अभिनय

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

तिला काहीतरी हवं असतं म्हणून..

दार उघडताचं हसून प्रेमानं त्याचं स्वागत करते
रुचकर चमचमीत लज्जतदर खा-प्यायला देते
वेल्हाळ शैलीत त्याच्याशी बोलते रमते गमते
तो आता ऐकेलचं अशा वेळी मागणी करते!!!

पुन्हा तिला काहीतरी हवं असतं म्हणून..
ती त्याच्याशी अबोल शीतयुद्ध पुकारते
रुसते फुगते कोरडी वागणूक देते
पाठमोरी उभी राहूनचं संवाद साधते
सतत भडकते सुनावते ज्वालामुखी होते
तो आता ऐकेलचं अशा वेळी मागणी करते!!!!

तिला पुन्हा काहीतरी हव असत पण...
ते तिला मागता..मांडता येत नाही
तो अभिनय तिला जमत नाही
ते त्याला समजत.. उमजत नाही
खरचं काही अपेक्षांची यादी
विक्रिच्या वस्तूंसारखी करता येत नाही!!!
- हर्ट

प्रकार: 

छान

<<< हर्ट | 19 August, 2016 - 12:21
धन्यवाद आनंदजी Happy >>>

_आनंदी_ आनंद आहे

छान आहे, सद्ध्या थोडा वृत्ताचा अभ्यास करावा म्हणतो आहे, जमल्यास प्लिज ह्याचे वृत्त कुठले अन कुठल्या छंदातली आहे कविता ते समजवाल मला, आधीच सुंदर भासलेली कविता नीट तंत्र शिकून समजून घेतली तर अपार आनंद देईल असे वाटते

बापू