Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 13 July, 2019 - 13:30
या शहरात
********
येताच या शहरात
जळतात श्वास आत
मरणगंध घेवूनी
रोज जागते पहाट
वाहतात प्रेत सारी
संवेदना बोथटली
जीवनाच्या लत्करांनी
इंच इंच व्यापलेली
एक फक्त पोट इथे
जीवनाचा सूत्रधार
अस्तित्वाच्या संगरात
कत्तलींचा रोज वार
रोज थवे जल्लादांचे
फिरती बेभान इथे
पापण्या कापून निजे
रोज रोज स्वप्न इथे
राहतो इथे कशाला
विक्रांता का लाज नाही
हरवले काय तू ते
तुला तो अंदाज नाही
डॉ.विक्रांत प्राभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्मार्ट सिटी बनु पाहणार्या
स्मार्ट सिटी बनु पाहणार्या शहरांची काळी बाजु उत्तम मांडलीये..
फक्त एक पोट इथे
फक्त एक पोट इथे
जीवनाचा सूत्रधार
<<<
वा वा
=====
(अष्टअक्षरी च्या ओळीची सुरुवात शक्यतो एक / तीन / सात अक्षरी शब्दाने करू नये)
मन्या धन्यवाद
मन्या धन्यवाद
बेफ़िकीरजी धन्यवाद …>>>अष्टअक्षरी च्या ओळीची सुरुवात शक्यतो एक / तीन / सात अक्षरी शब्दाने करू नये >> ओके
मस्त
मस्त
मस्त!
मस्त!