पूर्वीच्या मद्रास प्रांताची राजधानी असलेलं चेन्नई महानगर संपूर्ण दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात असे. अतिशय प्राचीन आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या अनेक खुणा या शहरात आजही पाहायला मिळतात. चेन्नई शहराच्या इतिहासाची ओळख त्यातून नव्या पिढीला होत असते. अशातीलच एक, वसाहतकाळात चेन्नईमध्ये उभारण्यात आलेली अतिशय देखणी वास्तू म्हणजे चेन्नईतील मुख्य रेल्वेस्थानकाची म्हणजे चेन्नई सेंट्रलची इमारत. आज या स्थानकाचं अधिकृत नाव पुरट्चि तलैवर डॉ. एम. जी. रामचंद्रन चेन्नई सेंट्रल असं आहे. आज हे स्थानक चेन्नई शहराला देशाच्या कानाकोपऱ्याशी जोडते.
८ एप्रिल २००५. माझ्यासाठी एक एक्सायटींग दिवस होता. काही कामाच्या निमित्ताने चेन्नईला जायचे होते. मग मी आणि वडिलांनी कोल्हापूरहून रेणिगुंट्यापर्यंत ७३१६ हरिप्रिया एक्सप्रेसने आणि पुढे चेन्नईपर्यंत मिळेल त्या गाडीने जाण्याचा निर्णय घेतला. महिनाभर आधी आरक्षण केले आणि मिळालेही. त्यानंतर हा दिवस एक्सायटींग ठरण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे कोल्हापुरातून निघून वेगळ्याच दिशेने जाणाऱ्या गाडीने हा प्रवास होणार होता. त्यातच कोल्हापुरातून निघून थेट मिरजेतच थांबणाऱ्या गाडीचा आयुष्यातील तो पहिलाच प्रवास असणार होता. इतकेच नाही तर कोल्हापुरातून सुटणारी ती पहिलीच वेगवान गाडी होती.
चेन्नई येथे अतिवृष्टी व पूरपरिस्थिती संबंधाने इथे लिखाण करावे.
इथे मदतकार्य संबंधाने डॉक्टर व इस्पितळांचे दूरध्वनी क्रमांक व इतर तत्सम माहितीची देवाणघेवाण करावी.
चेन्नई मधे आत्ता नक्की काय परिस्थिती आहे यासंदर्भातही लिखाण करावे
इथे पुरपरिस्थिती टाळण्यासाठी काय करायला हवे होते वगैरे चर्चा अपेक्षित नाही. तसेच, पाऊस मोदीं/भाजप/संघ इत्यादींनी पाडला नसल्याने त्या अनुषंगाने चर्चा जाऊ नये ही अपेक्षा.
परिस्थिती सामान्य झाल्यावर हा धागा उडवलात तरी चालेल अशी प्रशासकांना विनंती.
फिल्लमी गाण्यांवर देवादिकांची भजनं (?) ऐकायला येणं तुम्हा आम्हाला नवीन नाही. कुठल्याही 'फेमस' देवळाच्या परिसरात अशा कलाकृती ऐकायला मिळतात. तर या संगीतप्रकारात माझ्याकडून एक भर पडण्याचा योग असावा; म्हणून मला हे जे गणपतीचं भजन (हा शब्द योग्य न वाटल्यास जो शब्द योग्य वाटेल तो इथे वाचावा) स्फुरलं, ते आपणापुढे मांडत आहे.
चूक भूल माफ असावी.
चेन्नई एक्सप्रेस च्या लुंगी डान्स या रचनेच्या चालीवर आधारित.
कपाळावर; लावुनि गंध
बाप्पाचा; घेऊनि छंद
सेवा करू प्रेमभावाने
म्हणू सारे एकमुखाने
तूच अमुची शान... (रे बाप्पा)
तूच अमुचा प्राण...(रे बाप्पा)
तूच अमुची शान... (हे)
आजच चित्रपट पाहिला आणि खरे तर हे माझे आजचे फेसबूक अपडेट आहे जे मजाक मजाक मध्ये परीक्षण लिहिल्यासारखे मोठे झाले म्हणून मायबोलीवर सुद्धा टाकतोय.
तसेच असेल तर रसप यांच्याच धाग्यात का नाही टाकलेस, वेगळा धागा काढायचा शहाणपणा का?? असा प्रश्न वाचकांना पडू शकतो तर विनम्रपणे सांगू इच्छितो की हे परीक्षण निव्वळ चेन्नई एक्स्प्रेसचे नसून यात उघड उघड शाहरुख खान लपलाय जो नक्कीच एक स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.
______________________________________________________
चेन्नई एक्सप्रेस ..!!
मराठी माणूस मुंबईपेक्षा चेन्नई मधे जास्त 'कम्फर्टेबल' असेल खरे वाटत नाही ना? रजनीकांत चे ठीक आहे, त्याचा जन्म तिकडेच गेला आहे. पण आपला सर्वात लोकप्रिय मुंबईकर खरा 'दिसतो' तो चेन्नईत.