आज मी तुज पाहिले चांदण्यात न्हाताना
चंद्रास पार ओघळून जाताना
कमनीय किनाऱ्यावरी तुझ्या फेन तरंग फुटताना
माड रोमावळीचे अंगावरी शहारताना
भागल्या रश्मीस एकदा भाळावरी टेकताना
आरुणी ओठांवरी तिन्हीसांज होताना
ओल्या पावलात माझी एकेक रात्र भिजताना
तुझ्या तंद्रीत माझा उभा जन्म भोगताना
©निखिल मोडक
किनारा
सागराची लाट वाऱ्यासम होऊनी बेभान
धुंडाळते जणु एक किनारा
असे चहुबाजुंनी वेढलेली
नानाविध किनाऱ्यांनी
परि धुंडाळते ती जणु
तो एक किनारा
थांबायचे क्षणभरच
विसाव्यासाठी;
स्पर्श होताच
त्या किनाऱ्याचा अलवार
मग वेगी परतायचे
मागे ओल्या पाऊली
दुर्दैव तिचे ते कुणा सांगावे
उमटत नाही पाऊलखुणा
अन्
उरत नाहीत पुरावे त्यांच्या
त्या क्षणमात्र भेटीचे..
-दिप्ती भगत
(01 Aug 2020)
मी प्रथम कोकणात , गुहागरला गेलो मित्रांसमवेत , मित्राच्याच घरी... १९८५ मधे.
अगदी आपण कोकणतलं घर म्हणून जे सर्व ऐकलेलं असतं , ते सारं आहे त्या घरात. खालच्या पाटातलं हे १०० वर्षे वयाचं कौलरू घर . पडवी , सोपा , झोपाळा , माजघर , देवघर इतर खोल्या...मागे परसात विहीर , नारळ , सुपारी ची शेकडो झाडं... आणि त्या मागे थेट पुळण आणि अथांग पसरलेला , डोळ्याला फक्त आणि फक्त निववणारा सागर... सतत गाज देऊन आधाराची भक्कम जाणीव करून देणारं त्याचं अस्तित्व !
किनारा
शांत शांत सारे
निस्तब्ध हा वारा
अवखळ लाटेस घेई
हलकेच कवेत किनारा
ओसंडून खडकावरी
विरते हि जलधारा
तुफानासही सामावून घेई
हलकेच हा किनारा
सुखदुःखाच्या लाटा
आयुष्य हे बेसहारा
झिजून झिजून होई
रेती हा किनारा
राजेंद्र देवी
किनारा
शांत शांत सारे
निस्तब्ध हा वारा
अवखळ लाटेस घेई
हलकेच कवेत किनारा
ओसंडून खडकावरी
विरते हि जलधारा
तुफानासही सामावून घेई
हलकेच हा किनारा
सुखदुःखाच्या लाटा
आयुष्य हे बेसहारा
झिजून झिजून होई
रेती हा किनारा
राजेंद्र देवी
समुद्र विशाल असतो, अमर्याद असतो, अथांग असतो.
पण प्रत्येक समुद्राला एक किनारा असतो...
आणि तो किनारा त्या समुद्राला थोपवून धरतो. हा किनारा त्या समुद्राची सीमा असतो.
किनार्याकडे स्वत:ची काहीच शक्ती नसते. बघायला गेलं तर जमिनीचा एक तुकडा...
पण समुद्राला थांबवायची कला मात्र त्या किनार्यामधे असते.
किनारा.... त्या समुद्रासाठी विश्रांतीचं शेवटचं ठिकाण.
किनारा.... त्या समुद्राची अखेर.
किनारा.... त्या समुद्राची सुरूवात....
घणाघाती येणार्या लाटांशी सतत युद्ध खेळत किनारा तिथेच असतो, अविचल, अविरत.
'काय रे, कधी निघाचय ?' राहुल चा फोन वरचा प्रश्न.
हल्ली त्याचा फोन आला की पहिला प्रश्ना हाच आसतो. बरेच दिवस आमचा मलवाणला जायचा प्लान चालू होता (इथे 'बरेच दिवस' म्हणजे शुद्ध मराठीत 'बरेच महीने'). पण सगळ्यांचे जुळुन येत नव्हते. जिप्सी, मी आणि जीवेश च्या ह्या ना त्या कारणाने प्लान पूढे जात होता. 31st चा वीकेंड पण जवळ आला होता आणि राहुल ची आतुरता शीगेला पोहोचलेली.
किनारा
कुठेशी किनारा मला ज्ञात नाही
पुढे रेटण्या जोश अंगात नाही
कशी वेळ आली प्रवासात माझ्या
समुद्र मला काय अज्ञात नाही
पडे आज वारा शिडे सैल झाली
पुढे आज जाणे नशीबात नाही
कुठे पावला देव ही अंग चोरी
मला वाचवे तोच विश्वात नाही
जरी घेतले सागरे आज पोटी
अखेरी डरे मी अशी बात नाही
मरे एक त्याचा कुणा शोक नाही
कुणाच्या इथे कोण फ़ंदात नाही
उमेश वैद्य २०११