लेग लेक्सचे खग

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

काल येथुन जवळच असलेल्या लेग (Legg) लेक्सना नवी लेन्स (Olympus Zuiko four/thirds 70-300 35mm equivalent 140-600) अजमावयला म्हणुन गेलो होतो. ६० नंबरचा फ्रीवे बनवतांना माती करता खणलेले भल्यामोठ्या गड्ड्यांचे स्वरुप बदलवुन हे तीन कृत्रीम तलाव बनवण्यात आले आहेत. सप्ताहांताला थोडीफार गर्दी असते, खास करुन हिस्पॅनीक लोकांची. काही ठिकाणी बरळणारे रेडीओ पण ऐकु येतात. मास्यांसाठी गळ लाऊन खूप लोक बसले असतात.
पाणी म्हणजे पक्षी असे माझे साधे समीकरण होते. निराशा झाली नाही.

हात जरी स्थीर ठेवायला कठीण नसले तरी वजनामुळे ट्रायपॉड बरा पडतो. ट्रायपॉड वापरणे आत्ता थोडेबहुत जमु लागले आहे. तरी लेन्स बदलणे वगैरे सारखे प्रकार केले नाहीत. फोटो क्रॉप केले असले (काही वेळा योग्य आकारात बसविण्याकरता जरा जास्तच) तरी टच केलेले नाहीत - त्याबद्दल शिकावे लागणार आहे. जाणकारांनी सल्ले जरुर द्यावे. फोटो कढतांना हिस्टोग्रामचा वापर मात्र केला आहे.

oeP5073246.JPG
(१)
oeP5073247.JPG
(२)
oeP5073254.JPG
(३)
एका झाडावर विराजमान ग्रेट ग्रे हेरॉन

oeP5073290.JPG
(४)
वेस्टर्न ब्लु बर्ड

oeP5073294.JPG
(५)
पर्पल मार्टीन?

oe3P5073275.JPG
(६)
रॉबीन

oeP5073265.JPG
(७)
स्वीफ्ट्स
oeP5073202.JPG
(८)
oeP5073206.JPG
(९)
oeP5073207.JPG
(१०)
मास्याची वाट पाहुन, पकडुन खाणारा ग्रेट ग्रे हेरॉन
oe3P5073199.JPG
(११)
oeP5073213.JPG
(१२)
oeP5073242.JPG
(१३)
oe3P5073214.JPG
(१४)
पाणकावळे व त्यांची घरटी
oeP5073173.JPG
(१५)
oe1P5073170.JPG
(१६)
oe2P5073170.JPG
(१७)
oeP5073176.JPG
(१८)
गीज व गीजलींग्स
oeP5073228.JPG
(१९)
एक बारका हेरॉन
oeP5073150.JPG
(२०)
नटालचा सुतार (दूसरा शॉट मिळायच्या आत फरार झाला)
oeP5073237.JPG
(२१)
कासवः काहो, ही बोट नेमकी सुटते केंव्हा? मी नेहमीप्रमाणे जरा घाईत आहे.

हायर-रेझ चित्रे पहायची असल्यास संपर्क साधा.

नवीन लेन्सचे उद्घाटन? कुल. मस्त आहेत काही फोटो Happy
गो आशिष.

(अजून प्रयत्न करायला हवाय. जवळून हवेत ना अजून? )

बायदवे - पक्षीछायाचित्रणात क्रिस्टल क्लियर क्लॅरिटीसाठी camouflage ला पर्याय नाही असे अमित हल्ली म्हणतोय. तुम्ही आणि तो हवा तो गोंधळ घाला Proud

नटालचा सुतार कुठुन पाहायचा तेच कळेना. पक्षी की मासा हेही आधी लक्षात येईना Happy

पहिले तिन्ही फोटो आवडले. माळढोक आहेत काय?? मला माळढोक थोडाफार शहामृगासारखा दिसत असावा असे वाटलेले.

लेखाचे शीर्षकही आवडले हे सांगायचे राहिलेच.

पक्षीछायाचित्रणात क्रिस्टल क्लियर क्लॅरिटीसाठी camouflage ला पर्याय नाही असे अमित हल्ली म्हणतोय. तुम्ही आणि तो हवा तो गोंधळ घाला

हे आता काय नविन?? कमोफ्लेज आपण स्वतःचा करायचा की हे कॅमे-याच्या नव्या लेन्सचे नाव आहे???
:ठार अडाणी पण सगळीकडे नाक खुपसायचा छंद असलेली बाहुली:

साधना Lol
स्वतःचे कॅमोफ्लाज गं-लपूनछपुन, काही ना काहीतरी क्लृप्त्या लढवून आपण दिसणार नाही अशी व्यवस्था करुन मग पक्ष्यांचे फोटो काढायचे, तर ते सुरेख येतात.

