पियानो
तबला आणि पियानो एकत्र शिकावा का?
गेले २-३ वर्षे माझा मुलगा तबला शिकतो आहे. आता शाळेमधे ऐच्छिक पियानो क्लासेस आहेत. मधे एका मित्राकडे छोटा किबोर्ड वाजवण्यात बराच इंटरेस्ट दाखवला होता आणि याचेपण क्लासेस असतात का विचारत होता. तेव्हा शक्य झाले नाही. आता शाळेतच शिक्षक येतील आणि त्याच वेळेत होईल म्हणून विचार करतो आहोत.
माझा प्रश्न असा की, तबला आणि पियानो एकमेकाना पूरक आहेत का? तबला तर बंद नाही करायचा. पियानोपण चालू केला तर काही गोंधळ उडणार नाही ना?
बांग्लादेशचे प्राध्यापक डॉ. बरुण चौधरी
आपल्याकडे गुरूची किव्हा शिक्षकाची तुलना ब्रह्मा, विष्णू , महेश ह्यांच्याशी जरी केली असली तरीही त्यावर विश्वास बसेल असे फार थोडे गुरु माझ्या नशिबात आले आहेत.खरं सांगायचं तर, शाळेत आणि नंतर कॉलेज मध्ये माझे मार्क हे पी चिदंबरम ह्यांच्या बजेट सारखे असायचे! एका विषयात जास्त मार्क मिळाले की दुसऱ्या विषयात कमी मिळून त्याची भरपाई होयची. एकूण काय मार्कांच्या बाबतीत आम्ही मध्यमवर्गीय - खूप जास्त नाही आणि खूप कमी देखील नाही! आणि त्यामुळेच मध्यमवर्गीय लोकांसारखे आम्ही दुर्लक्षित! कधी कौतुक नाही आणि कधी निंदा देखील नाही. कौतुक व्हावं असं आम्ही काही करत नव्हतो असं नाही.
अमेरिकन मुलांना दिलेले भारतीय संगीताचे धडे
समूहात राहून एका ठराविक साच्यात आयुष्य जगायचे हा माझा स्वभाव नाही. एकतर आपण स्वतःचे व्यक्तिमत्व विसरून जातो आणि दुसरं म्हणजे आपला वैयक्तिक विकास काहीच होत नाही. अमेरिकेत बऱ्याच भारतीय विद्यार्थ्यांचे असेच काहीतरी असते. सोमवार ते शुक्रवार विद्यापीठात काम केले की वीकेंडला पार्टी करायची. फार-फार तर पब्स आणि डिस्को मध्ये जाऊन यायचे आणि उरलेला वेळ आपण जाऊ ती जागा न पाहता त्या जागेत स्वतःचे हवे तेवढे फोटो काढून फेसबुकवर टाकायचे!
डेविड
मागच्या महिन्याची गोष्टं! मी भारतात चाललोय हे बर्याच लोकांना माहिती होते. जाणे एका आठवड्यावर आले होते. तेवढ्यात 'फेसबुक' वर ह्याचा संदेश आला. 'गेले बरेच दिवस आपण ठरवतोय.....एकत्र मैफल करायची आहे...कधी करूया? आता तर तू चालला आहेस!' मी म्हणालो ह्या एका आठवड्यात कधीतरी जमवुया. लगेच दुसऱ्या दिवशी ह्याने परत उत्तर पाठवले 'शुक्रवारी दुपारी जमेल का? माझा सकाळी क्लास झाला, की मी मोकळा आहे...दुपारी दोन वाजेपर्यंत आहे...तू ६०३ नं ची बस पकड....माझ्या घराच्या समोर थांबते! जाताना ८.०० वाजता तुला परत घरी जायला बस आहेच! आणि खाली त्याने त्याचा पत्ता पाठवला. मी लगेच होकार कळवला.