शिवचरित्र : पावनखिंड

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

फार पुर्वी, माझ्या जन्माच्या आधी माझे बाबा शिवचरित्र अख्यान सांगत. एक एक प्रसंग त्यांनी वर्णन करावा नी उपस्थित प्रेक्षकांनी तल्लीन होऊन जावे. जिजाऊ सती जाण्यास निघतात तो प्रसंग ऐकताना लोकांना अश्रु आवरत नसत. पूढे राजकीय क्षेत्रात वावर वाढला, पक्षातील जबाबदार्‍या वाढल्या तसा हा उपक्रम मागे पडला. आम्ही भावंडांनी प्रत्यक्ष कधी त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकलेच नव्हते. आता त्यांनी पुन्हा सांगायला सुरुवात करावी असे गेली बरीच वर्षं आम्ही सगळे त्यांना सांगतोय. पण तो योग काही जुळून येत नव्हता. गेल्या वर्षी काही निमित्ताने बाबांच्या मागे लागून एक भाग रेकॉर्ड करुन घेतला (कसा ती एक वेगळीच कथा होइल). तो इथे देत आहे.

त्याआधी शिवचरित्र सांगायला त्यांनी कशी सुरुवात केली त्याविषयी थोडं- शिवराज्याभिषेक दिन हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात हिंदवी राष्ट्रदिन म्हणून साजरा होतो. १९७४ साली शिवराज्याभिषेकाला ३०० वर्षं पूर्ण झाली. त्या वर्षी राजगडावर सरसंघचालकांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ते संपूर्ण वर्षच हिंदवी राष्ट्र वर्ष म्हणून साजरे करावे असा ठराव संमत झाला. ह्या निमित्ताने बाबांनी ठिकठिकाणी शिवचरित्रावर व्याख्याने द्यायला सुरुवात केली. त्याआधी मा. बाबासाहेब पुरंदरेंचा शिवचरित्रावर आधारीत दहा दिवसांचा कार्यक्रम श्रीरामपूरला झाला होता. त्याच्या व्याख्यानांमधून खूप काही शिकायला मिळाले होते. बाबांच्या अमोघ ओघवत्या वक्तृत्वशैलीमूळे कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रीय झाला. ते वर्ष संपल्यावरही कुठुन कुठुन आमंत्रणं येत राहिली. पण हळुहळु हा उपक्रम मागे पडला नी मग बंदच झाला.

आता नियमीत एक एक प्रकरण रेकॉर्ड करुन घ्यायचा मानस आहे. जस जसे भाग होत जातील तसे इथे प्रकाशित करेन. आशा आहे आपल्याला आवडेल.

विषय: 
प्रकार: 

चांगला उपक्रम आहे. अख्यान येथे सर्वांसाठी उपलब्द करुन दिल्याबद्दल धन्यवाद. अजुन एकायला मिळाल्यास आवडेल.

सिंडे, चांगलं झालंय. फक्त मला आवाज थोडा आणखी चालला असता असं वाटलं. असो,

रच्याकने, तुझे बाबा एवढे शिवचरित्र सांगतात म्हटल्यावर तू कोणत्या कोणत्या गड-किल्ल्यांना भेटी दिल्या आहेस?:डोमा: Light 1

अतिशय चांगला उपक्रम. मायबोलीकडून हीच अपेक्षा आहे. आवाज अजून जोरात पाहिजे. गो सिंडी मासाहेब.

सिंडि, स्पष्ट ऐकू न आल्यामूळे फार विरस झाला. यासाठी काहि करता येईल का ?
हे टायपून नाही का मिळणार, तेवढीच दुधाची तहान भागवता येईल.

हि पावनखिंड माझ्या आजोळपासून जवळच आहे. बघितलीय मी.

धन्यवाद सर्वांना.

दिनेशदा, तुम्हाला ऑडिओ इमेल करते. पण कंप्युटरचा वॉल्युम मॅक्स ठेवला तर नीट ऐकु येतेय, सुरुवातीची ३-४ वाक्य सोडली तर.

पुढल्या वेळी आवाजाची काळजी घेऊ.

स्पष्ट ऐकू न आल्यामूळे फार विरस झाला.
--- दिनेशदा सुरवातीला काही सेकंद आवाज अस्पष्ट जाणवतो.

थोडे पुढे गेल्यावर चांगले रेकॉर्ड झाले आहे. पुढील भागासाठी शुभेच्छा

शिवचरित्र कथनाचे कार्यक्रम ? आपल्या वडिलांचे नाव काय ?
ही ध्वनीफित आत्ता ऐकता येत नाहीये, सवडीने ऐकावी लागेल.