स्लॅमबूक

स्लॅम बूक आठवणी - शाळा कॉलेजचा शेवटचा दिवस.!

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 March, 2024 - 17:58

मागच्या एका आठवड्यात लेकीच्या शाळेचा (इयत्ता चौथी) शेवटचा दिवस होता. त्यानंतर सुट्ट्या आणि परीक्षा सुरू होणार होत्या. शेवटचा दिवस म्हणजे त्या वर्षापुरते मित्रांचा निरोप घ्यायचा. म्हणून शाळेच्या गणवेषाऐवजी छान नवीन कपडे घालायला परवानगी होती. पोरगी शाळेत जाताना उत्साहात होती. परत आली ते हातात एक कागद नाचवत आली. पगाराचा चेक जसा देवासमोर ठेवतात तसे तो कागद माझ्या हातात ठेवला. कारण आपला बाप आठवणी जतन करायला त्यांचा फोटो काढून ठेवतो हे तिला माहीत आहे. आणि ईथे मुळात तो कागदच आठवणींचा होता.

विषय: 

स्लॅमबूक

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Subscribe to RSS - स्लॅमबूक