तामीळनाडू

देखणं चेन्नई सेंट्रल

Submitted by पराग१२२६३ on 13 October, 2023 - 05:07

पूर्वीच्या मद्रास प्रांताची राजधानी असलेलं चेन्नई महानगर संपूर्ण दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात असे. अतिशय प्राचीन आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या अनेक खुणा या शहरात आजही पाहायला मिळतात. चेन्नई शहराच्या इतिहासाची ओळख त्यातून नव्या पिढीला होत असते. अशातीलच एक, वसाहतकाळात चेन्नईमध्ये उभारण्यात आलेली अतिशय देखणी वास्तू म्हणजे चेन्नईतील मुख्य रेल्वेस्थानकाची म्हणजे चेन्नई सेंट्रलची इमारत. आज या स्थानकाचं अधिकृत नाव पुरट्चि तलैवर डॉ. एम. जी. रामचंद्रन चेन्नई सेंट्रल असं आहे. आज हे स्थानक चेन्नई शहराला देशाच्या कानाकोपऱ्याशी जोडते.

Subscribe to RSS - तामीळनाडू