चेन्नई एक्सप्रेस ... शाहरुखच्या चाहत्यांसाठी मस्ट सी !

Submitted by तुमचा अभिषेक on 10 August, 2013 - 13:07

आजच चित्रपट पाहिला आणि खरे तर हे माझे आजचे फेसबूक अपडेट आहे जे मजाक मजाक मध्ये परीक्षण लिहिल्यासारखे मोठे झाले म्हणून मायबोलीवर सुद्धा टाकतोय.

तसेच असेल तर रसप यांच्याच धाग्यात का नाही टाकलेस, वेगळा धागा काढायचा शहाणपणा का?? असा प्रश्न वाचकांना पडू शकतो तर विनम्रपणे सांगू इच्छितो की हे परीक्षण निव्वळ चेन्नई एक्स्प्रेसचे नसून यात उघड उघड शाहरुख खान लपलाय जो नक्कीच एक स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.

______________________________________________________

चेन्नई एक्सप्रेस ..!!
आजच पाहिली, दादर स्टेशनवर नाही हं, तो जोक जुना झाला, थिएटरमध्येच पाहिली. सुरुवातीपासूनच जी सुसाट सुटते ती दोन-अडीज तासांचे मनोरंजन करूनच थांबते. प्रवासाच्या आठवणी काही रेंगाळत नाहीत मात्र जो काही टाईमपास होतो तो पैसा वसूल आहे. भले मग तुम्ही २००-२५० रुपयांचे तिकिट घेऊन मल्टीप्लेक्समध्ये का बघत असानात.. किंबहुना चित्रपटात जी निव्वळ अप्रतिम लोकेशन्स दाखवली आहेत त्याचा पुरेपूर आनंद मोठ्या पडद्यावरच..! खास करून सुरुवातीच्या एका सीनमध्ये जेव्हा ट्रेन दिपीकाच्या गावच्या पूलावर अर्धवर्तुळाकारात थांबते तेव्हा पाठीमागून कोसळणार्‍या शुभ्र धबधब्याच्या पार्श्वभूमीवर आकाशातून टिपलेले दृश्य.. अहाहा.. लाजवाब!

रोहित शेट्टीचा सिनेमा असला तरी हिरो अजय देवगण नसल्याने अ‍ॅक्शन त्यानुसारच अतिरेक टाळून.. तसेच रोमान्सचे बोलाल तर शाहरुख असूनही बर्‍यापैकी गाळून.. ज्याचा अंदाज आधीच येतो जेव्हा तो चित्रपटाच्या सुरुवातीलाच प्रामाणिकपणे आपले वय वर्षे चाळीस कबूल करतो.. Wink

तर चित्रपट निखळ विनोदी या सदरात मोडतो.. पण नर्म हलकेफुलके विनोद हा प्रकार आजकाल कालबाह्य झाल्याने फूल टू मॅड कॉमेडी चालते.. शाहरुखच्या कॉमिक टायमिंगवर कोणाला डाऊट नसावा मात्र दिपिकाने देखील सुखद धक्का दिला आहे. शाहरुख असूनही ती तितकीच लक्षात राहते यातच सारे आले. अर्थात याचे श्रेय दिग्दर्शकाला देखील ज्याने तिलाही समान स्कोप दिला आहे.

काही ठिकाणी चुरूचुरू संवाद आणि कोलांट्या उड्या मारायच्या नादात शाहरुख ओवरअ‍ॅक्टींग करून जातो मात्र या सगळ्यात तितक्याच टाळ्या आणि हसेही वसूल करतो. तामिळी लोकांना संशय येऊ नये म्हणून शाहरुख अन दिपिकाचे हिंदी गाण्यांच्या चालीत हिंदीत संवाद बोलणे हा कॉमेडीचा अगदी फ्रेश प्रकार आणि तूफान जमलाय. बाकी शाहरुखचे तामीळ बोलणे आणि इतर प्रासंगिक विनोद इथे सांगण्यात मजा नाही, ते स्वताच बघा. पण एक मात्र आहे, विनोदाची जमलेली भट्टी पाहता येत्या काळात "शाहरुख - रोहित शेट्टी" जोडीचा किमान एकतरी असाच मसालापट येणार हे नक्की. कारण शाहरुखचे वाढलेले वय त्याच्या चेहर्‍यावर झळकते म्हणून आता जब तक है जान तब तक ये खान पुन्हा रोमांटिक चित्रपट करेल असे काही वाटत नाही, अ‍ॅक्शन चित्रपट हा काही त्याचा बाज नाही, चकदे-स्वदेश सारखे चित्रपट वरचेवर बनत नाहीत आणि कलात्मक चित्रपट सुपरस्टार करत नाहीत.. तर राहता राहिली कॉमेडी जिचे त्याच्यात उत्तम पोटेंशिअल आहे.

