खूप दिवसांपासून लिहायचं म्हणतोय पण बसून लिहायला तसा वेळच मिळेना, क्रूझच्या शेवटच्या दिवसांत सॅम्पल्स घेण्याची एवढी गडबड सुरु आहे. शिवाय आता इंटरनेट आल्यावर सगळी मोबाईलवर गुंग होणार, तेव्हा ते व्हायच्या आत शक्य तेवढा वेळ निव्वळ माणूस म्हणून उघड्या पडलेल्या माझ्या कलिग्ज बरोबर घालवायची ओढ पण होतीच. अशी माणसे फार छान असतात, इंटरनेट आलं कि ज्याची त्याची आभासी व्यक्तित्वे ज्याची त्याला जाऊन चिकटतात! पण सांगायचा मुद्दा असा की हे लिहायला वेळच मिळेना. अर्थात हे लिहायलाच पाहिजे असंही काही नाही, पण मला आलेला शुद्ध श्याम चा अनुभव इतका उत्कट होता कि तो नुसता एकदा अनुभवून समाधान होतंच कुठे?
स्वित्झर्लंडमध्ये तो माझा एक अत्यंत आनंदाचा दिवस होता. दिवसभर युंग्फ्रौ च्या कुशीत मनमुराद फिरलो होतो. स्वच्छ उन्हात वारा थंडीला वाट मोकळी करून देत होता. हिमकण खूळ लागल्यासारखे वाऱ्यावर नाचत होते आणि आणि एखादा हलकेच येऊन माझ्या तोंडावर तंबू ठोकत होता. समोर प्रचंड मोठी हिमनदी होती, आणि युगानुयुगे ती वाहत होती, त्यातुन येणारे हे हिमकण मला आपलं मानत होते हे केवढं मोठं सुख! अनादी काळापासून सुरु असलेल्या जलचक्रातून वाहून आलेले ते कण आणि २४ वर्षांचा मी, तरी सानथोरपणा न मानता ते माझ्याकडे आले हे निसर्गाचं औदार्य! असे विचार नकळत मनात येत होते आजूबाजूच्या शुभ्र-धवलामुळे आणि शहारायला होत होतं.
आजवर अनेक शुद्ध सारंग अनुभवले! माझा अतिशय आवडता राग आहे. खरं तर एकापाठोपाठ एकाच स्वराच्या शुद्ध आणि कोमल श्रुती ज्या रागांत येतात ते सगळेच राग आवडतात, मग तो दोन गंधारांना वापरून रात्रीला जगवणारा जोग असो कि दोन्ही निषादांच्या ढगांवरून बरसणारा मिया मल्हार असो किंवा कोमल गंधाराच दुखणं शुद्ध गंधाराने संहत करणारी शिवरंजनी असो! ती शुद्ध स्वरावरून कोमल स्वरावर येणारी अलगद उतरण काही तरी करते काळजात एवढं नक्की!
पुढची मैफल बुधवार, १८ एप्रिल रोजी बंगलोरच्या प्रतिष्ठित 'बंगलोर गायन सभा' या हॉल मध्ये पार पडली. या मैफलीचे वैशिष्ट्य असे की प्रसिद्ध इतिहासकार आणि विचारवंत रामचंद्र गुहा यांची उपस्थिती. पुरिया धनश्री ने सुरु झालेल्या या मैफलीत पुढे अनेक रंग श्रोत्यांना अनुभवायला मिळाले. 'प्रभू मेरे अवगुण चित ना धरो' हे काफी रागात प्रस्तुत केलेले भजन, 'होली खेलन कैसे जाऊ' ही पिलू रागातील होरी, 'आन बान जिया में लागी' हा दादरा, 'ब्रूही मुकुंदेथी' ही एम. एस सुब्बुलक्ष्मी यांनी प्रसिद्ध केलेली रचना आणि शेवट भैरवी! ही विविधता रसिकांना समृद्ध करणारी होती. गुहा यांना ही राहवलं नाही.
१५ जानेवारी, २०१७ हा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस होता. पार्ल्याच्या हृदयेश फेस्टीवल मध्ये रात्री नऊच्या सुमारास पं. मुकुल शिवपुत्र हे 'शंकरा' राग अशा प्रभावीपणे गायले की पुढे आठवडाभर तरी मी त्या आठवणीने अस्वस्थ होतो. दुसऱ्या दिवशी दिल्लीला जाताना रात्री ट्रेन मध्ये त्याबद्दल 'फेसबुक'वर थोडेसे लिहिले आणि ते पुढल्या सकाळी इतके 'वायरल' झाले की दुपारपर्यंत 'धन्यवाद' लिहिलेले एक ई-मेल आले. उघडून बघितले तर नाव 'मुकुल शिवपुत्र!' पण हा चमत्कारिक अनुभव ही फक्त एक सुरुवात होती हे काही दिवसातच मला कळलं!
गेली अनेक शतके मनुष्याला अखंड साथ लाभत आली, ती स्वर आणि सूररूपी संगीताची! मात्र या प्रवासात अनेकदा अशी वळणे येतात, जेव्हा या कलेची मीमांसा करणे गरजेचे होऊन जाते. काही टोकदार प्रश्न विचारावे लागतात, प्रसंगी कलेच्या काही अंगांवर अभ्यासक-समीक्षकांना कठोर शब्दांत टीकादेखील करावी लागते. कारण, या संगीतकलेचा तिच्या उगमस्थानाशी असलेला संपर्क तुटलेला असतो.
गुरु बिन ग्यान!
गुरु विषयी अनेकांनी अनेक ठिकाणी बोलून ठेवलं आहे. पण तरीही प्रत्येकाला स्वत:च्या अनुभवांविषयी सांगावस वाटत असतंच! त्याला मी काही अपवाद नाही. म्हणून हा खटाटोप!
नमस्कार मंडळी
शास्त्रीय संगीत प्रश्नोत्तरे या धाग्यावरच्या चर्चेतून संगीतविषयक कार्यशाळा घेतली जावी अशी कल्पना पुढे आली.
सी.एस.टी वरून पनवेलला येणाऱ्या शेवटच्या लोकलने प्रवास करत होतो. मुंबईतल्या 'वारा खेळता असणाऱ्या' अश्या एकाच ठिकाणी - म्हणजे ट्रेनच्या दरवाज्यात उभा होतो!