जितकी घरे तितकी गणपतीची रूपे. प्रत्येकजण आपापल्या परीने बाप्पाचे स्वागत करतो. त्याची सजावट, आरास करतो. कोणी पारंपारिक पद्धतीने तर कोणी आधुनिक पद्धतीने. काहींचे बाप्पा इको फ्रेंडली तर काहींचे दिव्याची आरास करुन सजवलेले. कल्पकतेने केलेल्या या मनमोहक सजावटी आपलं सर्वाच मन रमवतात.
चला, तर मग तुमच्या घरातल्या बाप्पाची बैठक मायबोलीकरांना दाखवायला तयार व्हा! आपली सजावट आपल्या कलात्मकतेचा आनंद इतरांना पण घेऊ द्या! इथे आपण आपल्या गणपतीचा फोटो शेअर करू. सजावटीमागे काय कल्पना होती, कशी केली हेही सांगायला विसरू नका.
गणपती बाप्पा मोरया !!!
बाप्पा मोरया!!
सर्व मायबोलीकरांना सप्रेम नमस्कार!
घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केलीत ना? त्याच्यासाठी सुंदर सजावट, आरास हे ही केले असेलच.. घरुन तोंडभरुन कौतुकही अनुभवले असेल, हो ना? मग आपल्या मायबोलीच्या परिवारालाही ह्या आनंदात सामील करुन घ्या.. मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनाही तुमचं कौतुक करण्याची संधी द्या.
मग, बाप्पाच्या कल्पक मूर्तींसोबतच त्याची आरास आणि सजावट यांचे फोटो आणि यासोबतच सजावट करतांना काय नवीन विचार केलात? पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी, संवर्धनासाठी काही नवीन कल्पना आणि त्यांची अंमलबजावणी केलीत का? हे ही कळवा. कळवाल ना? तुमच्या प्रतिसादांची आतुरतेने वाट पहात आहोत.