जेसिका आणि 'ती' सरोदची मैफल
Submitted by आशयगुणे on 8 February, 2013 - 04:46
समूहात राहून एका ठराविक साच्यात आयुष्य जगायचे हा माझा स्वभाव नाही. एकतर आपण स्वतःचे व्यक्तिमत्व विसरून जातो आणि दुसरं म्हणजे आपला वैयक्तिक विकास काहीच होत नाही. अमेरिकेत बऱ्याच भारतीय विद्यार्थ्यांचे असेच काहीतरी असते. सोमवार ते शुक्रवार विद्यापीठात काम केले की वीकेंडला पार्टी करायची. फार-फार तर पब्स आणि डिस्को मध्ये जाऊन यायचे आणि उरलेला वेळ आपण जाऊ ती जागा न पाहता त्या जागेत स्वतःचे हवे तेवढे फोटो काढून फेसबुकवर टाकायचे!
सी.एस.टी वरून पनवेलला येणाऱ्या शेवटच्या लोकलने प्रवास करत होतो. मुंबईतल्या 'वारा खेळता असणाऱ्या' अश्या एकाच ठिकाणी - म्हणजे ट्रेनच्या दरवाज्यात उभा होतो!