७०-३०० छान! योग्य निवड केलीस. आता किती लेन्स झाल्या?
पहिल्या प्रयत्नाच्या मानानी चांगलेच आलेत. माझ्याकडे telephoto lens कधीच नव्हती त्यामुळे सल्ला काहिच देउ शकणार नाही. पण काही प्रश्ण मात्र आहेत,
१. काही फोटो sharp नाहियेत (फोटो ४,५) तर काही आहेत. लेन्स autofocus असेलच. मग crop केल्यामुळे असं वाटतय का? (फोटो ४,५ हललेत असं वाटत नाही)
२. Image stabilization (optical/sensor) आहे का? फरक जाणावतो का?
३. लेस्न जड असणार. त्यामुळे tripod वर संतुलन साधण्यात काही अडचण आली का?
आता post processing ला थोडा वेळ दे. फोटोशॉप वै 'तसलं' post processing नाही तर RAW मधे फोटो काढुन तुझ्या कॅमेरा बरोबर मिळालेल्या अ‍ॅप्लिकेशन ने केले तरी बराच फरक पडतो. उदा. फोटो १,२,३ मधले रंग एकसारखे यायला हवे होते का? (म्हणजे focal length, distance, app+shutter speed, ISO etc सारखं असेल तर)

नविन लेंस बद्दल अभिनंदन.
काही फोटो तितकेसे शार्प नाहित. झूम लेंस दोन्ही एक्स्ट्रिम फोकल लेंथ ला सॉफ्ट होतात. म्हणुन शक्यतो ७०-३०० हे एक्स्ट्रिम्स टाळुन १००-२५० च्या आसपास ठेवायचा प्रयत्न करा.
प्रत्येक झुम लेंस चा आपला येक स्वीट स्पॉट असतो ( Focul lenghth & aperture combo) ज्यात फोटो खुप शार्प मिळतात, तो काही शॉट्स घेतल्या नंतर अंदाजा ने ठरवता येतो किंवा नेटवर येखाद्या फोरम मधे सुद्धा मिळु शकतो.
हिस्टोग्रामचा वापर केला आहे हि चांगली गोष्ट , आत्ता येखाद्या फोटो एडीतर मधे लेवल्स अ‍ॅड्जस्ट करुन बघा म्हणजे पुढल्या वेळी फोटो काढतानाच एक्स्पोजर तसे ठेवता येईल.
शुभेच्छा.

>> झूम लेंस दोन्ही एक्स्ट्रिम फोकल लेंथ ला सॉफ्ट होतात
ह्म्म... हे माहित नव्हते... धन्यवाद पाटिल!
थोडं गुगलल्यावर हे सापडलं, http://www.digital-photography-school.com/find-your-lens-sweet-spot
D-SLR लेन्सबद्दल अधिक माहिती : http://www.slrgear.com/reviews/index.php

झूम लेंस दोन्ही एक्स्ट्रिम फोकल लेंथ ला सॉफ्ट होतात. >> होहो. बेस्ट माहिती पाटील. धन्यवाद हो.
हे अलिकडेच नवरा घोकतोय. त्याच्या फ्लेमिंगोंचे फोटो आपटल्यामुळे त्याला हा साक्षात्कार झालाय की ३०० वगैरे तसे elusive असते चांगल्या फोटोच्या दृष्टीने. Wink

'एवढी महागाची लेन्स घेऊनही फोटो असे का आलेत?' या (कूट) प्रश्नाला आलेले तिरकस उत्तर खालीलप्रमाणे.
'अजून singing and dancing lens आणली नाहीये' कॅननने बाजारात. Proud

रैना , म्हणुनच तर प्राईम लेंसेस ला पर्याय नाही. लेंसेस परवडत नाहित म्हणुन फोटोग्राफी सोडुन बरिच वर्ष झाली पण अजुन 50 mm 1.8 F घ्यायचा विचार करतोय Happy

काही वेळा एलेवेशन्मुळे ट्राय्पॉडचा एकच पाय जमीनीवर टेकल होता - त्यामुळे शेक आला असणार - ऑटो फोकस आहे, इमेज स्टॅबिलायजर पण आहे. फ्लीटींग टरगेट्स मुळे काही वेळा घाई झाली.

४,५ मध्ये टारगेट नी व्यापलेली एरीआ कमी होती. फोकस नीट त्यामुळे झाला नसावा.

रॉ मध्येच शुट केले आहे, पण अ‍ॅड्जेस्ट नेमके काय करायचे ते समजत नाही.

याही पक्षांच्या फार जवळ नव्हतेच जाता येत - अनेक लोक आसपास असल्याने ते आपले अंतर राखुन होतेच (गीज सोडल्यास).

