बबूची गोष्ट

बबूची गोष्ट

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

बबू त्या दिवशी खूप आनंदात होती. तिचे आजोबा तिला छ्बूच्या घरी घेऊन जाणार होते. छबू आणि बबूची एकदम घट्ट मैत्री होती. त्या दोघी एकाच वर्गात होत्या. पण बबू आणि छबू पहिलीतून दुसरीत जाणार होत्या त्या वर्षी छबूची आई छबूला घेऊन तिच्या मामाच्या घरी राहायला गेली. छबू मग नव्या शाळेत जायला लागली. छबू गेली म्हणून बबूला खूप वाईट वाटलं. एकदा जिन्याखाली बसून एकटीने रडताना तिला आजोबांनी बघितलं. त्या दिवशी पासून ते जेव्हा नदीपलीकडल्या छबूच्या मामाच्या गावी जात तेव्हा बबूला सोबत घेऊन जात. तिच्या शाळेला सुट्टी असेल तरच. पण ते नेहमीच बबूला शाळा असेल अशा दिवशी जात आणि तिला त्यांच्या बरोबर जायला मिळत नसे.

प्रकार: 
Subscribe to RSS - बबूची गोष्ट