मेदुवडा

'भर दुपारचे प्रेम'

Submitted by Narayan Thakur on 6 January, 2011 - 09:49

'प्रेम म्हणजे काय' या विषयावर एका मासिकाने लेख लिहिण्याची विनंती केल्याने भर दुपारी चुरमुरे सर त्यावर विचार करत बसले होते. अचानक दारावरची बेल वाजली. 'माझ्यासारख्या निवृत्त प्राध्यापकाच्या घरी अशा मध्यान्हीच्या वेळेस मळक्या चड्डीतला फुलवला किंवा बिल मागायला आलेला पेपरवाला याशिवाय कोण येणार? अशा विचारात आणि ''शी बाई, दुपारची जरा पडले तर आलं मेलं कोणीतरी कडमडायला!'' या सौ. चुरमुरेंच्या मुखोद्गाराच्या पार्श्वभूमीवर चुरमुरे सरांनी दार उघडलं तर दारात शेजारचे चिटणीस! ते इतकी मान खाली करून उभे होते की बहुधा ती मोडली की काय अशी शंका यावी पण नाही, तसे झाले नव्हते.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - मेदुवडा