निर्गुणी भजन - राम निरंजन न्यारा रे
कबीरांचं नावं सुद्धा लावायची गरज वाटली नाही कारण राम आणि कबीर एकच ना.. ..आधी वाटलं की शीर्षकात पुढे काही अर्थ , अन्वय , विवेचन द्यावे का पण नाही ते ह्या निरंजन रामाला लागलेले अंजन- किल्मिष वाटलं मलाच .... मी कोण अर्थ लावणारी जे कबीराला ऐकताना झिरपलं आणि विशुद्ध भाव फक्त उरला तो व्यक्त करायला ह्या काळ्या चिन्हांचा आधार...अक्षरांची केविलवाणी धडपड. जे मुक्त आहे अव्यक्त आहे ते व्यक्त करायला पुन्हा त्याला बंधनात टाकावं लागलं... विरोधाभासच नाही का!
खूप दिवसांपासून लिहायचं म्हणतोय पण बसून लिहायला तसा वेळच मिळेना, क्रूझच्या शेवटच्या दिवसांत सॅम्पल्स घेण्याची एवढी गडबड सुरु आहे. शिवाय आता इंटरनेट आल्यावर सगळी मोबाईलवर गुंग होणार, तेव्हा ते व्हायच्या आत शक्य तेवढा वेळ निव्वळ माणूस म्हणून उघड्या पडलेल्या माझ्या कलिग्ज बरोबर घालवायची ओढ पण होतीच. अशी माणसे फार छान असतात, इंटरनेट आलं कि ज्याची त्याची आभासी व्यक्तित्वे ज्याची त्याला जाऊन चिकटतात! पण सांगायचा मुद्दा असा की हे लिहायला वेळच मिळेना. अर्थात हे लिहायलाच पाहिजे असंही काही नाही, पण मला आलेला शुद्ध श्याम चा अनुभव इतका उत्कट होता कि तो नुसता एकदा अनुभवून समाधान होतंच कुठे?
संगीत, स्वरविश्व या गोष्टी शब्दांच्या पलीकडच्या असतात. त्या शब्दांत बांधू पाहणे म्हणजे 'मुक्याने गूळ खादला । गोडी न ये सांगायाला' म्हणजेच मुक्या व्यक्तीने गूळ खाऊन त्याची गोडी सांगायचा प्रयत्न केल्यासारखेच! त्यामुळे मनाला स्पर्शून जाणाऱ्या संगीत/स्वरविश्वातल्या कोणत्याही कृतीबद्दल काही लिहायचेच झाले तर त्याच्या शेवटी 'अवर्णनीय आनंद' हे हमखास येणारच! त्यामुळे नादब्रह्मापुढे शब्दब्रह्माने मौन पाळणेच योग्य ठरते.
एकदा एका मैफलीत कुमार गंधर्वांनी गात असलेल्या रागात अचानक वर्ज्य सूर लावला. मात्र मैफल नेहमीप्रमाणे जिंकली. मैफलीनंतर कुणीतरी एका रसिकाने याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले की तो सूर केव्हापासून दरवाजातून येऊ का ? असं खुणवत होता, मग मला नाही म्हणवेना .
कदाचित कुमारांची मनस्थिती तेव्हा अशी झाली असावी:
त्या एक स्वराची बिजली
स्पर्शून निसटती गेली.....
ती मैफल मग जमलेली
ती बंदिश मज सुचलेली
....मग माझी उरली नाही
उघडता दार अज्ञात
होऊन अनावर आत
कोसळतो कुठुन प्रपात
हे काय भिने रक्तात
...त्या वेळी कळले नाही
गेली अनेक शतके मनुष्याला अखंड साथ लाभत आली, ती स्वर आणि सूररूपी संगीताची! मात्र या प्रवासात अनेकदा अशी वळणे येतात, जेव्हा या कलेची मीमांसा करणे गरजेचे होऊन जाते. काही टोकदार प्रश्न विचारावे लागतात, प्रसंगी कलेच्या काही अंगांवर अभ्यासक-समीक्षकांना कठोर शब्दांत टीकादेखील करावी लागते. कारण, या संगीतकलेचा तिच्या उगमस्थानाशी असलेला संपर्क तुटलेला असतो.
... 'चैत्या, अरे तुम्ही चेन्नईत असून किती रे भाग्यवान?' अशा वाक्याने बंगलोरमधली एक मैत्रीण मला पुढे एकही अक्षर उच्चारू न देता फोनवर सुरू झाली ! मागच्याच आठवड्यात शुभा मुद्गलांचं गाणं ऐकायला गेल्याचं मी तिला सांगितलं होतं. आणि तिने मला या आठवड्यात चेन्नईत होणार्या श्रीमती वसुंधरा कोमकली आणि कलापिनी कोमकली यांच्या 'सह-गान' बद्दल सांगायला फोन केला होता.
माझ्या पत्रिकेत त्या दोन आठवड्यात 'संगीत-घबाड' योग असणार खास ! (संगीत-घबाड हा शब्द माधव यांच्याकडून साभार :))
पंडित विष्णु दिगंबर पलुस्करांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला वेगळंच वळण दिलं हे सर्वश्रुतच आहे. विष्णु दिगंबर आणि त्यांच्या गांधर्व महाविद्यालयानं अनेक गायक व शिक्षक तयार केले. त्यांपैकीच एक प्रो. बी. आर. देवधर. विष्णु दिगंबरांनी ज्यांना गायनाबरोबरच शालेय शिक्षणाचीही परवानगी दिली, असे देवधर हे एकमेव विद्यार्थी. कलाशाखेची पदवी मिळवलेले देवधर मास्तर हे त्या काळी एकमेव शिक्षित असे गायक होते. विष्णु दिगंबरांच्या परवानगीने त्यांनी पाश्चात्य शास्त्रीय संगीताचेही धडे गिरवले होते.