आजच चित्रपट पाहिला आणि खरे तर हे माझे आजचे फेसबूक अपडेट आहे जे मजाक मजाक मध्ये परीक्षण लिहिल्यासारखे मोठे झाले म्हणून मायबोलीवर सुद्धा टाकतोय.
तसेच असेल तर रसप यांच्याच धाग्यात का नाही टाकलेस, वेगळा धागा काढायचा शहाणपणा का?? असा प्रश्न वाचकांना पडू शकतो तर विनम्रपणे सांगू इच्छितो की हे परीक्षण निव्वळ चेन्नई एक्स्प्रेसचे नसून यात उघड उघड शाहरुख खान लपलाय जो नक्कीच एक स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.
______________________________________________________
चेन्नई एक्सप्रेस ..!!
आजच पाहिली, दादर स्टेशनवर नाही हं, तो जोक जुना झाला, थिएटरमध्येच पाहिली. सुरुवातीपासूनच जी सुसाट सुटते ती दोन-अडीज तासांचे मनोरंजन करूनच थांबते. प्रवासाच्या आठवणी काही रेंगाळत नाहीत मात्र जो काही टाईमपास होतो तो पैसा वसूल आहे. भले मग तुम्ही २००-२५० रुपयांचे तिकिट घेऊन मल्टीप्लेक्समध्ये का बघत असानात.. किंबहुना चित्रपटात जी निव्वळ अप्रतिम लोकेशन्स दाखवली आहेत त्याचा पुरेपूर आनंद मोठ्या पडद्यावरच..! खास करून सुरुवातीच्या एका सीनमध्ये जेव्हा ट्रेन दिपीकाच्या गावच्या पूलावर अर्धवर्तुळाकारात थांबते तेव्हा पाठीमागून कोसळणार्या शुभ्र धबधब्याच्या पार्श्वभूमीवर आकाशातून टिपलेले दृश्य.. अहाहा.. लाजवाब!
रोहित शेट्टीचा सिनेमा असला तरी हिरो अजय देवगण नसल्याने अॅक्शन त्यानुसारच अतिरेक टाळून.. तसेच रोमान्सचे बोलाल तर शाहरुख असूनही बर्यापैकी गाळून.. ज्याचा अंदाज आधीच येतो जेव्हा तो चित्रपटाच्या सुरुवातीलाच प्रामाणिकपणे आपले वय वर्षे चाळीस कबूल करतो..
तर चित्रपट निखळ विनोदी या सदरात मोडतो.. पण नर्म हलकेफुलके विनोद हा प्रकार आजकाल कालबाह्य झाल्याने फूल टू मॅड कॉमेडी चालते.. शाहरुखच्या कॉमिक टायमिंगवर कोणाला डाऊट नसावा मात्र दिपिकाने देखील सुखद धक्का दिला आहे. शाहरुख असूनही ती तितकीच लक्षात राहते यातच सारे आले. अर्थात याचे श्रेय दिग्दर्शकाला देखील ज्याने तिलाही समान स्कोप दिला आहे.
काही ठिकाणी चुरूचुरू संवाद आणि कोलांट्या उड्या मारायच्या नादात शाहरुख ओवरअॅक्टींग करून जातो मात्र या सगळ्यात तितक्याच टाळ्या आणि हसेही वसूल करतो. तामिळी लोकांना संशय येऊ नये म्हणून शाहरुख अन दिपिकाचे हिंदी गाण्यांच्या चालीत हिंदीत संवाद बोलणे हा कॉमेडीचा अगदी फ्रेश प्रकार आणि तूफान जमलाय. बाकी शाहरुखचे तामीळ बोलणे आणि इतर प्रासंगिक विनोद इथे सांगण्यात मजा नाही, ते स्वताच बघा. पण एक मात्र आहे, विनोदाची जमलेली भट्टी पाहता येत्या काळात "शाहरुख - रोहित शेट्टी" जोडीचा किमान एकतरी असाच मसालापट येणार हे नक्की. कारण शाहरुखचे वाढलेले वय त्याच्या चेहर्यावर झळकते म्हणून आता जब तक है जान तब तक ये खान पुन्हा रोमांटिक चित्रपट करेल असे काही वाटत नाही, अॅक्शन चित्रपट हा काही त्याचा बाज नाही, चकदे-स्वदेश सारखे चित्रपट वरचेवर बनत नाहीत आणि कलात्मक चित्रपट सुपरस्टार करत नाहीत.. तर राहता राहिली कॉमेडी जिचे त्याच्यात उत्तम पोटेंशिअल आहे.