चित्रपटातील ईतर कलाकारांबद्दल मला फारसे भाष्य करायचे नाही कारण सारे शेप साईज कलर अन ड्रेसमध्ये एकसारखेच वाटतात, उगाच एकाचे नाव घेतले अन दुसर्‍याचे नाही तर त्याला वाईट वाटायचे.

चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलायचे झाल्यास पहिली दोन गाणी चांगली तर नंतरची दोन थोडीफार बोअर मारतात. पाचवे गाणे देखील बोअरच आहे पण ते चित्रपट संपल्यावर लागते हेच काय ते समाधान. तरीही लोक खुर्च्या सोडत नाहीत कारण एकंदरीत सर्वच गाण्यांचे चित्रीकरण सुरेख आहे.

अश्या चित्रपटांचे परीक्षण देताना वापरतात तो, "डोके बाहेर ठेऊन गेलात तर निखळ मनोरंजन होईल" टाईप टिपिकल डायलॉग यालाही लागू होईल (बाकी डोके आत घेऊन जायचे असते अश्या चित्रपटांना किती लोक जातात हा एक सर्वेक्षणाचा विषय आहे) असो, हे खरे आहे कारण चित्रपटाची कथा चार वाक्यांचीच आहे, जी मी इथे तुम्हाला सांगितली तरी चित्रपटाच्या रसग्रहणावर जराही फरक पडणार नाही. हा काही एखाद्या सुप्रसिद्ध लेखकाच्या नावाजलेल्या कांदबरीवर आधारीत चित्रपट नाही तर स्टोरी काय, कशी, याचा आतापासूनच जास्त लोड घेऊ नका.

आता रेटींग - जर तुम्ही एसआरके चे पीएसपीओ पंखे असाल तर तुमच्यासाठी म्हणून रेटींग फोर स्टार (****) ..... चला, फोर अ‍ॅण्ड हाल्फ घ्या, माझ्या बापाचे काय जातेय.. पण जर तो तुम्हाला आवडत नसेल.., खरे तर असे बरेच जण बोलतात पण त्यातले कित्येक दुसर्‍यांना फसवत असतात तर कित्येक स्वतालाच.., पण तरीही तो तुमच्या डोक्यात जात असेल तर चुकूनही जाऊ नका.. कारण चित्रपटात असा एकही सीन नाही ज्यात तो तुम्हाला पडद्यावर दिसणार नाही.. तर उगाच निसर्गसौंदर्य वा दिपिकाचे सौंदर्य बघायला म्हणून जाऊन स्वताच्या जीवाला त्रास करून घेऊ नका.

तळटीप - या चित्रपटाचे परीक्षण देण्याच्या नावाखाली काही शाहरुखद्वेष्टींचे आकसाने भरलेले मत तुम्हाला आंतरजालावर इथेतिथे फिरताना मिळेल, तर त्याला गंडू नका, माझ्यावर विश्वास ठेवा, मजा नाही आले तर मी पैसे परत मिळवून देईन, तिकिट तेवढे जपून ठेवा !
*** टर्मस अ‍ॅंड कंडीशन अप्लाय - बोले तो हि ऑफर फक्त शाहरुखच्या चाहत्यांसाठी आहे Wink

जाता जाता ---- एकाच गोष्टीचे वाईट वाटते, माझे ईंग्लिश चांगले नसल्याने हे लिखाण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. तर बॅडलक शाहरुख खान.. तरी शाहरुखचे मराठी भाषिक चाहते हे स्टेटस शेअर करू शकतात, माझी पूर्वपरवानगी घ्यायची आवश्यकता नाही Happy

- तुमचा अभिषेक

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी जाणार मी जाणार
अरे ओम शांती ओम, रा-वन पण मी ५-६ वेळा थेटरला जाऊन पाहिलेत
कधी उजाडणार उद्या!!!!!!!!!!!!!!!
हे भगवान....ही रात्र लवकर सरू देत....
लवकर उद्याचे सकाळचे ११ वाजू देत
चष्मा दुरुस्तीला टाकला तर उद्या काय म्हणुन टाकला नाही आता तो तसाच फुटका चश्मा घालून जाणार
पण जाणारच!!!!!!!!!!!!!!

