फिल्लमी गाण्यांवर देवादिकांची भजनं (?) ऐकायला येणं तुम्हा आम्हाला नवीन नाही. कुठल्याही 'फेमस' देवळाच्या परिसरात अशा कलाकृती ऐकायला मिळतात. तर या संगीतप्रकारात माझ्याकडून एक भर पडण्याचा योग असावा; म्हणून मला हे जे गणपतीचं भजन (हा शब्द योग्य न वाटल्यास जो शब्द योग्य वाटेल तो इथे वाचावा) स्फुरलं, ते आपणापुढे मांडत आहे.
चूक भूल माफ असावी.
चेन्नई एक्सप्रेस च्या लुंगी डान्स या रचनेच्या चालीवर आधारित.
कपाळावर; लावुनि गंध
बाप्पाचा; घेऊनि छंद
सेवा करू प्रेमभावाने
म्हणू सारे एकमुखाने
तूच अमुची शान... (रे बाप्पा)
तूच अमुचा प्राण...(रे बाप्पा)
तूच अमुची शान... (हे)
मुंजीमध्ये आपण बटूला भिक्षावळीत ऐपतीप्रमाणे, नात्याप्रमाणे काहीतरी टाकत असालच. त्याचबरोबर मी खाली दिलेला ’मुंजीचा कानमंत्र’ही देऊ शकता.
मुंजीचा कानमंत्र
काय करू मी देवा?, म्हणुनी कधी विचारू नये ।
प्रयत्न करुनीही देवा, कधी आळवू नये ॥
हात पाय बुद्धी देउनी पाठविले जगतात ।
नियोजिलेले काम बुद्धीने हात पाय करतात ॥
बुद्धी असता लुळे पांगळे मात करी व्यंगा ।
अंध सुरदासाची रचना सदा मना सांगा ॥
आळविता का जेव्हां तेव्हां, देव कुठे आहे?।
ओळखिले नाही का तुमच्या देव मनामधी आहे ॥
आळविण्याचा अर्थ असे की मला निग्रही बनवा ।
नमस्कार. मराठी आणि हिन्दीमधील भजनांच्या सीडींची नावे हवी आहेत. ही भजने शास्त्रीय पद्धतीने जर गायली असतील तर आणखीनचं उत्तम.
वीणा सहस्त्रबुद्धे ह्यांचे 'घट घट मे पंछी बोलता..' हे कबीरजींचे भजन ज्या सीडीत आहेत तिचे नाव का?
मुखे भजन करता,म॑त्रमुग्ध झालो
नाम घेता विठ्ठ्ला, तल्लीन झालो !!ध्रु !!
पायी यात्रा करुनी प॑ढरीला गेलो
पाहुनि श्रीमुख धन्य धन्य झालो
विठ्ठ्लाच्या चरणी नतमस्तक झालो !!१!!
च॑द्र्भागेच्या पाण्याने पवित्र झालो
भक्तीरसाच्या भवसागरात न्हालो
सु॑दर ते ध्यान पाहण्यास आलो !! २ !!
घडो तुझी सेवा तसा मी वागलो
वारकरी होऊन्,किर्तनी र॑गलो
विठ्ठ्लाच्या पायी दर्शनास आलो !! ३ !!
पाहुनी पा॑डुर॑गा भारावुन गेलो
साठ्वुनी डोळ्यात सुखी झालो
तुझ्या दर्शनास प॑ढरीला आलो !! ४ !!
मुखे भजन करता,म॑त्रमुग्ध झालो
नाम घेता विठ्ठ्ला, तल्लीन झालो