घरचा बाप्पा

Submitted by संयोजक on 28 August, 2014 - 15:43

जितकी घरे तितकी गणपतीची रूपे. प्रत्येकजण आपापल्या परीने बाप्पाचे स्वागत करतो. त्याची सजावट, आरास करतो. कोणी पारंपारिक पद्धतीने तर कोणी आधुनिक पद्धतीने. काहींचे बाप्पा इको फ्रेंडली तर काहींचे दिव्याची आरास करुन सजवलेले. कल्पकतेने केलेल्या या मनमोहक सजावटी आपलं सर्वाच मन रमवतात.

चला, तर मग तुमच्या घरातल्या बाप्पाची बैठक मायबोलीकरांना दाखवायला तयार व्हा! आपली सजावट आपल्या कलात्मकतेचा आनंद इतरांना पण घेऊ द्या! इथे आपण आपल्या गणपतीचा फोटो शेअर करू. सजावटीमागे काय कल्पना होती, कशी केली हेही सांगायला विसरू नका.

गणपती बाप्पा मोरया !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा रत्नागिरीच्या घरी बसलेला बाप्पा!

आणि हा बाप्पाचा पहिला प्रसाद. आमच्याकडे एकच दिवस गणपती असल्यानं घरी दर्शनाला येणारे फार लवकर येतात.. तोपर्यंत नैवेद्य झालेला नसतो म्हणून एक प्रसाद रेडीमेड करून ठेवलेला असतो.

Pages