चेरी ब्लॉसम - एक अविस्मरणीय पहाट
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
२०१३ च्या शेवटी शेवटी आणि ह्या वर्षाच्या सुरवातील मी वाशिंगटन डीसी आणि वर्जनियामधे नोकरीनिमित्त काही महिने राहिलो. मी तिथे गेलो तेंव्हा हिवाळ्याची नुकतीच सुरवात झालेली होती. पानगळीच्या दरम्यान गळून गेलेली पाने जमिनाला चिकटत चाललेली होती. कुजत चाललेली होती. काही पाने कधीकाळी वहीत जपूण ठेवलेल्या पिंपळाच्या पानाची आठवण करुन देणारी होती. सगळीकडे बर्फच बर्फ पसरलेला आणि कुठे सिंगापुरातली दमट हवा आणि उंचच उंच इमारती आणि कुठे हे ठेंगणे जग! मी तुलना करता करताच मला भव्य रस्ते असलेले डीसी शहर भेटले आणि मी वाशिंगटन डीसीच्या प्रेमातच पडलो.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा