दुपार - भाग १ : https://www.maayboli.com/node/74104
---------------------------------------------------------------------------------
अशा प्रकारची कथा प्रथमच लिहिते आहे.
सुधारणेच्या सर्व सूचनांचे स्वागत आहे.
--------------------------------------------------------------------------------
भर उन्हाळ्यातली दुपारची वेळ होती. रणरणतं ऊन, तापलेला काळा कुळकुळीत डांबरी रस्ता, अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्ण वाऱ्याच्या झळा ह्या टिपीकल उन्हाळ्यातच घडणाऱ्या बाबींनी जेरीस आणलं होतं. तिचं मन कासावीस होत होतं. जिकडे बघावं तिकडे रखरखाट नुसता! मध्येच एखादं हिरव्याकंच पानांच्या वैभवाने नटलेलं झाड दिलासा देऊन जाई. पण तेवढ्यापुरतं तेवढंच. तहान तर जन्मोजन्मी पाणी न प्यायल्यासारखी लागत होती. सतत घसा कोरडा पडत होता. जवळचं पाणीही संपत आलं होतं. जे होतं तेही गरम झालं होतं. कधी एकदा घरी पोचतेय आणि घटाघटा गार पाणी पितेय असं तिला झालं होतं. पण महामंडळाच्या बसेस वेळेत कुठल्या पोचायला?
ओसरते शांत दुपार उन्हाचा भार नभाला होतो
सांजेची उसवुन शीव सूर्य रेखीव नव्हाळी देतो
वाळूत पसरते लाट थेंब मोकाट नाचुनी जाती
काठास बिलगते ओल अंतरी खोल आर्जवे उरती
पाण्यात चिमुकले पाय पांढरी साय स्पर्शिण्या जाती
थेंबांची होता फुले हरखुनी मुले वेचुनी घेती
मातीत खेळते पोर कुणी चितचोर स्वप्न आवरते
अलवार गुंफते ऊन तिच्याहातून सांज सावरते
केसांत अबोली फूल सुगंधी भूल वा-यात वाहे
नाही जगताचे भान तिला अभिधान नभाचे आहे
ती टपोर हसते खास निरागस आस होतसे बाधा
खेळात हरवुनी जात उरे सा-यात सानुली राधा
दु:ख राहे शून्य, जाहलो अनन्य,
घेता झालो धन्य , झोप दुपारची!!
असं कुणीतरी म्हटलेलंच आहे……………………………..कोणी म्हटलं नसेल तर आत्ताच मी म्हटलं असं समजा ! खर तर दुपारची झोप हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा आणि नाजूक विषय! आज याविषयी लिहून मला काही ठराविक प्रकारच्या लोकांवर सूड उगवायचा आहे. पहिला प्रकार म्हणजे जे स्वतः दुपारी झोपत नाहीत आणि दुसरा प्रकार म्हणजे जे दुपारी झोपू शकत नाहीत म्हणून जे झोपतात त्यांना तुच्छ समजणारे जन!
संध्याकाळच्या छाया प्रकाशात दूरवर पक्ष्यांचा खेळ चालू होता. बराच वेळ तो खेळ पाहताना एक गोष्ट लक्षात आली, पंखाची फार वेळ हालचाल करून थांबल्यास संथ थोडावेळ फिरायचं आणि परत पंखात भरारी घेऊन उडायचं. फार छोटी आणि साधी घटना … बरेच कंगोरे निघतात. "दिवसभरच्या घाई - गडबडीतील कामातून थोडावेळ आराम …. परत थोडावेळ काम …"
पण विसरलेली एक गोष्ट, आयुष्य हा हि एक दिवसच. एकदा एखादी वेळ गेली की कुठे परत येते, आजच्या दिवसाची सकाळ परत कधी येणार. सकाळ, दुपार, संध्याकाळ. रात्र कधी कळलीच नाही. अगदी मृत्यू सारखीच. मृत्यू, मरण - रात्रीसारख - अंधारमय -काळोखाच.
'प्रेम म्हणजे काय' या विषयावर एका मासिकाने लेख लिहिण्याची विनंती केल्याने भर दुपारी चुरमुरे सर त्यावर विचार करत बसले होते. अचानक दारावरची बेल वाजली. 'माझ्यासारख्या निवृत्त प्राध्यापकाच्या घरी अशा मध्यान्हीच्या वेळेस मळक्या चड्डीतला फुलवला किंवा बिल मागायला आलेला पेपरवाला याशिवाय कोण येणार? अशा विचारात आणि ''शी बाई, दुपारची जरा पडले तर आलं मेलं कोणीतरी कडमडायला!'' या सौ. चुरमुरेंच्या मुखोद्गाराच्या पार्श्वभूमीवर चुरमुरे सरांनी दार उघडलं तर दारात शेजारचे चिटणीस! ते इतकी मान खाली करून उभे होते की बहुधा ती मोडली की काय अशी शंका यावी पण नाही, तसे झाले नव्हते.