आपल्याकडे गुरूची किव्हा शिक्षकाची तुलना ब्रह्मा, विष्णू , महेश ह्यांच्याशी जरी केली असली तरीही त्यावर विश्वास बसेल असे फार थोडे गुरु माझ्या नशिबात आले आहेत.खरं सांगायचं तर, शाळेत आणि नंतर कॉलेज मध्ये माझे मार्क हे पी चिदंबरम ह्यांच्या बजेट सारखे असायचे! एका विषयात जास्त मार्क मिळाले की दुसऱ्या विषयात कमी मिळून त्याची भरपाई होयची. एकूण काय मार्कांच्या बाबतीत आम्ही मध्यमवर्गीय - खूप जास्त नाही आणि खूप कमी देखील नाही! आणि त्यामुळेच मध्यमवर्गीय लोकांसारखे आम्ही दुर्लक्षित! कधी कौतुक नाही आणि कधी निंदा देखील नाही. कौतुक व्हावं असं आम्ही काही करत नव्हतो असं नाही.
तुझ्या वाहत्या पाण्याच्या लाटांवर
माझं चित्र कसं विखुरलय ...
तुझ्या काठावर मी उभा
अविचल, निश्चल
माझ्या फुलांच्या डोळ्यांचा मी !
माझ्या गंभीरतेतच आत
खोल खोल दडलंय माझं झुलणं ..
माझं पालवणं
बहरणं
आणि
एक अनामिक जीवनेच्छा !
गंभीर गाभार्यातून सरसरतो
फुलणारा पूर
भिडतो आभाळाला
आणि
नीरव शांततेची एक पहाट
छेदतो ..
पूर्व दिशेला !
मूळ कविता : रविंद्रनाथ टागोर
मुक्त अनुवाद मी केला ''चैत्र'' या नाटकासाठी
तुझी वाट अनिवार पाहाता पाहाता
अन्
आयुष्याचे कण मोजता मोजता
वसंताच्या एका शुभ्र सकाळचं तुझं येणं ..
मृत्यूच्या सूक्ष्म जाणिवांवरही विजय मिळवलेलं तुझं रूप ...
चैतन्याने भारलेला तुझा आवाज ...
सृष्टीतल्या अवघ्या फुलांचा दरवळ
केसांत माळलेली फुलं ?
की
चांदण्यात हरवलेली ?
असे लाखो संभ्रम !
आणि
त्यातच आणखी संभ्रमात पाडणारं
तुझं हे हंसू !
या तुझ्या दिसण्यात,
हसण्यात ..
मृत्यूने
आपले बाण तर लपवून ठेवले नाहीत ना ?