वर्तुळ
माझ्याभोवती माझ्या
नैसर्गिक मर्यादांचे
कुंपण वेढलेले आहे
त्यापलिकडे
मला माझे आकाश
विंधायचे आहे
नवे चंद्र शोधायचे आहेत!
माझ्या
सिमित स्वकेंद्रीय वर्तुळात
गुरफटून
माझा अभिमन्यू झाला आहे
ठरलेल्या चाकोरीच्या
आत आत घुटमळणारा
श्वास नकोसा झाला आहे!!!!
माझ्या अस्थिर जिवाची
अविरत अथक धडपड
सुरु असतानाच
'हे विश्वची माझे घर'
असे मला आकळते
आणि ओंजळभर चंद्र
वार्यावर भिरकावून
फक्त एक
स्थिर बिंदु
होऊन जावेसे वाटते आहे...
- बी