चित्रपटातील ईतर कलाकारांबद्दल मला फारसे भाष्य करायचे नाही कारण सारे शेप साईज कलर अन ड्रेसमध्ये एकसारखेच वाटतात, उगाच एकाचे नाव घेतले अन दुसर्याचे नाही तर त्याला वाईट वाटायचे.
चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलायचे झाल्यास पहिली दोन गाणी चांगली तर नंतरची दोन थोडीफार बोअर मारतात. पाचवे गाणे देखील बोअरच आहे पण ते चित्रपट संपल्यावर लागते हेच काय ते समाधान. तरीही लोक खुर्च्या सोडत नाहीत कारण एकंदरीत सर्वच गाण्यांचे चित्रीकरण सुरेख आहे.
अश्या चित्रपटांचे परीक्षण देताना वापरतात तो, "डोके बाहेर ठेऊन गेलात तर निखळ मनोरंजन होईल" टाईप टिपिकल डायलॉग यालाही लागू होईल (बाकी डोके आत घेऊन जायचे असते अश्या चित्रपटांना किती लोक जातात हा एक सर्वेक्षणाचा विषय आहे) असो, हे खरे आहे कारण चित्रपटाची कथा चार वाक्यांचीच आहे, जी मी इथे तुम्हाला सांगितली तरी चित्रपटाच्या रसग्रहणावर जराही फरक पडणार नाही. हा काही एखाद्या सुप्रसिद्ध लेखकाच्या नावाजलेल्या कांदबरीवर आधारीत चित्रपट नाही तर स्टोरी काय, कशी, याचा आतापासूनच जास्त लोड घेऊ नका.
आता रेटींग - जर तुम्ही एसआरके चे पीएसपीओ पंखे असाल तर तुमच्यासाठी म्हणून रेटींग फोर स्टार (****) ..... चला, फोर अॅण्ड हाल्फ घ्या, माझ्या बापाचे काय जातेय.. पण जर तो तुम्हाला आवडत नसेल.., खरे तर असे बरेच जण बोलतात पण त्यातले कित्येक दुसर्यांना फसवत असतात तर कित्येक स्वतालाच.., पण तरीही तो तुमच्या डोक्यात जात असेल तर चुकूनही जाऊ नका.. कारण चित्रपटात असा एकही सीन नाही ज्यात तो तुम्हाला पडद्यावर दिसणार नाही.. तर उगाच निसर्गसौंदर्य वा दिपिकाचे सौंदर्य बघायला म्हणून जाऊन स्वताच्या जीवाला त्रास करून घेऊ नका.
तळटीप - या चित्रपटाचे परीक्षण देण्याच्या नावाखाली काही शाहरुखद्वेष्टींचे आकसाने भरलेले मत तुम्हाला आंतरजालावर इथेतिथे फिरताना मिळेल, तर त्याला गंडू नका, माझ्यावर विश्वास ठेवा, मजा नाही आले तर मी पैसे परत मिळवून देईन, तिकिट तेवढे जपून ठेवा !
*** टर्मस अॅंड कंडीशन अप्लाय - बोले तो हि ऑफर फक्त शाहरुखच्या चाहत्यांसाठी आहे
जाता जाता ---- एकाच गोष्टीचे वाईट वाटते, माझे ईंग्लिश चांगले नसल्याने हे लिखाण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. तर बॅडलक शाहरुख खान.. तरी शाहरुखचे मराठी भाषिक चाहते हे स्टेटस शेअर करू शकतात, माझी पूर्वपरवानगी घ्यायची आवश्यकता नाही
- तुमचा अभिषेक
Abhishek dada, swatachya
Abhishek dada, swatachya BBnwar swatachya DUI ne comments kai detoyes are
Pages