✪ कोईम्बतूरजवळच्या शाळेत विद्यार्थ्यांसोबत भेट
✪ तमिळनाडूतून केरळ प्रवेश
✪ वडक्कनचेरी, पण ते नाही हे!
✪ “ते वालं" हॉटेल नको, राहण्याचं हवं!
✪ पेडलिंगपेक्षा हॉटेल शोध मोहीम जास्त दमवणारी
✪ दक्षिण भारतीय लोकांची आत्मीयता!
✪ कर्नाटकातील रम्य सरोवरे आणि कावेरी नदी
✪ छोटी गावं आणि शांत रस्ते
✪ बेगूरच्या ऐवजी गुंडलुपेटमध्ये मुक्काम
✪ बांदीपूर राष्ट्रीय उद्यान आणि मधुमलाई व्याघ्र राखीव क्षेत्रातून प्रवास
✪ दक्षिण भारतातील शिस्त आणि सहकार्याचा अनुभव
✪ गुडलूरमधील मराठी बोलणार्याची भेट!
✪ दक्षिण भारतीय कुटुंबीयांची आपुलकी
✪ पोंगलची पूर्वसंध्या आणि उटीच्या उंबरठ्यावर
दक्षिण भारतीयांच्या एका समुहावर एका लेखासाठी थोडी मदत हवी आहे. _/\_
बृहन्मुंबई/ठाणे शहर/पनवेल शहर या ठिकाणी दक्षिण भारतीयांमार्फत(तमिऴ/तेलुगू/कन्नड/केरळी)लोकांकडून चालवली जाणारी हिंदू मंदिरे/धार्मिक संस्था कोणत्या?
पुढची मैफल बुधवार, १८ एप्रिल रोजी बंगलोरच्या प्रतिष्ठित 'बंगलोर गायन सभा' या हॉल मध्ये पार पडली. या मैफलीचे वैशिष्ट्य असे की प्रसिद्ध इतिहासकार आणि विचारवंत रामचंद्र गुहा यांची उपस्थिती. पुरिया धनश्री ने सुरु झालेल्या या मैफलीत पुढे अनेक रंग श्रोत्यांना अनुभवायला मिळाले. 'प्रभू मेरे अवगुण चित ना धरो' हे काफी रागात प्रस्तुत केलेले भजन, 'होली खेलन कैसे जाऊ' ही पिलू रागातील होरी, 'आन बान जिया में लागी' हा दादरा, 'ब्रूही मुकुंदेथी' ही एम. एस सुब्बुलक्ष्मी यांनी प्रसिद्ध केलेली रचना आणि शेवट भैरवी! ही विविधता रसिकांना समृद्ध करणारी होती. गुहा यांना ही राहवलं नाही.
१५ जानेवारी, २०१७ हा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस होता. पार्ल्याच्या हृदयेश फेस्टीवल मध्ये रात्री नऊच्या सुमारास पं. मुकुल शिवपुत्र हे 'शंकरा' राग अशा प्रभावीपणे गायले की पुढे आठवडाभर तरी मी त्या आठवणीने अस्वस्थ होतो. दुसऱ्या दिवशी दिल्लीला जाताना रात्री ट्रेन मध्ये त्याबद्दल 'फेसबुक'वर थोडेसे लिहिले आणि ते पुढल्या सकाळी इतके 'वायरल' झाले की दुपारपर्यंत 'धन्यवाद' लिहिलेले एक ई-मेल आले. उघडून बघितले तर नाव 'मुकुल शिवपुत्र!' पण हा चमत्कारिक अनुभव ही फक्त एक सुरुवात होती हे काही दिवसातच मला कळलं!
रोजचं जगणं धोपटमार्गावरून घरंगळत असत. सकाळच्या गजरापासून रात्रीच्या जांभईपर्यंत साधारणपणे सारखंच. ठराविक वयानंतर हे असच असणार, हे आपण कबूलही केलेलं असत. तीच नोकरी, तेच सहकारी, सरावाच झालेलं तेचतेच काम. घरीही तसंच. ठराविक रस्ता, त्यावरचे ठराविक सिग्नल. काही वाईट नसतं ह्यात. असं स्थैर्य मिळावं, म्हणून तर आपण जास्तीत जास्त शिक्षण घेऊन नोकरी-व्यवसाय सुरू करतो. कौटुंबिक, आर्थिक स्थैर्य मिळालं, की स्वतःची पाठ थोपटून घेतो.