"आता बोलणार आहेस का मी जावू, माझी लेक्चरची वेळ होतेय. लेक्चर बंक करून तूला पायजे तर वडापावची गाडी लाव कॉलेजच्या बाहेर. मला मात्र बी.ई. पुर्ण करायचेय. तेव्हा लेक्चर इज मस्ट!"
"कायपण काय बोलते. गेली तीनपण वर्षे फर्स्ट क्लासमध्ये पास झालोय. लेक्चर बंक करून. तुझ्यासारखी ए.टी.के.टी. नायये आपल्याला....
"अं म्हणजे..म्हणजे आपल्याला तस्सं म्हणायचं नव्हतं. तुलाही काहीतरी प्रॉब्लेम्स असतील. म्हणुन राहीला असेल एखादा सब्जेक्ट. पण घाबरायचा नाय. आपण करेल ना मदत तुला."
"कसा? चिठ्ठ्या पोचवून? ते तुलाच लखलाभ... आता बोलतोयस का मी जावु?"
"कमॉन यार बोलतोय ना आपण! जरा शब्द तरी जुळवू देत... एवढा महत्त्वाचा प्रश्न विचारायचा म्हणजे थोडा विचार करायला नको."
आता मात्र तिची चलबिचल व्हायला लागली. आपल्या समोर काय वाढून ठेवलय याची तिला थोड्याफार प्रमाणात कल्पना यायली लागली होती.
"म्हणजे बघ, म्हणजे आपल्याला तुला असा विचारायचा होता.. म्हणजे असा म्हणायचा होता .. म्हणजे आपल्याबरोबर तू... म्हणजे तू आपल्याबरोबर...
"काय आपल्याबरोबर आणि तू लावलेयस? बोल ना पटकन... किती वेळ घेशील?"
तीही घायकुतीला आलेली.
"म्हणजे बघ आपल्याला एवढेच विचारायचेय की तू आपल्या बरोबर मायबोलीच्या वर्षाविहाराला येणार काय? नेहमीप्रमाणे यावर्षी मायबोलीची वर्षाविहारची सहल "कर्जत-चौक फाट्यापासुन साधारण ३०-३२ कि.मी. "फार्म लाईफ होलिडेज" म्हणुन एक मस्त रिसोर्ट आहे तिथे जाणार आहे, तू येणार का आपल्याबरोबर ? सकाळ जावुन संध्याकाळ परत येवु लगेच."
हुश्श, बोललो बाबा एकदाचा !"
तशी ती खळाळुन हसली.
"अय्या खर्रच ! कित्ती छान...!! गधड्या मला वाटलं होतं की तू "ते" विचारणार आहेस. आणि "हेच" विचारायचं होतं तर एवढं नमनाला घडाभर तेल कशाला. माबोच्या वविला मी येणारेच होते. फक्त आधी आमच्या पुण्याहुन येणार होते , आता तुझ्याबरोबर येइन. हाकानाका!"
"हायल्ला.... तुला आमच्या माबोची भाषा पण येताय की! "
"म्हणजे काय मी पण पक्की माबोकरीण आहे म्हटलं. रच्च्याक... माझी निराशा केलीस बरका तू!"
ती लटक्या रागाने म्हणते.
"आयल्ला, आय डी काय तुझा? एनी वेज, डोंट वरी डिअर, "ते" मी तिथेच विचारेल... सगळ्या मायबोलीकरांच्या साक्षीने, निसर्गाच्या सान्निध्यात, पावसाचा मस्त संगीत ऐकत्.....काय? पण तू उत्तर देणार ना लगेच."
"इश्श........, माझी लेक्चरची वेळ झालीय !"
ती उठून भराभरा चालायला लागते... तिच्याबरोबर तीची मैत्रीणही! ती दाराजवळ जावून परत थांबते...
"नक्की... मायबोलीच्या वर्षा विहार सहलीत, मायबोलीकरांच्या साक्षीने, जलधाराचं नर्तन पाहात आणि थेंबांचं संगीत ऐकत...!"
तो सुखावतो, एक नजर आपल्या दोस्त कंपनीकडे टाकतो....., आणि जोरात ओरडतो....
"ए तंबी पाच वर्षाविहार.... आपलं पेप्सी आणि पाच समोसा! जल्दी लाव.......!
तर मंडळी, यंदाचा मायबोली वर्षाविहार आहे २४ जुलै २०११ यादिवशी.
फार्म लाईफ रिसॉर्ट !!! ( http://www.farmlifeholidays.com )
तेव्हा मायबोलीच्या वर्षा विहार सहलीत, मायबोलीकरांच्या साक्षीने, जलधाराचं नर्तन पाहात आणि थेंबांचं संगीत ऐकत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ऐकायला तुम्हीही येणार ना?
वर्षाविहाराच्या इतर सविस्तर माहितीसाठी http://www.maayboli.com/node/26764 हे पहा.
यंदाच्या मायबोली-टीशर्ट च्या सर्व माहितीसाठी http://www.maayboli.com/node/26769 हे पहा.
आयला हे ववी आहे का विवाह मंडळ
आयला हे ववी आहे का विवाह मंडळ येणार तर कोण कोणास काय म्हणाले ते बघायला. वाटाण्याच्या अक्षता नाही लावणार
हायला मला आधी ललित वाटल ववि
हायला मला आधी ललित वाटल ववि वरच
गद्रेबाई,वृत्तांत म्हणायचा
गद्रेबाई,वृत्तांत म्हणायचा होता काय?
ओ संयोजक ती स्टार वाली लाईन
ओ संयोजक ती स्टार वाली लाईन जरा कमी करा की... केव्हढी ती लांब.. पानाच्या बाहेर जातंय सगळं..
आईशप्पत, हा नक्कीच सुक्या आणि
आईशप्पत, हा नक्कीच सुक्या आणि मृमधला सीन असणार.
आयला... सुक्याची बातमी लिक
आयला... सुक्याची बातमी लिक झाली का?
योडे.. वाचल्या वाचल्या हाच पहीला विचार माझ्याही डोक्यात आलेला.
श्या! काय बोअर मारलंय! बराच
श्या! काय बोअर मारलंय! बराच वेळ 'तदेव लग्नं सुदिनं तदेव' ची वाट पहात चुळबुळ करत होतो.
तेव्हा मायबोलीच्या वर्षा
तेव्हा मायबोलीच्या वर्षा विहार सहलीत, मायबोलीकरांच्या साक्षीने, जलधाराचं नर्तन पाहात आणि थेंबांचं संगीत ऐकत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ऐकायला तुम्हीही येणार ना?>>>>>प्रश्नोत्तराचा कार्यक्रम
अरे वा तारीख, ठिकाण ठरले तर.
अरे वा तारीख, ठिकाण ठरले तर. ते तेवढे बोल्ड करा आणि रीझॉर्टची लिंक पण द्या नावासोबत तिथेच.
रुनीला जोरदार अनुमोदन !!!
रुनीला जोरदार अनुमोदन !!!
ह्म्म्म्म्म्म
ह्म्म्म्म्म्म
मला पण सुकि आणि मृच
मला पण सुकि आणि मृच आठवले.
मस्त जमलंय हे ललित..