'काय रे, कधी निघाचय ?' राहुल चा फोन वरचा प्रश्न.
हल्ली त्याचा फोन आला की पहिला प्रश्ना हाच आसतो. बरेच दिवस आमचा मलवाणला जायचा प्लान चालू होता (इथे 'बरेच दिवस' म्हणजे शुद्ध मराठीत 'बरेच महीने'). पण सगळ्यांचे जुळुन येत नव्हते. जिप्सी, मी आणि जीवेश च्या ह्या ना त्या कारणाने प्लान पूढे जात होता. 31st चा वीकेंड पण जवळ आला होता आणि राहुल ची आतुरता शीगेला पोहोचलेली.
शेवटी, ठिणगिचे काम प्रतीक ने केले. सरळ सगळ्याना सांगून टाकले की 'मी 31st चा वीकेंड धरून सुट्टी टाकलीय, आता या तो इधर या उधर'. मग काय एक एक करून सगळे आप-आपले शेड्यूल क्लियर करायला लागले. जीवेश चे मात्र शेड्यूल शेवट पर्यंत क्लियर झालेच नाही आणि आम्ही चौघे मी, राहुल, जिप्सी आणि प्रतीक असे राहुलची 'स्विफ्टुकली' घेऊन निघालो.
मुंबई-पुणे-सातारा-कोल्हापुर-गगनबावड़ा-मालवण असा प्रवासाचा प्लान होता. जिप्सी बरोबर होताच त्यामुळे रस्ते शोधण्याचा प्रश्नच नव्हता. फक्त कोल्हापुर शहर पार करताना वाट शोधावी लागणार होती. ते चॅलेंज प्रतीक ने स्वीकारले. 'अर्रे अपना टैब 2 है ना, काय को चिंता करता?' - प्रतीक.
त्याच्यावर विश्वास ठेवून निघालो, आणि टेक्नॉलोजी ने नेहमी प्रमाणे आयत्या वेळेस हात दाखवला. काही केल्या प्रतीक च्या टैब ला नेटवर्क मिळेना आणि पर्यायाने आम्हाला रस्ता. शेवटी राहुलचे वाक्:चातुर्य आणि मला असलेली कोल्हापुर ची थोड़ी-फार माहिती मिळुन सुटलो एकदाचे. पण जिप्सी आणि राहुलचा पाय काही कोल्हापुरचा पांढारा रस्सा खाल्ल्या शिवाय निघत नव्हता, सरते खातर रंकाळ्याच्या पुढे गगनबावड़ा रोडवर एक छानसे हॉटेल बघून गाड़ी थांबवली. हॉटेल आणि बार हयात फरक करणे कठिण होते पण जेवण चांगले होते. माझा मार्गशीर्ष, त्यामुळे मी शाकाहारी. बाकिचे दात विचकत, चापून-चुपून, दोन तिन प्रकारच्या कोम्बड्या तोडत होते. वर 'हिरवा रस्सा किती चांगला होता', 'सूक्के कसे रस-रशित होते' असे वर्णन जिभल्या चाटून करत होते, त्यामुळे पूर्ण मालवण भर आपल्या जेवणाचे काय हाल होणार आहेत ह्याची पुसटशी कल्पना आली. पुढची जेवणे काढणे कठिण जाणार होते.
राहुलची झोप संभाळुन आम्ही पुढचे मार्ग:क्रमण चालू केले. सुंदर असा आणि आता रस्ता चांगला असल्याने सूबकसा गगनबावड़ा घाट पर करून कणकवलीत पोहोंचलो. तिथे थोड़ा चहा मारून संध्याकाळी मालवणला पोहोंचलो. मांगरात, म्हणजेच शेतावरच्या घरात रहायचे असल्याने घरी न जाता सरळ तिकड़ेच गेलो. हा मांगर म्हणजे आमच्या आम्ब्यांच्या बागेत असलेले, शेतीचे सामान ठेवायचे घर. ऎस-पैस पण पूर्णपणे आड़ बाजुस, एकाकी. मला हे सगळे नवीन नाही पण बाकीच्याना एकदम नवीन, पण किडुक-मिडुकाची धास्ती घेत हळु-हळु खुपच रमले सगळे. काताळातल्या विहीरीच्या थंड, गोड पाण्याने आंघोळ करताना हलके हलके वाटत होते. वाटत होते किती दिवसानी आंघोळ कारतोय. साठ-सत्तर रुपयाच्या साबणाने जो फ्रेशनेस येत नाही तो नुसत्या पाण्याने आला. दिवस भराचा प्रवासाचा शिण निघून अगदी शांत वाटत होते.
रात्री जेवायला हॉटेल बांबूत गेलो. तिथे पर्यटकांची ही गर्दी, एक तास थांबुन आमचा नंबर आला पण सुग्रास मालवणी जेवणामूळे सगळे वसूल झाले (अर्थात मी शाकाहरीच!). रात्री चिवला बीच, कोळंब ब्रिज् असे इथे तिथे रेंगाळत घरी आलो. अंग टेकल्यावर बोलता बोलता कधी डोळा लागला कळलेच नाही.
पुढचे सगळे दिवस फिर फिर फिरलो. देवबाग, भोगवे, दोन नीवत्या, वेंगूर्ला, तोंडवली असे दहाही दिशाना फिरत होतो. नेहमीच्या पर्यटकांच्या जागा सोडुन, खूप सुंदर अश्या एकांतात दडलेल्या जागा पहिल्या. काही ठिकाणं तर मी पण पहिल्यांदाच पाहिली, ठिकाणं पण अशी की हातातला कॅमरा विसरायला लावणारी. आम्ही सगळेच हौशी फोटोग्राफर्स त्यामुळे हवा तेव्हढा वेळ घेऊन, हवे तिथे थांबुन फोटो काढ़त होतो. कुटुंबा सोबात असे करता येत नाही, तेव्हा प्रायोरिटी वर कुटुंबालाच ठेवावे लागते!
मालवणात मी पहिल्यांदाच पर्यटाकाच्या रोल मध्ये असल्याने मज़ा वाटत होती. बाजरात किवा हॉटेल मध्ये उगाचच मालवणी न बोलता शुद्ध 'भाषेत' बोल किवा ब्रिसलेरीच हवी असा आग्रह धर, असे सगळे चालू होते. थोडक्यात मालवण एका वेगळ्या दृष्टिकोनातुन एन्जॉय करत होतो. त्यात एक पेक्षा एक नग असण्याऱ्या मित्रांची संगत त्यामुळे हा अनुभव वर्णनातित आहे. तरीहि काही अनुभव चित्र-स्वरूपात चोरण्याचा हा प्रयत्न.
प्रची १: मालवणचा फेसाळणारा समुद्र.प्रची २: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग.
प्रची ३: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग.
प्रची ४:
प्रची ५: साहेब.
प्रची ६: बाजारहाट.
प्रची ७:
प्रची ८: बाजारहाट.
प्रची ९:
प्रची १०:
प्रची ११:
प्रची १२:
प्रची १३: गारठलेली सकाळ.
प्रची १४:
प्रची १५:
प्रची १६:
प्रची १७:
प्रची १८:
प्रची १९:
प्रची २०: तु आणि मी.
प्रची २१: रामेश्वर मंदिर, मालवण.
प्रची २२: आज मुक्त मी.
प्रची २३: आज काय गावला?
प्रची २४: आज काय गावला?
प्रची २५: बाजारहाट, मालवणी स्टाईल..
प्रची २६: जिप्सी, Trademark Pose.
प्रची २७:
प्रची २८:
प्रची २९: पुनवेची रात्र
प्रची ३०: ज़िन्दगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है.
आयुष्यातील सोबत व्यतीत केलेल्या, एका सुंदर वर्षाला निरोप.
२०१२ ची शेवटची संध्याकाळ.
--
जिप्स्याचा आग्रह म्हणुनच हा मायबोलीवर लेखनाचा माझा पहिलाच प्रयत्न. शुद्ध-लेखन 'थोडे बरेच' आहे त्यामुळे, चुका माफ असाव्या.
ह्या पुर्ण प्रवासावर बेतलेली जिप्सीची लेखमाला:
गाज सागराची — "मालवणमय"...
गाज सागराची — "मालवण मासळी बाजार"
गाज सागराची — "देवबाग आणि किल्ले निवती (सूर्यास्त-सूर्योदय)"
गाज सागराची — "किल्ले निवती"
गाज सागराची — "भोगवे समुद्रकिनारा"
गाज सागराची — "सागरतीर्थ"
गाज सागराची — "तोंडवली-तळाशील समुद्रकिनारा"
पहिला फोटो अप्रतिम आहे.
पहिला फोटो अप्रतिम आहे.
निशब्द... खुप छान फोटो...
निशब्द... खुप छान फोटो...
संदेश.. मायबोली वर स्वागत. हे
संदेश.. मायबोली वर स्वागत. हे तुझ मायबोलीवर पहिलच लिखाण या अर्थाने स्वागत
सगळे फोटो एक्-से-एक.... पहिल तर खरच कातिल आहे.