काही जणांना हा चित्रपट आवडला नाही

कारण यात विकृत चित्रण केलेले नाही आहे... काही जणांना फक्त विकृती, बटबटीत हिंसाचार, सॉफ्ट्पोर्न अश्यांनी भरलेले चित्रपट आवडतात त्यामुळे निखळ मनोरंजण असलेला जो प्रत्येक वयोगटाच्या लोकांनी एकत्रीत बसुन बघण्यालायकीचा चित्रपट आवडणारच नाही...

१) महिलांवर अत्याचार दाखवले नाही..उगाचच छेडछाड वगरे नाही
२) अश्लिल हावभाव असलेले आयटम साँग नाही
३) फेविकॉल , चिकनी चमेली, हलकट जवानी अश्या द्विदार्थी गाण्यांची रेलचेल नाही
४) बटबटीत हिंसाचार नाही.. विकृत हाणामारी नाही
५) एकाच बुक्कीत १० -१५ गुंड येडछाप पणे उडत नाहीत
६) अभिनेता आणि अभिनेत्रीने उगाचच अंगप्रदर्शन केले नाही
७) गरमागरम बेड सिन्स नाहीत
८) महिलांना योग्य तो सन्मान..
९) सासबहु टाईप रडारड नाही ...
१०) एकाच चेहर्यावर विविध अँगल नी १० - १२ वेळा कॅमेरा फिरत नाही
११) साउथ च्या कोणत्याही चित्रपटावरुन कॉपी केलेला नाही
१२) ओंगळ्पना नाही
१३) अति तिथे माती नाही ...

तब्बल १३ महत्वाचे घटक नाही आहे... जे तुम्हाला अत्यंत आवडीचे आहेत... म्हणुन तुम्हाला "चेन्नई एक्स्प्रेस" चित्रपट आवडणार नाही Biggrin

तुमच्या बुध्दीमत्तेला त्रिवार सलाम ..:खोखो:

हा हा ... भारी हां उदय ... पण चित्रपट आवडला नाही बोलणारे कितपत प्रामाणिक असतात हा एक संशोधनाचा विषय आहे.. कारण बरेच जण फॅड म्हणून शाहरुखच्या विरोधात लिहितात असेही आहेत..

थोड्यावेळापूर्वीचा किस्सा सांगतो -

फेसबूकवर एका मित्राच्या वॉलवर चर्चा चालू होती.
एकाने कॉमेंट टाकली की भंगार मूवी आहे, एसाआरकेचे सारेच मूवी क्रॅप असतात.
मी त्याला म्हणालो, "आधी बघ मित्रा आणि मग काय ते बोल.."
तर म्हणाला, "कालच बघून आलो.."
अर्थात मला ते समजले होतेच. मुद्दाम खडा टाकलेला. त्याला विचारले की तुला माहीत आहे की त्याचे सारेच मूवी बोकवास असतात तर दुसर्‍याच दिवशी का बघायला गेलास??"
अर्थात हे असे बरेच जण करतात, आणि अश्यावेळी साधारणा त्यांचा जो बचाव असतो तेच उत्तर समोरून आले, "काय करणार, माझ्या बायकोला तो शाहरुख आवडतो, तिला बघायचा होता.."
माझ्या मनात आलेले त्याला यावरून आणखी ताणायचे .. म्हणजे तुला एसाआरकेचा एवढा राग असताना तो बायकोला एवढा आवडतो तर त्यावेळी नेमके कसे वाटते वगैरे वगैरे.. पण तो माझा नसून माझ्या मित्राचा मित्र असल्याने आवरते घेतले ..

हो पाहिले... आताच तुझे रसप यांच्या धाग्यावरचे परीक्षण आणि वाद वाचून तिथे कॉमेंट टाकून आलोय..
मी कालपासून कुठेकुठे हेच करतोय Proud

उदयन ,
हळू Happy
चित्रपट आपल्याला आवडला , बास . इतरांकडे लक्ष नाही द्यायचे . Happy
शाहरूखला शिव्या दिल्याशिवाय काहीजणाना बरच वाटत नाही . पण that's their opinion Happy
त्यातही पिक्चर पडला तर शाहरूखचा असतो , चालला तर फराह खान किंवा रो शे चा असतो Happy
मीही आधी खूप भांडायचो , पण नंतर लक्षात आल की त्यात काही अर्थ नाही.
शारूख म्हणा , सारूक मना , रूकरूक म्हणा , काय फरक पडतो ?

