रविंद्रनाथांच्या कविता १ - तुझ्या नव्या रूपाबद्दल ...
Submitted by vaiddya on 2 September, 2010 - 03:56
तुझी वाट अनिवार पाहाता पाहाता
अन्
आयुष्याचे कण मोजता मोजता
वसंताच्या एका शुभ्र सकाळचं तुझं येणं ..
मृत्यूच्या सूक्ष्म जाणिवांवरही विजय मिळवलेलं तुझं रूप ...
चैतन्याने भारलेला तुझा आवाज ...
सृष्टीतल्या अवघ्या फुलांचा दरवळ
केसांत माळलेली फुलं ?
की
चांदण्यात हरवलेली ?
असे लाखो संभ्रम !
आणि
त्यातच आणखी संभ्रमात पाडणारं
तुझं हे हंसू !
या तुझ्या दिसण्यात,
हसण्यात ..
मृत्यूने
आपले बाण तर लपवून ठेवले नाहीत ना ?
गुलमोहर:
शेअर करा