नाव

Submitted by अवल on 2 January, 2024 - 01:41

IMG_20240102_115348.jpg(लेकाने हा फोटो पाठवला. Peter Iredale ही बोट 1906 पासून ऑरगॉन किनाऱ्यावर रुतून बसली आहे. अजून तिचे अवशेष तिथे आहेत. तिचा हा फोटो. तो बघून मनात आलं ते हे.
जरा विचित्र रचना होत गेली. कडव्यांची मधली ओळ बेस, वरच्या खालच्या 2-2 त्यावर आधारित. सो दोन प्रकारची यमकं)

टरारा फाटल
फडकतं शिड
कायाच्या चिंधड्या
मोडली डोलकाठी
भंगली होडकी

सफरीचा रोमांच
उडवला कधीच
रौद्र वादळाने
समुद्राची आसक्ती
उतरवू पाहिली

पसरे क्षितीजभर
कभिन्न कालडोह
बरसते अंबर
आली भरभरून
एकटेपणाची झूल

निकराने झगडण
अनामिक ओढ
अनाहूत घटनांची
कोसळणारी रात्र
अविरत गूढगाज

उसळत्या लाटा
कवळती कितीदा
वल्ही सरसावून
ढासळलेलं मन
पुन:पुन्हा सावर

ओसरती लाट
भेलकांडे नाव
वाळूत रुते
सापडे अखेर
सुखाचे निधान
---

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पसरे क्षितीजभर
कभिन्न कालडोह
बरसते अंबर
आली भरभरून
एकटेपणाची झूल

निकराने झगडण
अनामिक ओढ
अनाहूत घटनांची
कोसळणारी रात्र
अविरत गूढगाज

उसळत्या लाटा
कवळती कितीदा
वल्ही सरसावून
ढासळलेलं मन
पुन:पुन्हा सावर

ओसरती लाट
भेलकांडे नाव
वाळूत रुते
सापडे अखेर
सुखाचे निधान

विशेष आवडलं...छान रुपक...

छान आहे. भावना खूप आवडली.

>>>>> पसरे क्षितीजभर
कभिन्न कालडोह
बरसते अंबर
आली भरभरून
एकटेपणाची झूल