किनारा

Submitted by उमेश वैद्य on 18 June, 2011 - 09:44

किनारा

कुठेशी किनारा मला ज्ञात नाही
पुढे रेटण्या जोश अंगात नाही

कशी वेळ आली प्रवासात माझ्या
समुद्र मला काय अज्ञात नाही

पडे आज वारा शिडे सैल झाली
पुढे आज जाणे नशीबात नाही

कुठे पावला देव ही अंग चोरी
मला वाचवे तोच विश्वात नाही

जरी घेतले सागरे आज पोटी
अखेरी डरे मी अशी बात नाही

मरे एक त्याचा कुणा शोक नाही
कुणाच्या इथे कोण फ़ंदात नाही

उमेश वैद्य २०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मरे एक त्याचा कुणा शोक नाही
कुणाच्या इथे कोण फ़ंदात नाही

वा छान...

कुठेशी किनारा मला ज्ञात नाही
पुढे रेटण्या जोश अंगात नाही

मतला ही मस्तच...

कशी वेळ आली प्रवासात माझ्या
समुद्र मला काय अज्ञात नाही

आशय लक्षात आला...पण "समुद्र मला काय अज्ञात नाही" समुद्र या शब्दा मुळे लय गडबडते आहे..

पुढिल लेखनास शुभेच्छा

मस्त ग़ज़ल ! आवडली."समुद्र" अडखळण्याचं ठिकाण बनलय. "समुद्र" ऐवजी "दधी हा" कसे वाटते? विचार व्हावा. शेवटी ग़ज़ल आपली आहे. पुलेशु