'काय रे, कधी निघाचय ?' राहुल चा फोन वरचा प्रश्न.
हल्ली त्याचा फोन आला की पहिला प्रश्ना हाच आसतो. बरेच दिवस आमचा मलवाणला जायचा प्लान चालू होता (इथे 'बरेच दिवस' म्हणजे शुद्ध मराठीत 'बरेच महीने'). पण सगळ्यांचे जुळुन येत नव्हते. जिप्सी, मी आणि जीवेश च्या ह्या ना त्या कारणाने प्लान पूढे जात होता. 31st चा वीकेंड पण जवळ आला होता आणि राहुल ची आतुरता शीगेला पोहोचलेली.
शेवटी, ठिणगिचे काम प्रतीक ने केले. सरळ सगळ्याना सांगून टाकले की 'मी 31st चा वीकेंड धरून सुट्टी टाकलीय, आता या तो इधर या उधर'. मग काय एक एक करून सगळे आप-आपले शेड्यूल क्लियर करायला लागले. जीवेश चे मात्र शेड्यूल शेवट पर्यंत क्लियर झालेच नाही आणि आम्ही चौघे मी, राहुल, जिप्सी आणि प्रतीक असे राहुलची 'स्विफ्टुकली' घेऊन निघालो.
मुंबई-पुणे-सातारा-कोल्हापुर-गगनबावड़ा-मालवण असा प्रवासाचा प्लान होता. जिप्सी बरोबर होताच त्यामुळे रस्ते शोधण्याचा प्रश्नच नव्हता. फक्त कोल्हापुर शहर पार करताना वाट शोधावी लागणार होती. ते चॅलेंज प्रतीक ने स्वीकारले. 'अर्रे अपना टैब 2 है ना, काय को चिंता करता?' - प्रतीक.
त्याच्यावर विश्वास ठेवून निघालो, आणि टेक्नॉलोजी ने नेहमी प्रमाणे आयत्या वेळेस हात दाखवला. काही केल्या प्रतीक च्या टैब ला नेटवर्क मिळेना आणि पर्यायाने आम्हाला रस्ता. शेवटी राहुलचे वाक्:चातुर्य आणि मला असलेली कोल्हापुर ची थोड़ी-फार माहिती मिळुन सुटलो एकदाचे. पण जिप्सी आणि राहुलचा पाय काही कोल्हापुरचा पांढारा रस्सा खाल्ल्या शिवाय निघत नव्हता, सरते खातर रंकाळ्याच्या पुढे गगनबावड़ा रोडवर एक छानसे हॉटेल बघून गाड़ी थांबवली. हॉटेल आणि बार हयात फरक करणे कठिण होते पण जेवण चांगले होते. माझा मार्गशीर्ष, त्यामुळे मी शाकाहारी. बाकिचे दात विचकत, चापून-चुपून, दोन तिन प्रकारच्या कोम्बड्या तोडत होते. वर 'हिरवा रस्सा किती चांगला होता', 'सूक्के कसे रस-रशित होते' असे वर्णन जिभल्या चाटून करत होते, त्यामुळे पूर्ण मालवण भर आपल्या जेवणाचे काय हाल होणार आहेत ह्याची पुसटशी कल्पना आली. पुढची जेवणे काढणे कठिण जाणार होते.
राहुलची झोप संभाळुन आम्ही पुढचे मार्ग:क्रमण चालू केले. सुंदर असा आणि आता रस्ता चांगला असल्याने सूबकसा गगनबावड़ा घाट पर करून कणकवलीत पोहोंचलो. तिथे थोड़ा चहा मारून संध्याकाळी मालवणला पोहोंचलो. मांगरात, म्हणजेच शेतावरच्या घरात रहायचे असल्याने घरी न जाता सरळ तिकड़ेच गेलो. हा मांगर म्हणजे आमच्या आम्ब्यांच्या बागेत असलेले, शेतीचे सामान ठेवायचे घर. ऎस-पैस पण पूर्णपणे आड़ बाजुस, एकाकी. मला हे सगळे नवीन नाही पण बाकीच्याना एकदम नवीन, पण किडुक-मिडुकाची धास्ती घेत हळु-हळु खुपच रमले सगळे. काताळातल्या विहीरीच्या थंड, गोड पाण्याने आंघोळ करताना हलके हलके वाटत होते. वाटत होते किती दिवसानी आंघोळ कारतोय. साठ-सत्तर रुपयाच्या साबणाने जो फ्रेशनेस येत नाही तो नुसत्या पाण्याने आला. दिवस भराचा प्रवासाचा शिण निघून अगदी शांत वाटत होते.