मस्त आहे चित्रपट.
अभिषेक ... छान लिहिलंय
उदयन..पोस्ट आवडली.

एक गोष्ट नोट केलीये का? या धाग्यावर फक्त सकारात्मक पोस्टच आल्या आहेत आत्तापर्यंत. Happy

एक गोष्ट नोट केलीये का? या धाग्यावर फक्त सकारात्मक पोस्टच आल्या आहेत आत्तापर्यंत.
>>>>>>>>>>>>>>>

याला धाग्याकर्त्याचे वा परीक्षण देणार्‍याचे यश म्हणतात Happy

त्यातही धाग्यात शाहरुखचा `उल्लेख' असूनही हे शक्य झाल्याने `उल्लेखनीय यश' म्हणू शकतो. Wink

एक आतली खबर - चेन्नई एक्सप्रेसला मराठी क्राऊड तुफान..

काही लोकांनी दुनियादारी सिनेमावर केलेल्या टिकेचा फायदा झाला असे जाणकारांचे म्हणने...

मला शा.खा. नाही आवडत.... कधीच आवडला नव्हता. सगळ्या खानांत मला हा खान नावडता आहे.
तरी, पिच्चर पाहिला कारण मला का कुणास ठाऊक माहित होतं की 'एन्टर्टेन्मेन्ट' वसूल असणार आहे आणि आहेच.

मी हा पिच्चर पुन्हा पाहू शकतो.
ह्यातला शा.खा. मला तरी चक्क आवडला!! (काही वेळा तर असंही वाटलं की कदाचित इथे शा.खा.च हवा होता.)

अभिषेक, तुम्ही सुंदर लिहिले आहे ! Happy

इतरांनी पेटवला.....................मी फक्त पेट्रोल टाकले Wink

सुंदर लिहिलेय आणि उदयनची पोस्ट वाचून, हे सर्व नसणारा चित्रपट आजच्या काळात बनवायचा, म्हणजे धाडसच म्हणावे लागेल.

शा खा चे इथे, मा बो वर इतके फॅन्स आहेत हे बघून काय थंडक पहुंची है मेरे कलेजे को!!!
>>>>>>>>
अहो असे खूप असतील, उगाच का तो सुपर्रस्टार आहे..

चित्रपट तर सोडा, त्याची जाहीरात करायला मागच्या आठवड्यात इंडियन आयडल ज्युनिअरमध्ये आलेला तेव्हाचे त्याचे त्या मुलांसोबत वावरणे अन त्या शोच्या त्या एपिसोडला चार चांद लावणे दाखवून देते तो का सुपर्रस्टार आहे ते..:)

सगळ्या सकारात्मक पोस्टना +११११११

उदयन , म्हणूनच पिक्चर बघून आल्यावर मस्त वाटल
आणि मला वाटत की मस्त वाटण्या साठीच आपण पिक्चर बघतो ना

चित्रपट आपल्याला आवडला , बास . इतरांकडे लक्ष नाही द्यायचे .+११११११११

छान

शाहरुखचे comedy timing मस्त आहे ह्याबद्दल वाद घालणार्‍याला विनोदबुद्धीचे वावडे आहे असे समजून नेहमी माफ करावे.

शाहरुखचा screen presence चांगला आहे. तो मधे मधे overacting करतो हे मान्य केले तरी त्याचा सिनेमा बरेचदा त्याच्यामूळेच सुसह्य असतो हे कसे नाकारणार ? त्रिमूर्ती शेवटपर्यंत पाहणारे किती जण असतील ? शाहरुख च्या entry पर्यंत वाट पाहू शकलेलेच फक्त शेवटपर्यंत थांबू शकतात ह्यातच सगळे आले.

बरा वाईट कसाही असला तरी त्याचा सिनेमा चर्चेमधे असतो. star value ह्यापेक्षा वेगळी काय असते ?

त्याला अभिनय येतोय कि नाही ह्याबद्दल वाद घालणार्‍यांसाठी संजीव कुमारलाही अभिनय येत नाही म्हणणारे बरेच जण आहेत हे लक्षात ठेवून माफ करावे.

>> त्याला अभिनय येतोय कि नाही ह्याबद्दल वाद घालणार्‍यांसाठी संजीव कुमारलाही अभिनय येत नाही <<

उद्या तुम्ही मुकेश आणि मेहदी हसनमध्येही अशीच काही तुलना केलीत तर आश्चर्य वाटणार नाही.

Pages