जिप्स्याचा आग्रह म्हणुनच हा मायबोलीवर लेखनाचा माझा पहिलाच प्रयत्न>>> जिप्स्या धन्स रे ... तुझ्या मुळे माबोला अजुन एक चांगला फोटोग्राफर मिळाला
एकदम अप्रतीम. पहील फोटो तर
एकदम अप्रतीम. पहील फोटो तर फारच सुंदर. त्या जांभळ्या फुलांचा फोटो सुध्धा एक चित्रच वाटत.
मला एक ही फोटो दिसत नाहिये
मला एक ही फोटो दिसत नाहिये
पहिले प्रकाशचित्र सुरेख जमुन
पहिले प्रकाशचित्र सुरेख जमुन आलेय, एक्स्पोझर परफेक्ट, प्रोसेसींग मधे Hues व्यवस्थीत खुलुन आलेत , कंपोझिशन मधे लाइन्सचा वापर चांगला झालाय. याचा क्रॉप थोडा बदलला तर स्क्वेअर फॉर्मॅट सुद्धा चांगला दिसेल.
दुसर्या प्रचित मात्र स्केअर फॉर्मॅट अनावश्यक आहे, वरच्या भागात काही खास डिटेल्स नाहित, मुख्य म्हणजे त्या भागत जो नॉईज आहे तो बाकी चित्रात नाही. वरुन आर्च जेमेतेम फ्रेम मधे राहिल इतपत क्रॉप केला तर प्र चि खुलेल.
बहुतेक ग्रे स्केल , बॅकलीट चित्रात मीड टोन अॅड्जस्ट करायला हवेत.त्याने हाय्लाईट्स खुलतील.
प्रची १४ चे टायमींग मस्त
१८ वा आवड्ला, त्या दोन मुलांचा क्लोजअप सुद्धा बघायला आवड्ला असता.
२४ चा DOF , माशांवर्ची पिवळी निळी टींट छान वाटते.
अप्रतिम
अप्रतिम
फोटो मस्तच आहेत...
फोटो मस्तच आहेत...
व्वा! सुंदर फोटो. सागराचा,
व्वा! सुंदर फोटो. सागराचा, निळ्या फुलांचा, धुक्यातलं मालवण, रामेश्वर मंदिर, प्रची.१४ मधले स्टंप, पाण्यात खेळणारी जोड्गोळी, हे फोटो फार आवडले.
मला एक ही फोटो दिसत नाहिये
मला एक ही फोटो दिसत नाहिये अरेरे>> +१
अप्रतिम..... आता खरी मौज
अप्रतिम..... आता खरी मौज आहे.... इतके सुंदर फोटो.....
शब्दच नाहीत.. डोळे निवले..
शब्दच नाहीत.. डोळे निवले.. डोळे विस्फारले.. प्रत्येक प्रचि अप्रतिम आहे
अप्रतिम,
अप्रतिम,
पहिला फोटु धुडगुस.. बाकीचे पण
पहिला फोटु धुडगुस.. बाकीचे पण भारीच राव
प्रचि २९ खासच
प्रचि २९ खासच
खूपच छान फोटो
खूपच छान फोटो
संदेश, सगळे फोटो म्हणजे
संदेश, सगळे फोटो म्हणजे _____________/\_____________ >>>> +१००००००००००००००००००००००००००००००००००००००० out of the world snaps
मस्त फोटो सगळेच
मस्त फोटो सगळेच
प्रचि एक आणि चार कस्स्सली
प्रचि एक आणि चार कस्स्सली आहेत! वॉव!
धन्यवाद या सफरीसाठी
वाह....केवळ अप्रतिम !!!
वाह....केवळ अप्रतिम !!!
अप्रतिम !!! >>> +१०
अप्रतिम !!! >>> +१०
छान आहेत
छान आहेत
लाजवाब! आज शक्य झालं पाहणं
लाजवाब! आज शक्य झालं पाहणं प्रचि... __/\__ एक नंबर देखण्या फ्रेम्स आणि कातिल शॉट्स्.
बाकीचा पेटारा कधी खोलताय??
अप्रतिम प्रचि आहेत.......१ ला
अप्रतिम प्रचि आहेत.......१ ला फोटो तर एकदम लाजवाब.
एक विनन्ति आहे....शक्य झाल्यस फोटोस चे EXIF बद्दल हि पोस्ट करा....निदान पहिल्या फोटो चे तरि...
प्र चि शिकणारर्याना त्याचा नक्किच फायदा होईल.....पहिला फोटो HDR फोटो आहे का???
ह्या अप्रतिम कौशल्या बद्दल तुमच अभिनन्दन
मsssस्त!
मsssस्त!
संदेश, मस्त फोटो. व्वा !
संदेश, मस्त फोटो. व्वा !
सुरेख फोटोज. सकाळी सकाळी मस्त
सुरेख फोटोज. सकाळी सकाळी मस्त फ्रेश वाटलं.
Pages