रात्री जेवायला हॉटेल बांबूत गेलो. तिथे पर्यटकांची ही गर्दी, एक तास थांबुन आमचा नंबर आला पण सुग्रास मालवणी जेवणामूळे सगळे वसूल झाले (अर्थात मी शाकाहरीच!). रात्री चिवला बीच, कोळंब ब्रिज् असे इथे तिथे रेंगाळत घरी आलो. अंग टेकल्यावर बोलता बोलता कधी डोळा लागला कळलेच नाही.
पुढचे सगळे दिवस फिर फिर फिरलो. देवबाग, भोगवे, दोन नीवत्या, वेंगूर्ला, तोंडवली असे दहाही दिशाना फिरत होतो. नेहमीच्या पर्यटकांच्या जागा सोडुन, खूप सुंदर अश्या एकांतात दडलेल्या जागा पहिल्या. काही ठिकाणं तर मी पण पहिल्यांदाच पाहिली, ठिकाणं पण अशी की हातातला कॅमरा विसरायला लावणारी. आम्ही सगळेच हौशी फोटोग्राफर्स त्यामुळे हवा तेव्हढा वेळ घेऊन, हवे तिथे थांबुन फोटो काढ़त होतो. कुटुंबा सोबात असे करता येत नाही, तेव्हा प्रायोरिटी वर कुटुंबालाच ठेवावे लागते!
मालवणात मी पहिल्यांदाच पर्यटाकाच्या रोल मध्ये असल्याने मज़ा वाटत होती. बाजरात किवा हॉटेल मध्ये उगाचच मालवणी न बोलता शुद्ध 'भाषेत' बोल किवा ब्रिसलेरीच हवी असा आग्रह धर, असे सगळे चालू होते. थोडक्यात मालवण एका वेगळ्या दृष्टिकोनातुन एन्जॉय करत होतो. त्यात एक पेक्षा एक नग असण्याऱ्या मित्रांची संगत त्यामुळे हा अनुभव वर्णनातित आहे. तरीहि काही अनुभव चित्र-स्वरूपात चोरण्याचा हा प्रयत्न.
प्रची १: मालवणचा फेसाळणारा समुद्र.प्रची २: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग.
प्रची ३: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग.
प्रची ४:
प्रची ५: साहेब.
प्रची ६: बाजारहाट.
प्रची ७:
प्रची ८: बाजारहाट.
प्रची ९:
प्रची १०:
प्रची ११:
प्रची १२:
प्रची १३: गारठलेली सकाळ.
प्रची १४:
प्रची १५:
प्रची १६:
प्रची १७:
प्रची १८:
प्रची १९:
प्रची २०: तु आणि मी.
प्रची २१: रामेश्वर मंदिर, मालवण.
प्रची २२: आज मुक्त मी.
प्रची २३: आज काय गावला?
प्रची २४: आज काय गावला?
प्रची २५: बाजारहाट, मालवणी स्टाईल..
प्रची २६: जिप्सी, Trademark Pose.
प्रची २७:
प्रची २८:
प्रची २९: पुनवेची रात्र
प्रची ३०: ज़िन्दगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है.
आयुष्यातील सोबत व्यतीत केलेल्या, एका सुंदर वर्षाला निरोप.
२०१२ ची शेवटची संध्याकाळ.
--
जिप्स्याचा आग्रह म्हणुनच हा मायबोलीवर लेखनाचा माझा पहिलाच प्रयत्न. शुद्ध-लेखन 'थोडे बरेच' आहे त्यामुळे, चुका माफ असाव्या.
ह्या पुर्ण प्रवासावर बेतलेली जिप्सीची लेखमाला:
गाज सागराची — "मालवणमय"...
गाज सागराची — "मालवण मासळी बाजार"
गाज सागराची — "देवबाग आणि किल्ले निवती (सूर्यास्त-सूर्योदय)"
गाज सागराची — "किल्ले निवती"
गाज सागराची — "भोगवे समुद्रकिनारा"
गाज सागराची — "सागरतीर्थ"
गाज सागराची — "तोंडवली-तळाशील समुद्रकिनारा"
वेगळ्याच शैलीतले फोटो. आवडले.
वेगळ्याच शैलीतले फोटो. आवडले.
झकास.. दुसरे शब्दच
झकास.. दुसरे शब्दच नाहीत.
जिप्सी, Yo. ROcks बरोबर तुम्ही पण असे अप्रतिम फोटो टाकून जळवणार का?
मला फोटो का दिसत नाहियेत
मला फोटो का दिसत नाहियेत
दिनेशदाज, chaitrali धन्यवाद
दिनेशदाज, chaitrali धन्यवाद
@शापित गंधर्व, फोटो पब्लिक फोल्डर मधेच आहेत! दिसायला तर हवेत.
Ctrl+F5 करून बघा.
कसलेच जालीम फोटो काढलेत राव
कसलेच जालीम फोटो काढलेत राव तुम्ही.......
कमाल करता तुम्ही......................
अप्रतिम ! धुक्यातलं मालवण
अप्रतिम ! धुक्यातलं मालवण इतकं छान क्वचितच पहायला मिळतं !!
पहिला कातील आहे...
पहिला कातील आहे...
संदेश, सगळे फोटो म्हणजे
संदेश, सगळे फोटो म्हणजे _____________/\_____________
पहिला प्रचि केवळ जीवघेणा
प्रचि ८ मध्ये चालताना पायातुन उडणारी वाळु केवळ अप्रतिम
प्रचि १३ गारठलेली सकाळ केवळ __/\__
प्रची २३: आज काय गावला?>>> केवळ अशक्य
प्रची २५: बाजारहाट, मालवणी स्टाईल..>>>>हॅट्स ऑफ!!!!
प्रची २६: जिप्सी, Trademark Pose>>>>>>सह्हीए मॉडेल
प्रची ३०: ज़िन्दगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है.>>>> ______________/\____________
अप्रतिम !! पहिला फोटो तर
अप्रतिम !!

पहिला फोटो तर ख्लासिक
प्रची २६: जिप्सी, Trademark
प्रची २६: जिप्सी, Trademark Pose>>>>>>:फिदी:
मस्त सगळे फोटोज
मस्त फोटो. पहिला खुपच सुंदर.
मस्त फोटो.
पहिला खुपच सुंदर.
५,८, १०, १७, २४,२५ हे ही मस्त
khup chhan
khup chhan
अप्रतिम!
अप्रतिम!
खल्लास !!!!!!!!!!!! १ करिता
खल्लास !!!!!!!!!!!!
१ करिता no words............:)
खूपच सुंदर फोटो !!
खूपच सुंदर फोटो !!
पहिला फोटो खुपच सुंदर आणि
पहिला फोटो खुपच सुंदर आणि धूकयातले मालवण, पहाटेचा गारवा फारच अप्रतिम..
बाजारहाट, मालवणी स्टाईल..एकदम सॉलिड...
मस्त आहेत फोटो, सगळेच अतीशय
मस्त आहेत फोटो, सगळेच अतीशय आवडले.
फारच मस्त फोटोज
फारच मस्त फोटोज
अप्रतिम. प्रचि १ तर केवळ
अप्रतिम. प्रचि १ तर केवळ सुंदर
फोटो मस्तच आहेत. पण मला
फोटो मस्तच आहेत.
पण मला पहिल्या फोटो मध्ये काही तरी मेजर पोस्ट-प्रोसेसिंग केल्या सारखे वाटतेय. चूभूदेघे.
कसलेच जालीम फोटो काढलेत राव
कसलेच जालीम फोटो काढलेत राव तुम्ही.......
कमाल करता तुम्ही...................... >>>>>> +१०००........
लै भारीए राव.......
dropbox.com ऑफिसमधे blocked
dropbox.com ऑफिसमधे blocked आहे, घरून बघावे लागतील.
मायबोलीवर स्वागत एकदम फ्रेश
मायबोलीवर स्वागत
एकदम फ्रेश वाटले फोटो बघून. पहिला फोटो सुंदरच. २८ वा बघताना Life of Pi आठवला. पण मला सगळ्यात १५वा आवडला. अप्रतिम फ्रेमिंग आहे त्याचे.
इतक्या देखण्या फोटोंवरची तुझी स्वाक्षरी पण झकासच आहे.
त्या टायटॅनीक पोझ मध्ये जिप्स्याच्या पुढे कोण उभी होती रे?
स्गळेच प्रची मस्तच !!!!!!!!!
स्गळेच प्रची मस्तच !!!!!!!!!
मस्त रे !
मस्त रे !
केवळ अप्रतिम बाकी शब्दच उरले
केवळ अप्रतिम
बाकी शब्दच उरले नाहीत
मस्तच. जिप्स्या तुझी गॅन्ग
मस्तच.

जिप्स्या तुझी गॅन्ग भारीये रे.
मस्त फोटो आहेत. composition
मस्त फोटो आहेत. composition मस्त आहेत. रंग थोडे कमी आहेत. कदाचित धुक्यामुळे असावे.
मस्त फोटो
मस्त फोटो
वॉव.. नुस्ते सुप्पर्ब आहेत
वॉव.. नुस्ते सुप्पर्ब आहेत सर्वच्यासर्व फोटोज..
Pages