साधना, त्याचा सावलीवरुन मासा की पक्षी ते कळावे Happy
रैना, अमीतला लिंक पाठवतो.
सॅम, मुळ १४-४२ (२८-८४ eq.) आहे, एक २x व एक ०.५ x मॅक्रो (या शेवटच्या २ ऑटो फोकस नाहीत - कीट बरोबर आलेल्या स्वस्त लेन्सेस आहेत).
पाटील, स्वीट स्पॉट्सवर प्रयोग करायचे आहेतच.

पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांना.

पहिलाच प्रयत्न चांगला आहे.
फोटो सॉफ्ट आहेत. हि लेन्स पहिल्यांदाच वापरली असल्यास
- लेन्स चेक करणे (घरच्या घरी अनेक फोटो काढुन लेन्स चा फोकसिंग पॉइंट बरोबर आहे का हे तपासणे, पुढे /मागे असु शकतो) नेट वर शोधल्यास पद्धती मिळु शकतात. लेन्स चा फोकस पॉइंट बरोबर नसल्यास रिटर्न/ ट्युनिंग चे ऑप्शन आहेत.
- ६००मिमि लेंग्थ असल्याने हात स्टेडी रहाणे कठीण असते. आपल्याला स्टेडि वाटला तरी कॅमेर्‍याला कळतच Wink पुन्हा ट्रायपॉड लावुन निदान प्रयत्न करुन बघ.
- पुर्ण सनी डे मधे कदाचित हात हलणार नाही पण थोडी जरी सावली वगरे ऑब्जेक्टवर आली तर लगेच रिडिंग चेंज होऊन शटर स्पीड कमी होतो आणि शेकिंग होऊ शकते.
- पाटिल यांनी सांगितलेल <<एक्स्ट्रिम फोकल लेंथ ला सॉफ्ट >> हे बरोबर आहे पण प्रत्येक लेन्समधे हे वेगळ्या पॉइंटला होते त्यामुळे नेट वर तुझ्या लेन्स ची माहीती वाचणे. व स्वतःचे अनुभव लक्षात ठेवणे
- शिवाय एफ किती ठेवला होता त्यावरही लेन्स सॉफ्ट रिझल्ट देऊ शकतात. त्यामुळे पुन्हा नेट वर तुझ्या लेन्स ची माहीती वाचणे व स्वतःचे अनुभव लक्षात ठेवणे
- इमेज स्टॅबिलायजर फक्त कॅमेरा शेक साठी उपयोगी ठरतो तो ही साधारण एक ते दिड स्टॉप. फ्लिटींग ऑब्जेक्ट्सच्या शेकिंग साठी फारसा उपयोगी नाही.

१८ व्या फोटो पहिल्या पिल्लाचे फोकसिंग थोडे चांगले वाटतेय.

रॉ मधे फोटो काढले असशील तर रॉ एडिटिंग सॉफ्ट. मधे एक्पोजर कमी जास्त करायचा ऑप्शन असतो त्याने एक / दिड स्टॉप चुकलेले एक्स्पोजर थोडेफार ठिक होतात. (फार नाही)

पाटिल 50 mm 1.8 F खरच मस्त लेन्स (निफ्टी फिफ्टी ) आहे Happy

धन्यवाद, सावली

हो, ट्रायपॉड बळगायला व वापरायला शिकायलाच हवे. लेन्स फोकल पॉईंट बद्दलही पाहतो.
एक्स्पोजर बदलुन फोकस मधे नाही ना फरक पडणार पण?

बाकी रिसोर्सेस वाचणेही सुरु करतो आता.

एक्स्पोजर बदलुन फोकस मधे नाही ना फरक >> हो हे दोन वेगळे पॉईंट आहेत.
पण एक्पोजर जास्त असेल तर फोकस आहे की नाही हे नीट कळणार नाही कारण ऑब्जेक्टच्या कडाही धुसर दिसतील.
सगळ्यात आधी लेन्स चेक कर.

रच्याकने, uv-filter मुळे किती फरक पडेल? ते सर्व फोटो फिल्टर मधुन (वापरुन) घेतले आहेत.

इमेजेस फुरिए अ‍ॅनॅलाईज करायला प्रोग्राम्स आहेत का? शार्पनेस टेस्टींग म्हणुन?

इमेजेस फुरिए अ‍ॅनॅलाईज >> हे कळले नाही.
टेस्टींग साठी नेट वर चार्ट्स मिळतात ते प्रिंट करुन त्याचा फोटो काढायचा. शार्पनेस साठी १००% मोठी इमेज करुन बघायची.
uv-filter >> फिल्टर क्वालिटी कशी आहे त्यावर अवलंबुन आहे. बिना फिल्टरचे काही फोटो काढुन बघ.

Pages