रेफ्युजी
अफगाण निर्वासित - फुफाट्यातून कुठे?
अफगाणिस्तानातल्या जलालाबाद शहरालगत गेल्या काही वर्षांत एक नवी वस्ती उभी राहिली आहे. वस्ती कसली, एक लहानसं खेडंच म्हणायला हवं. खेड्यात एका जेमतेम गिलावा केलेल्या छोट्या घरात ६० वर्षीय हलिमा बीबी आपल्या तीन तरूण मुलांसह राहते. त्यांतल्या एकालाही नोकरी नाही. हलिमा बीबीची प्रकृती वयोमानापरत्वे खालीवर होत असते. पण गावात कोणतेही वैद्यकीय उपचार उपलब्ध नाहीत. गावात अशी आणखी पाचशे-सहाशे कुटुंबं सहज असतील. त्यांची संख्या सतत वाढते आहे. गावाच्या सीमा विस्तारत चालल्या आहेत. चिंतेने ग्रासलेली हलिमा बीबी म्हणते, ‘इथे अवघड परिस्थिती आहे. आमचे नातेवाइक, मित्रमंडळी सगळे तिकडेच आहेत.
निर्वासितांच्या कला, निर्वासितांसाठी कला
निर्वासितांना सांधणारे भाषांचे पूल
‘मी पहिला तुर्की शब्द शिकलो तो म्हणजे ‘सू’... घशाला कोरड पडली होती, प्यायला पाणी हवं होतं... अरबी भाषेत पेय या अर्थी शराब असं म्हणतो आम्ही... पण तो शब्द ऐकून त्या तुर्की माणसाने दारू आणून दिली... मी खाणाखुणा करून कसंबसं शेवटी तुर्की भाषेतलं सू म्हणजे पाणी मिळवलं’...
मोडलेली मनं, जोडणारे खेळ
ऑगस्ट, २०१६. रिओ ऑलिंपिक्सचा उद्घाटन सोहळा. खेळाडूंचे लहान-मोठे चमू आपापल्या देशांच्या झेंड्यांसहित मैदानात येत होते. त्या-त्या देशांच्या नावांच्या उद्घोषणा होत होत्या. टाळ्यांच्या गजरात खेळाडूंचं स्वागत होत होतं. त्या सगळ्यांमध्ये १० खेळाडूंचा एक लहानसा गट जरा वेगळा होता. ते सर्वजण ऑलिंपिक्सची खूण असलेल्या पाच वर्तुळांच्या झेंड्यामागून चालत होते. त्यांनी स्टेडियममध्ये प्रवेश करताच समस्त प्रेक्षकांनी त्यांना उभं राहून मानवंदना दिली. स्टेडियममध्ये उद्घोषणा झाली- ‘रेफ्युजी ऑलिंपिक टीम’...
क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर्स : निर्वासित मुलांना रिझवणारे ‘जोईज्’
Children, including refugee children, are the future. They need special protection and care to realize their potential.”
– UNHCR, Policy on Refugee Children