अभिनय
तिला काहीतरी हवं असतं म्हणून..
दार उघडताचं हसून प्रेमानं त्याचं स्वागत करते
रुचकर चमचमीत लज्जतदर खा-प्यायला देते
वेल्हाळ शैलीत त्याच्याशी बोलते रमते गमते
तो आता ऐकेलचं अशा वेळी मागणी करते!!!
पुन्हा तिला काहीतरी हवं असतं म्हणून..
ती त्याच्याशी अबोल शीतयुद्ध पुकारते
रुसते फुगते कोरडी वागणूक देते
पाठमोरी उभी राहूनचं संवाद साधते
सतत भडकते सुनावते ज्वालामुखी होते
तो आता ऐकेलचं अशा वेळी मागणी करते!!!!